शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर आयटीआयमध्ये ‘एरोनॉटिकल’ प्रवेशासाठी चुरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 03:45 IST

मिहानमधील दसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लि. या कंपनीशी टायअप झाले आहे. ही कंपनी विद्यार्थ्यांना इन्टर्नशिप करून प्लेसमेंटसुद्धा देणार आहे.

नागपूर : विमानाच्या देखभाल व दुरुस्तीचे प्रशिक्षण महाराष्ट्रात केवळ नागपूरच्या शासकीय आयटीआयमध्ये उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगली चुरस असून, अख्ख्या महाराष्ट्रातून अभ्यासक्रमासाठी नोंदणी होत आहे. गेल्यावर्षीपासून हा अभ्यासक्रम सुरू झाला. यंदा दोन तुकड्यांमध्ये ४० जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.

एरोनॉटिकल कंपन्या पूर्वी जनरल फीटर नियुक्त करीत होत्या. पण या अभ्यासक्रमामुळे एरोनॉटिकल क्षेत्रातील तज्ज्ञ फीटर एव्हिएशन कंपन्यांना मिळणार आहेत. त्यासाठी दसॉल्ट एव्हिएशन कंपनी फ्रान्स यांचा केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाशी सामंजस्य करार झाला. या अभ्यासक्रमाची जबाबदारी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय मुंबईने नागपूरच्या शासकीय आयटीआयवर सोपविली. नागपुरातील मिहानमध्ये विमानांच्या देखभाल व दुरुस्ती कंपन्या आपला विस्तार करीत आहे. त्या दृष्टिकोनातून विदर्भातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. ‘एरोनॉटिकल स्ट्रक्चर अ‍ॅण्ड इक्युपमेंट फीटर’ असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे.

२०१९ मध्ये २० विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुरू झाली. २० जागांसाठी पहिल्याच वर्षी ५७१ अर्ज आले होते. तेव्हा ९३ टक्क्यांपर्यंत कटआॅफ गेला होता. यंदा आयटीआयने दुसरीही तुकडी सुरू केली आहे. त्यामुळे आता ४० जागा आहेत. ९५ टक्के गुण घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे वळले आहेत. संपूर्ण राज्यातून आणि इतर राज्यातूनही या अभ्यासक्रमासाठी विचारणा होत असल्याचे आयटीआयचे प्राचार्य हेमंत आवारे यांनी सांगितले.प्लेसमेंटची चिंता नाहीमिहानमधील दसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लि. या कंपनीशी टायअप झाले आहे. ही कंपनी विद्यार्थ्यांना इन्टर्नशिप करून प्लेसमेंटसुद्धा देणार आहे.

टॅग्स :airplaneविमान