शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खासगी अभियांत्रिकी, फार्मसीचे कर्मचारी 27 महिन्यांपासून वेतनाविना, कोरोना संसर्गाचा शिक्षण क्षेत्राला सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 09:51 IST

Coronavirus: गतवर्षी मार्चपासून कोरोना संसर्गामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. याचा फटका खासगी अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालये, तंत्रनिकेतनमधील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना बसला आहे. 

अमरावती : राज्यातील खासगी अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालयांतील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना ९ ते २७ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कोरोनाकाळात कसे जगावे, हा प्रश्न या प्राध्यापक, कर्मचाऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे. याप्रकरणी महाविद्यालयीन शु्ल्क समितीचे धोरण मारक ठरत असल्याचे वास्तव आहे.गतवर्षी मार्चपासून कोरोना संसर्गामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. याचा फटका खासगी अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालये, तंत्रनिकेतनमधील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना बसला आहे. प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना वेतनाविना कुटुंबीयांचा सांभाळ करणे आव्हान ठरत आहे. महाविद्यालयात शुल्क निर्धारण, शिक्षण शुल्क समिती यांच्या निर्देशानुसार विविध शिष्यवृत्तींचा किमान ७० टक्के भाग हा कर्मचारी वेतनावर खर्च करण्याची नियमावली आहे. असे असताना खासगी अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालये तसेच तंत्रनिकेतनमधील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना तब्बल २७ महिन्यांपासून वेतन मिळत नसेल, तर ही बाब गंभीर आहे. वेतनावर ७० टक्के रक्कम वेतनावर खर्च करण्यात येईल, असे शपथपत्र संस्था संबंधित विभागाला देते. असे असताना ९ ते २७ महिन्यांपासून खासगी अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालये, तंत्रनिकेतनमधील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही, ही बाब दुर्दैवी मानली जात आहे. यासंदर्भात आमदार नागो गाणार यांनी उच्च व तंत्र शिक्षण संचालक, सहसंचालक यांना निवेदन दिले असून, ही गंभीर समस्या सोडवावी, अशी मागणी केली आहे. 

अमरावती विभागातील बहुतांश खासगी अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालये, तंत्रनिकेतनमधील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले नाही. याविषयी उच्च व तंत्र शिक्षण संचालक, सहसंचालकांना निवेदन देण्यात आले आहे.     - प्रदीप खेडकर, अध्यक्ष, शिक्षण मंच

टॅग्स :Teacherशिक्षक