शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

पॉलिटेक्निकच्या ३७ टक्के विद्यार्थ्यांची मराठीला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 05:31 IST

द्विभाषिक अभ्यासक्रमासाठी ३१,१६३ विद्यार्थ्यांचे प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमाकडील आकर्षण वाढत असले, तरी मातृभाषेच्या माध्यमातील शिक्षण अधिक परिणामकारक असते. शिक्षणशास्त्रातील बहुतेक अभ्यासकही मातृभाषेच्या वा परिसर भाषेच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा आग्रह धरत असतात. याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील ३६५ पैकी १६३ तंत्रनिकेतन संस्था द्विभाषिक अभ्यासक्रमाचे धडे देणार आहेत.  प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम (पॉलिटेक्निक) मराठी-इंग्रजीतून विद्यार्थ्यांना यंदापासून शिकता येणार असल्याने यंदा प्रवेश घेतलेल्या ८४ हजार ४५२ पैकी ३१ हजार १६३ विद्यार्थ्यांनी या दोन्ही भाषेतून शिक्षण घेण्याचा पर्याय निवडला आहे.

शालेयच नव्हे, तर उच्च शिक्षण, विशेषत: विज्ञान-तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षणही मातृभाषेच्या माध्यमातून मिळाल्यास ते अधिक परिणामकारक होऊ शकते. अभियांत्रिकी शिक्षणाबाबत असे धोरण आखण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) या अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षणाच्या राष्ट्रीय शिखर संस्थेने पावले उचलली आहेत. त्याला प्रतिसाद देत राज्याने अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम इंग्रजीबरोबरच मराठीतूनही उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.  यामुळे २०२१-२२ पासून व त्या पुढील दरवर्षी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांची अध्यापन प्रक्रिया मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) भाषेत असणार आहे. 

राज्यभरात असलेल्या ३६५ पैकी १६३ संस्थांनी पुढाकार घेत शिकवण्याचा पर्याय स्वीकारला आहे. दोन्ही भाषेत शिक्षण घेण्यासाठी यंदाच्या प्रवेशात तब्बल ८४ हजार ४५२ विद्यार्थ्यांपैकी ३१ हजार १६३ विद्यार्थ्यांनी हा पर्याय निवडला आहे. इंग्रजीसह मराठी भाषेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी सांगितले. 

राेजगारासाठी उपयुक्तरोजगार मिळविण्यासाठी किंवा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त असल्यानेच अभियांत्रिकी पदविकांची मागणी कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी अभियांत्रिकी पदविका हा एक उत्तम पर्याय असल्याचे डॉ. अभय वाघ यांनी अधोरेखित केले.