शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

CA परीक्षेचा निकाल जाहीर; मुंबईचा मित शाह देशात ठरला अव्वल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 13:53 IST

सनदी लेखपाल अर्थात सीएच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत मुंबईच्या मित शाहने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

मुंबई: नुकताच सनदी लेखपाल (Chartered Accountant)अर्थात सीएच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. १४ ते २९ मे २०२२ या कालावधीत सीएची अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची केंद्रे देशातील विविध भागांमध्ये होती. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालाची मोठी प्रतीक्षा होती आणि अखेर निकाल लागला. ही परीक्षा दोन टप्प्यांत पार पडली होती. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल पाहू शकतात. या परीक्षेत मुंबईच्या मित शाहने पहिला क्रमांक पटकावला तर जयपूरच्या अक्षत गोयलला दुसरा क्रमांक मिळवण्यात यश आले.

दोन्ही ग्रुपचा निकाल खालीलप्रमाणे

ग्रुप -१ निकाल - २१.९९ टक्केग्रुप -२ निकाल - २१.९४ टक्के

असा पाहा निकाल

निकाल पाहण्यासाठी ICAI CA निकाल २०२२ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. icai.nic.in, caresults.icai.org आणि icaiexam.icai.org या दोन्हीही वेबसाइटवर जाऊन तुम्ही सहज निकाल पाहू शकता. निकाल पाहण्यासाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना त्यांचा आसन क्रमांक, त्यांचा नोंदणी क्रमांक अथवा पिन वापरून लॉर इन करणे बंधनकारक आहे. मुंबईचा मित शाह देशात ठरला अव्वल 

सीएच्या निकालामध्ये मुंबईच्या मित अनिल शाहने बाजी मारून पहिला क्रमांक पटकावला. त्याने ८०० पैकी ६४२ गुण मिळवून ८०.२५% मिळवले आहेत. तर ७९.८८%  मिळवून जयपूरच्या अक्षत गोयलने देशात दुसरा क्रमांक पटकावला आणि ७६.३८% गुणांसह सुरतमधील सृष्टी केयुरभाई संघवी हिने देशात तिसरा क्रमांक पटकावला. या परीक्षेसाठी बसलेल्या पहिल्या ग्रुपमधील ६६,५७५ विद्यार्थ्यांपैकी १४,६४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दुसऱ्या ग्रुपमधील २९,३४८ विद्यार्थ्यांपैकी ३,६९५ विद्यार्थी पास झाले आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाResult Dayपरिणाम दिवसMumbaiमुंबई