शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

गेटच्या परीक्षेला ७८% विद्यार्थ्यांची उपस्थिती, तब्बल ९ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज होते भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 5:20 AM

Attendance of 78% students for GATE exam : यंदा परीक्षेत एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसेच ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स या दोन विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई : नॅशनल को-ऑर्डिनेशन बोर्डाच्या वतीने दरवर्षी इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली ‘गेट २०२१’ ही कम्प्युटर बेस टेस्ट (सीबीटी) अ‍ॅप्टिट्यूड परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी देशभरातून तब्बल ९ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील ७८ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि देशातील सात आयआयटी संस्थांमार्फत गेट परीक्षा घेण्यात येते. यंदा आयआयटी मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या ‘गेट २०२१’ ही परीक्षा ५, ते ७ आणि १२ ते १४ फेब्रुवारी रोजी सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये झाली. यंदा परीक्षेत एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसेच ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स या दोन विषयांचा समावेश करण्यात आला आहे. ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स हा पेपर इकॉनॉमिक्स, इंग्लिश, फिलॉसॉफी, सायकोलॉजी व सोशिओलॉजी या विषयांतर्गत विद्यार्थ्यांना देता आला. यंदा २७ पेपर असून, ते वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित होते. परीक्षेसाठीची नोंदणी १४ ते ३० सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन झाली. गेट २०२१ ही परीक्षा देशातील २०० शहरांतील ६१६ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेला तब्बल ९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ७८ टक्के विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. हा आकडा गतवर्षीइतकाच आहे. त्यामुळे या परीक्षेवर कोरोनाचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून आला नाही. या परीक्षेचा निकाल २२ मार्च २०२१ रोजी जाहीर होणार असून, हा निकाल पुढील तीन वर्षे ग्राह्य धरण्यात येणार आहे. गेट २०२१ परीक्षा आयोजित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या समितीचे आयआयटी मुंबईचे संचालक सुभाषिश चौधरी यांनी अभिनंदन केले.

टॅग्स :examपरीक्षा