शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कारवाईचा दट्ट्या बसताच सुधारली महाविद्यालये; ‘नॅक’ मूल्यांकनामध्ये महाराष्ट्र आघाडीवर, गुजरात पाचव्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 07:19 IST

उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढावी, यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन बंधनकारक केले आहे.

- प्रशांत बिडवेलाेकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यातील ३५ विद्यापीठे आणि १ हजार ९२२ महाविद्यालये अशा एकूण १ हजार ९५७ उच्च शिक्षण संस्थांचे नॅक मूल्यांकन पूर्ण झाले असून, महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील ४३० विद्यापीठे आणि ९ हजार २५७ महाविद्यालये अशा एकूण ९ हजार ६८७ शैक्षणिक संस्थांचे नॅक मूल्यांकन पूर्ण झाले आहे.

उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढावी, यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन बंधनकारक केले आहे. त्यानुसार राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन तसेच पुनर्मूल्यांकन करून घ्यावे, याबाबत उच्च शिक्षण विभागातर्फे वारंवार परिपत्रक काढून सूचना करण्यात येत हाेत्या. मात्र, त्याकडे उच्च शिक्षण संस्थांनी दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले हाेते.

शिक्षण विभागाच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे नॅक मूल्यांकनात राज्य आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. नॅक मूल्यांकन प्रक्रिया न करणाऱ्या महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश रोखण्यात येतील, असा इशारा सरकारने दिला होता.

सर्वाधिक नॅक मूल्यांकन    राज्य    विद्यापीठ    महाविद्यालय    संख्या    महाराष्ट्र    ३५    १९२२    १९५७    कर्नाटक    ३४    ९९४    १०२८    तामिळनाडू    ४५    ८५९    ९०४    उत्तर प्रदेश    ३९    ६१७    ६५६    गुजरात    २७    ५००    ५२७    प. बंगाल    १७    ४११    ४२८    आंध्र प्रदेश    १६    ४०३    ४१९

नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्यासंदर्भात विद्यापीठाने काय कारवाई केली ? याबाबत राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.    - डाॅ. शैलेंद्र देवळाणकर, प्रभारी शिक्षण संचालक, उच्च शिक्षण विभाग