शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नाना तुम्हारा चुक्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:12 IST

गेल्या दोन-अडीच वर्षांत इनकमिंग झालेल्या नावावर नजर टाकली तर मुंबईचे दहीहंडी फेम राम कदम मनसेतून आले.

- सुधीर महाजनगेल्या दोन-अडीच वर्षांत इनकमिंग झालेल्या नावावर नजर टाकली तर मुंबईचे दहीहंडी फेम राम कदम मनसेतून आले. तसे प्रवीण दरेकरही मनसेचेच. पुण्याचे खा. संजय काकडे, काटोलचे आमदार आशिष देशमुख, धुळ्याचे अनिल गोटे, शिवाजीराव नाईक, अनिल बोंडे, गंगापूरचे प्रशांत बंब, किसन कथोरे आणि राष्ट्रवादीत असलेले प्रसाद लाड यांनाही भाजपने पावन करून घेतले.या नाना मंडळींना झालंय तरी काय? तिकडे खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्याचा अगोचरपणा केला नाही तर थेट पक्षच सोडला. खासदारकीवर पाणी सोडले. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी एवढी शर्यत असताना नाना पटोलेंना म्हणावे तरी काय? दुसºया नानाची कथा आणखी वेगळी. ते म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे. त्यांनीही आता खरे खरे बोलण्याचे ठरवले आहे का? औरंगाबादेत भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ‘मर्डरर म्हणजे खुनी आणि वेडे सोडून भाजपमध्ये कोणालाही प्रवेश देतात असे वक्तव्य करून त्यांनी धमाल उडवून दिली.नानांना नेमके म्हणायचे होते तरी काय? खुनी हा शब्द आपण समजू शकतो, पण वेडा कोणाला म्हणायचे? तसा विचार केला तर ज्यांच्यासमोर नाना बोलत होते ते पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते. अगदी जनसंघापासून त्यांची ही निष्ठा. लोकसभेत भाजपचे केवळ दोन खासदार असताना पक्ष जिवंत ठेवण्यासाठी घरची भाकरी खाऊन बाहेर किल्ला लढवलेली ही मंडळी. भाजपच्या आजच्या प्रभावळीतून त्यांची नावे गायब आहेत. यांना अजिबात सत्तास्पर्श नाही. पक्ष जिवंत ठेवण्यासाठी या निष्ठावंतांनी सर्व पणाला लावले. बागडेंना हे ‘वेडे’ अपेक्षित आहेत का? कारण आजच्या भाजपच्या राजकीय संस्कृतीत हे ‘मिस फिट’ असल्याने वेडेच ठरतात. हवेचा रोख बदलून दिशा बदलणाºयांचा हा काळ आहे. हा बदल ज्यांच्या ध्यानात येतो व मार्ग बदलण्याचा चाणाक्षपणा दाखवतात, ते आजच्या राजकारणात हुशार ठरतात. म्हणजे बागडेंच्या म्हणण्याप्रमाणे ते वेडे नसतात. निष्ठावान मंडळींना नेमके हेच जमले नाही. भाजपमध्ये निष्ठावंत दुर्लक्षित झाले ही सल सगळ्या जुन्या-जाणत्यांना बोचते. जेथे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी अडगळीत गेले तेथे एकेकाळच्या गावपुढाºयांचे काय? स्टार्टअप इंडियासाठी शार्प ब्रेन असणारी स्मार्ट पिढीची डिमांड आहे. त्यात निष्ठावानांना स्थान नाही. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना बोचणारे शल्य एकच. इतकी वर्षे संघर्ष करीत पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे तप केले तर ‘हेचि फळ काय मम तपाला’ कारण हा कार्यकर्ता आज दुर्लक्षित आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता आली असताना जुने अडगळीत लोटले गेले. नव्या नेत्यांना तर जुने व्यासपीठावरही नको असतात. काहींनी भावना व्यक्त केल्या. गुळाला मुंगळे लागतात तसे सत्तेभोवती अशा मुंगळ्यांची गर्दी होणार, पण गूळ त्यांना फस्त करू द्यायचा का, हाच त्यांचा रोकडा सवाल आहे. पक्षात लोक आले, तर विस्तार होईल, शक्ती वाढणार, पण येणाºया प्रत्येकालाच खांद्यावर घेणार का? जुन्यांच्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची गैरहजेरी जाणवली. ते येणार होते, पण ऐनवेळी ते भाजपमध्ये नव्यानेच आलेल्या एका नेत्याच्या शक्तिप्रदर्शन कार्यक्रमात सामील झाले. त्यांची ही गैरहजेरीसुद्धा चर्चेचा विषय झाला.दोन महिन्यांपूर्वी सुरेश हिरे यांनी औरंगाबाद शहरातील जुन्या कार्यकर्त्यांची अशीच बैठक बोलावली होती. त्यानंतर ही मोठी बैठक झाली. ती दयाराम बसैये बंधूंच्या पुढाकाराने. घरोघर, गावोगाव जाऊन त्यांनी या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. देवजीभाई पटेल, रामभाऊ गावंडे, जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, पांडुरंग बनकर, भाऊसाहेब दहीहंडे, कन्हैयालाल सिद्ध, सुरेश हिरे, ही एकेकाळची आघाडीची मंडळी एकत्र आली. निमित्त होते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या वाढदिवसाचे. जुन्या कार्यकर्त्यांनी म्हणजे बागडेंच्या भाषेत वेड्यांनी गाळलेला घाम, सांडलेल्या रक्तामुळे पक्ष वाढला, त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे, अशी भावना व्यक्त झाली. ‘पदरी पडले आणि पवित्र झाले’ अशी स्थिती भाजपमध्ये येणाºयांची आहे. म्हणून अनेक जण पापक्षालनासाठी निघाले आहेत. वेड घेऊन पेडगावला जाणाºयांना विरोध नानांनी केला, पण बेरकेबाज राजकारण्याच्या भाषेत सांगायचे तर ‘नाना तुम्हारा चुक्याच’ 

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडे