शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

दहावीच्या निकाल प्रक्रियेवर बहिष्कार! संतप्त शिक्षक संघटनेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 09:50 IST

अनेक शिक्षक आणि शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. शिक्षक भारती संघटनेचे शिष्टमंडळ बुधवारी मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वड्डेटीवार आणि सचिव असीम गुप्ता यांची भेट घेण्यास गेले असता, शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी सध्या देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती, तर दहावी आणि बारावीच्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे, असा आदेश प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिला आहे. तरीही शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही. यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांत पोहोचण्यास प्रचंड अडचणी येत असल्याने संतप्त शिक्षकांनी अखेर दहावी, बारावी निकालाच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. दहावीचा निकाल वेळेवर न लागल्यास त्याला सर्वस्वी शिक्षण विभाग जबाबदार असेल, अशी भूमिका शिक्षक संघटनांनी जाहीर केली आहे.

अनेक शिक्षक आणि शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. शिक्षक भारती संघटनेचे शिष्टमंडळ बुधवारी मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वड्डेटीवार आणि सचिव असीम गुप्ता यांची भेट घेण्यास गेले असता, शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी सध्या देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत मुंबई लेव्हल-३ मधून लेव्हल-२ मध्ये जात नाही तोपर्यंत प्रवासाची परवानगी मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, यादरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत लागावा यासाठी शिक्षकांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून, दंड भरून लोकल प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासन शिक्षकांची परिस्थिती समजून न घेता परवानगी नाकारत असल्याने शिक्षक भारतीने बहिष्काराचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी व बारावीच्या निकालाच्या कामावर त्यांनी प्रवासास परवानगी न मिळाल्यास बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ५० टक्के उपस्थितीच्या निर्णयालाही विरोध करत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची परवानगी देऊन शिक्षणच देण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी केली आहे. 

शिक्षण राज्यमंत्र्यांचे संघटनेला आश्वासनnलोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांनी सविनय कायदेभंग करून आंदोलन उभे केले आहे. यानंतरही निर्णय लवकर न झाल्यास दहावीच्या निकालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, त्यासही सर्वस्वी शासन जबाबदार राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. nदरम्यान, शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी राज्य शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू यांच्याशी संवाद साधून शिक्षकांच्या समस्या मांडल्या. तेव्हा आज यासंदर्भातील निर्णय होईल, असे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती दराडे यांनी दिली.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल