शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अपना भी टाईम आयेगा !

By सचिन जवळकोटे | Updated: February 24, 2019 10:14 IST

रक्ताळलेल्या पाठींना पुन्हा खंजिरांची आपुलकी

 लगाव बत्ती- सचिन जवळकोटे

थोरल्या काकांच्या एका इशाºयावर अकलूजकरांनी केवळ आपली खासदारकीच नव्हे तर अख्ख्या घराण्याचं राजकीय भवितव्यही बारामतीकरांच्या चरणी अर्पण केलं, याला म्हणतात हतबलता. वाºयानंही लाजून चूर व्हावं इतक्या वेगानं संजयमामा निमगावकरांनी फिरविली आपली राजकीय पाठ. याला म्हणतात व्यावहारिक चतुरता. ‘दादा अन् मामां’च्या जीवावर माढ्याची निवडणूक जिंकण्याची स्वप्नं पाहणाºया सुभाषबापू अँड टीमला ताकदीचा उमेदवार मिळू शकला नाही. याला म्हणतात स्वप्नरंजनाची अगतिकता. तरीही प्रत्येकजण म्हणतोय, ‘अपना भी टाईम आयेगाऽऽ’

...म्हणून लोकसभेची तयारी ! सुगीच्या दिवसात हुश्शार शेतकरी भरल्या पिकात बुजगावण्याचा करून घेतो वापर. अगदी तस्साऽऽच प्रकार लोधवडेकरांच्या बाबतीत झाला. थोरले काका बारामतीकरांचं नाव सांगून ते अख्खा मतदारसंघ फिरले. गावोगावच्या कार्यकर्त्यांची मानसिकता टिपून त्याचा रिपोर्ट त्यांनी बारामतीकरांना सादर केला. काही दशकात त्यांनी हेच काम प्रामाणिकपणे केलं होतं, हा भाग वेगळा. मात्र, या अहवालातलं गांभीर्य ओळखून थोरल्या काकांनी नेम लावला. एका दगडात किमान चार-पाच पक्षी खाली पडत नाहीत तोपर्यंत ते दगड उचलत नाहीत म्हणे...इथंही तसंच झालं. अकलूजकरांसोबत निमगावकरांनाही त्यांनी शांत केलं. प्रभाकर लोधवडेकरांचीही रोजची दगदग थांबविली. निकालानंतर यदाकदाचित त्रिशंकू अवस्था निर्माण झाली तर ‘भावी पंतप्रधान’ म्हणून चर्चेला वाव देण्यासाठी राज्यसभेऐवजी लोकसभेची सोय झाली. नेहमीप्रमाणं याहीवेळी मनासारखं घडलं नाहीतर किमानपक्षी ‘कृषीमंत्री’ पद तर मुकणार नाही, याचीही शाश्वती बाळगण्याची परिस्थिती निर्माण केली. एक खेळी...

..अनेक बळी ! ...परंतु बारामतीकरांच्या एका खेळीत किती जणांचा राजकीय बळी गेला? थोरले दादा अकलूजकर अडीच महिन्यानंतर ‘माजी खासदार’ म्हणून ओळखले जाणार. अकलूजकरांना पाडून जिल्हाभर आपली ताकद दाखविण्यासाठी आसुसलेल्या संजयमामांवर आता ‘घड्याळ घ्या घड्याळ’ म्हणत माढा-करमाळ्यात फिरण्याची वेळ आली. गेल्या विधानसभेला त्यांच्या स्वत:च्या निमगावात घड्याळाला बोटावर मोजण्या इतकी मतं मिळालेली. आता लोकसभेला पुन्हा इथं ते ‘घड्याळ’ वाजवतील,  तेव्हा पुढच्या विधानसभेला याच चिन्हाला  नको कसं म्हणतील ? गोची...भलतीच गोची...

सुशीलकुमार माढ्यात......तर बारामतीकर सोलापुरात ! खरंतर बारामतीकरांची इच्छा नव्हतीच. केवळ सोलापूर जिल्ह्याचा खूपच आग्रह (!) झाल्यामुळे म्हणे त्यांनी इथं उभारण्याचा निर्णय घेतला. त्याचा एक मोठा इफेक्ट झाला. वर्षानुवर्षे एकमेकांवर खंजीर उगारणारे हात अकस्मातपणे गळ्यात पडले. रक्ताळलेल्या पाठींना धारदार खंजिरांची उगाचंच आपुलकी वाटू लागली. अकलूजमधल्या पाटलांचा वाडा निमगावातल्या शिंदेंच्या गढीत पाहुणचारासाठी पोहोचला. पंगती झडल्या. खाल्ल्या मिठाला जगण्याच्या शपथाही घेतल्या गेल्या. राहता राहिला विषय संजयमामांचा. ते कुणाच्या मिठाला जागणार याचा शोध म्हणे अद्याप त्यांनाच लागला नाही. जाऊ द्या सोडा. देशमुख मालकांचं मीठच अळणी.( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकlok sabhaलोकसभा