शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

राज्यात १५ हजार शाळा, दीड लाख विद्यार्थ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 06:40 IST

२० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्याविरुद्ध शिक्षक-पालक एकी

- अविनाश साबापुरे लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा घाट घातल्याचा आरोप होत आहे. शिक्षण संचालनालयाने प्रत्येक जिल्ह्यातून २० पेक्षा कमी पटाच्या शाळांची माहिती मागविली आहे. ‘लोकमत’च्या पडताळणीत महाराष्ट्रात अशा १४ हजार ९८५ शाळा असून, त्यांचे अस्तित्व लवकरच लोप पावण्याची भीती निर्माण झाली आहे. १५ हजार शाळांमध्ये सरासरी १० इतकी विद्यार्थी संख्या गृहित धरली तरी एक लाख ४९ हजार ८५० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गहन प्रश्न निर्माण होणार आहे. जाणकारांनी एकत्र येत ‘शिक्षण बचाव कृती समिती’ तयार केली आहे. 

२०१७ मध्ये शासनाने हा प्रयोग केला होता. तो आम्ही आंदोलनाने हाणून पाडला. शनिवारी केजी टू पीजी सर्व संघटना, पालक संघटना, शिक्षणतज्ज्ञ यांची सभा पुणे येथे आयोजित केली आहे.  - मधुकर काठोळे, राज्य समन्वयक, कृती समिती

नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्रमुंबई : शाळा बंद करण्याच्या कार्यवाहीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या शाळा बंद करण्याची कार्यवाही थांबवा, अशी मागणी केली आहे. 

१८ हजार शिक्षकांच्या नोकरीचे काय?२० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद झाल्यास सुमारे १५ हजार शाळांमधील १८ हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. यापूर्वी राबविण्यात आलेल्या समायोजन प्रक्रियेतील घोळ लक्षात घेता, एवढ्या मोठ्या प्रमाणातील शिक्षकांचे समायोजन करताना शिक्षण खात्याची दमछाक होणार आहे. 

२० पेक्षा कमी पटाच्या जिल्हानिहाय शाळाकोकण विभाग : मुंबई ११७, पालघर ३१७, ठाणे ४४१, रत्नागिरी १,३७५, सिंधुदुर्ग ८३५, रायगड १,२९५.  नाशिक विभाग : नाशिक ३३१, जळगाव १०७, अहमदनगर ७७५, धुळे ९२, नंदूरबार १८९.  पुणे विभाग : पुणे १,१३२, सातारा १,०३९, सोलापूर ३४२, सांगली ४१५, कोल्हापूर ५०७.  औरंगाबाद विभाग : औरंगाबाद ३४७, बीड ५३३, जालना १८०, लातूर २०२, नांदेड ३९४, उस्मानाबाद १७४, परभणी १२६, हिंगोली ९३.  नागपूर विभाग : नागपूर ५५५, गोंदिया २१३, गडचिरोली ६४१, चंद्रपूर ४५१, वर्धा ३९८, भंडारा १४१.  अमरावती विभाग : अमरावती ३९४, अकोला १९३, बुलडाणा १५८, वाशिम १३३, यवतमाळ ३५०.

टॅग्स :Schoolशाळा