शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाइनच; दहावी १५ मार्च, बारावी ४ मार्चला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 07:13 IST

यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन म्हणजेच नियमित मूल्यांकन पद्धतीने होणार.

मुंबई : यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन म्हणजेच नियमित मूल्यांकन पद्धतीने होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. सोबतच दहावीच्या लेखी परीक्षा १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ यादरम्यान, तर बारावीच्या लेखी परीक्षा ४ मार्च २०२२ ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान पार पडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दहावी व बारावीचे वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून तयार होते. मात्र, बऱ्याच दिवसांपासून ते सरकारी पातळीवर मंजुरीसाठी प्रलंबित होते. अखेर शिक्षण विभागाकडून या वेळापत्रकाला मंजुरी मिळाली आहे. यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी/ अंतर्गत गुणांच्या परीक्षा या २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान, तर बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी/ अंतर्गत परीक्षा या १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ दरम्यान पार पडतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करीत परीक्षा व्यवस्थितरीत्या पार पडल्यानंतर बारावीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत, तर दहावी परीक्षेचा निकाल जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांपर्यंत जाहीर करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न राहील, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

उर्वरित अभ्यासक्रमावरच परीक्षाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत उर्वरित अभ्यासक्रमावरच प्रश्न विचारले जाणार आहेत. याशिवाय प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आउट ऑफ टर्न परीक्षा ५ ते २५ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ५ ते १९ एप्रिल २०२२ या कालावधीत होणार आहे.

सीबीएसई परीक्षा केंद्रे दुपटीपेक्षा अधिकइयत्ता १० वी व १२ वीच्या सत्र परीक्षेच्या केंद्रांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ करण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.

१० वी व १२ वीच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या जात आहेत. यासाठी देशात ६ हजार केंद्रे होती. परंतु, कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा केंद्रांची संख्या १४ हजार करण्यात आली. या परीक्षा ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सीबीएसईने प्राधान्य दिले असून यासाठी हा निर्णय घेतल्याचे सीबीएसईने  पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :examपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रVarsha Gaikwadवर्षा गायकवाड