शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाचे कोट्यांतर्गत १७ हजार ५८९ प्रवेश निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 02:41 IST

आवश्यकतेनुसार भाषिक समूहातील विद्यार्थ्यांनाही मिळणार प्रवेश

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत यंदा इनहाउस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यांतर्गत ८४३ महाविद्यालयांत एकूण १ लाख २३ हजार ४१३ जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत त्यापैकी इनहाउस जागांवर ७०२७, अल्पसंख्याक जागांवर ९८११ आणि व्यवस्थापन जागांवर ७५१ प्रवेश निश्चित झाले आहेत. मुंबई विभागात कोट्यांतर्गत असलेल्या जागांवर आतापर्यंत एकूण १७ हजार ५८९ प्रवेशनिश्चिती झाली आहे.

कोटा प्रवेशाची मुदत संपली असली तरी नियमित फेऱ्यांदरम्यान अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश सुरू राहणार असल्याचे विभागीय संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले. यंदा अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एचएसव्हीसी शाखांच्या मिळून एकूण ३ लाख २० हजार ७२० जागा उपलब्ध आहेत. त्यातील १ लाख ९७ हजार ३०७ जागा या अकरावी केंद्रीय आॅनलाइन प्रवेशासाठी, तर१ लाख २३ हजार ४१३ जागा कोट्यांतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

यंदा शून्य फेरी दरम्यानच कोटा प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण संचालनालयाकडून सर्व विभागीय उपसंचालक कार्यालयांना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, आता कोटा प्रवेशाची प्रक्रिया झाली असली तरी नियमित फेऱ्यांदरम्यान अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातील जागांवरचे प्रवेश सुरू राहणार आहेत.धार्मिक अल्पसंख्याक कोट्याच्या जागा भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांद्वारे भरता येणारअकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३० आॅगस्ट रोजी जाहीर होणार आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयातील ५० टक्के जागांवर धार्मिक अल्पसंख्याक समूहातील विद्यार्थी उपलब्ध होऊ न शकल्यास त्या जागा भाषिक अल्पसंख्याक समूहातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाविद्यालयांना भरणे बंधनकारक आहे. त्यानंतरही अल्पसंख्याक जागा उरल्यास त्या केंद्रीय समितीकडे प्रत्यार्पित करता येतील. त्यानंतर त्या जागांवर केंद्रीय आॅनलाइन पद्धतीने गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जाणार असल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :Educationशिक्षण