शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अकरावीचे ८८ टक्के प्रवेश निश्चित; १ लाख ६६ हजार जागा अद्यापही रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 06:35 IST

अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ५८ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी आयटीआय, पॉलिटेक्निक अशा इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे.

मुंबई : यंदाची अकरावी प्रवेश प्रक्रिया संपल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे चार लाख १९ हजार २३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अद्यापही १ लाख ६६ हजार ४२५ जागा रिक्त असल्याचे समजते. त्यामुळे राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत प्रवेशाची टक्केवारी ही ८७.७३ टक्के असून रिक्त जागांची टक्केवारी २८ एवढी आहे. अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ५८ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी आयटीआय, पॉलिटेक्निक अशा इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या, तीन विशेष फेऱ्या आणि २६ सप्टेंबरपासून ते २१ऑक्टोबरपर्यंत दैनंदिन गुणवत्ता विशेष फेऱ्यांचे आयोजन केले होते, तरीही आणखी काही निवडक विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतीक्षेत आहेत. मात्र शिक्षण संचालनालयाकडून आता प्रवेश प्रक्रिया संपली असल्याची माहिती देण्यात आली असून  लवकरच यासंदर्भात कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना देण्यात येणार असल्याचे कळविण्यात  आले आहे. 

मुंबईत प्रमाण अधिक अकरावी प्रवेशासाठी सर्व विभागात उपलब्ध असलेल्या एकूण जागांपैकी मुंबईत अकरावीचे ९० टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत तर नागपूर विभागात सर्वाधिक जागा रिक्त राहिल्या असून रिक्त जागांचे प्रमाण ३७ टक्के आहे. अमरावती विभागात ८४ टक्के , नागपूर विभागात ८७ टक्के , नाशिक विभागात ७२ टक्के तर पुण्यात ८२ टक्के असे राज्यात एकूण ८७ टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. अमरावती विभागात रिक्त जागांचे प्रमाण ३४ टक्के आहे तर मुंबईत हे प्रमाण २६ टक्के आहे, नाशिक विभागात २९ टक्के रिक्त जागा असून पुण्यात हे प्रमाण २९ टक्के आहे. राज्यातील रिक्त जागांचे प्रमाण २९ टक्के आहे.

टॅग्स :Educationशिक्षण