शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत मराठी शाळांची पाटी कोरीच..! आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 09:09 IST

Education : मुंबईत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवीन दालने उघडली असली तरी मराठी शाळा, सरकारी अनुदानित शाळा मात्र खासगीकरणाच्या लाटेत ओस पडू लागल्या आहेत. विशेषत: मराठी शाळांची पाटी कोरीच असल्याचे चित्र आहे.  

मुंबई :  देशाची आर्थिक राजधानी म्हटल्यावर मुंबईतशिक्षणसंस्था, महाविद्यालय आणि विविध माध्यमांच्या शाळा ओघानेच येणे क्रमप्राप्त आहे. पुणे शिक्षणासाठी पहिली पसंती  असली तरी पुण्यानंतर गुणवंतांची पसंती शालेय शिक्षणासाठी असो किंवा वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि विविध शाखांतील कुठल्याही अभ्यासक्रमासाठी असो ती मुंबईतील शिक्षण संस्थांनाच असते, यात वाद नाही. मात्र, मुंबईत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवीन दालने उघडली असली तरी मराठी शाळा, सरकारी अनुदानित शाळा मात्र खासगीकरणाच्या लाटेत ओस पडू लागल्या आहेत. विशेषत: मराठी शाळांची पाटी कोरीच असल्याचे चित्र आहे.   राज्यात ३० ते ४०  हजार एक शिक्षकी शाळा असून, त्यातील अनेक मुंबई विभागात ही आहेत. मुंबई नुकत्याच झालेल्या मिशन झिरो ड्रॉप आउट मोहिमेमधून तब्बल २ हजार ७०० हून अधिक शाळाबाह्य मुलांना शोधून शाळांमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही मोहीम आणखी काही दिवस चालू ठेवल्यास आणि व्याप्ती वाढविल्यास मुंबईतील शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचे विदारक चित्र समोर येईल, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते देत आहेत. तसेच  शिक्षणाचा दर्जा आणि पातळी याचे निरीक्षण करण्यासाठी जबाबदार यंत्रणा मात्र अस्तित्वात नसल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. 

आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल  विद्यार्थी दहावी, बारावीनंतर आयटीआयचे कोर्स करतात आणि  व्यवसाय सुरू करतात. मुंबई विभागातील ७ जिल्ह्यात  ६७ शासकीय आयटीआय असून यात ४९ सर्वसाधारण आयटीआय महिलांकरिता ३ आयटीआय, १० आदिवासी आयटीआय,  २ अल्पसंख्याक आयटीआय तसेच ३ आदिवासी आश्रमशाळा आहेत. याशिवाय मुंबई विभागात ३९ खासगी आयटीआय आहेत. याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद  असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व संचलनालयाने दिली.

पालिका शाळांमधील ओढा मुंबई पालिका शिक्षण विभागाने यंदा  विद्यार्थी संख्या वाढविण्याच्या निश्चय केला  मात्र हा प्रयत्न मागील अनेक वर्षांपासून झाला असता तर विद्यार्थी गळती आणि मराठी शाळांची घटती संख्या दोन्ही थांबविता आले असते, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. 

 पॉलिटेक्निक जोरात  मुंबईत १६ पॉलिटेक्निक महाविद्यालये असून, त्यांची प्रवेशक्षमता ५ हजार १३४ असून, त्यासाठी यंदा ६ हजार ९ अर्ज आले आहेत. पॉलिटेक्निक प्रशिक्षणानंतर मिळणाऱ्या रोजगाराच्या संधीमुळे विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे आकर्षित होत आहेत. 

इंग्रजी शाळा दुप्पट यू डायस २०२०-२१ च्या माहितीनुसार शहरात उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिकच्या एकूण १ हजार १३० आहे. तिथेच मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या केवळ ३७० आहे. शिवाय मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, उर्दू अशा सर्व माध्यमांच्या शाळांची संख्या केवळ ६६४ आहे. एकूणच इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या ही या इतर माध्यमांच्या शाळांपेक्षा दुप्पट आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रस्थ यावरून अधोरेखित होते. ही अतिशय गंभीर बाब आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात? स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाच्या प्रगतीचे महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतल्यास शिक्षण आरोग्य आणि सार्वजनिक सुविधा अत्यंत महत्त्वाचे असून, मुंबई हे शिक्षणाच्या दृष्टीनेदेखील आकर्षणाचे केंद्र होऊ लागले आहे. आयआयटीसाठी तर ते प्रसिद्ध आहेच, शिवाय मुंबई विद्यापीठदेखील नावाजलेले आहे. बहुभाषिक संस्कृती असल्याने सर्वच भाषेतील लोकांना सामावून घेणारे शिक्षण हे मुंबईचे वैशिष्ट्य मानावे लागेल; पण दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या मराठी शाळा हा मात्र लक्षवेधी विषय आहे.- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ

टॅग्स :Educationशिक्षणMumbaiमुंबई