शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

राजकारणात तरुणांनी येऊ नये... सल्ला पार्थला की रोहितदादांना?

By सचिन जवळकोटे | Updated: February 4, 2021 05:50 IST

Maharshtra Politics : ‘राजकारण लऽऽय बेक्काऽऽर’ असं सांगत दादांनी तरुणांना राजकारणात उतरू नका, असा सल्ला दिलाय... पण हा सल्ला नेमका कुणाला?

- सचिन जवळकोटे(निवासी संपादक, लोकमत, सोलापूर) 

भूतलावर काहीतरी धप्पऽऽकन्‌ पडल्याचा जोरदार आवाज इंद्र दरबारापर्यंत पोहोचला. सारेच दचकले. अप्सरा म्हणाली, ‘अगंबाई, गेल्या शतकातील स्कायलॅब-बियलॅबसारखा कोणता उपग्रह आदळला की वाटतं...’  यावर उर्वशी उत्तरली, ‘शेतकऱ्यांचं आंदोलन सहजपणे चिरडू, या दिल्ली पोलिसांच्या दिवास्वप्नाचा फुगा फुटला ना, त्याचाच हा आवाज.’ नारद बोलले, ‘होय. फुगा फुटल्याचाच आवाज, परंतु हा फुगा गावोगावातील तरुणांच्या स्वप्नांचा. विशेष म्हणजे, तो फोडलाय खुद्द दादा बारामतीकरांनी,’ इंद्र महाराजांना हसू फुटलं, ‘गेल्या वर्षी उगाउगी फुगाफुगी करणारे दादा आता चक्क फुगे फोडायचे काम करू लागलेत वाटतं.  काय केलं त्यांनी नेमकं?...’ तेव्हा मुनी म्हणाले, ‘राजकारण लऽऽय बेक्काऽऽर असं सांगत दादांनी राजकारणात उतरू हे ऐकून कुणीतरी हळूच पुटपुटलं, ‘मग यापुढे कोणत्याही निवडणुकीत पार्थ उतरणार नाही की काय? ’ - तेव्हा गालातल्या गालात हसत मुनी उत्तरले, ‘हा सल्ला पार्थसाठी नव्हता हो. बहुधा रोहितदादांसाठी असावा!’ मग काय... दादांचा सल्ला नेमका कुणाला, याचा विचार दरबारातील प्रत्येक जण करू लागला.  ‘असे एक से एक सल्ले देणारे कोण-कोण आहेत या भूतलावर, त्याचा शोध घ्या,’ इंद्रदेवांनी आदेश काढला.नारद निघाले. सर्वप्रथम त्यांना जाकीटवाले नेते ‘आठवले’. दाढी खाजवत ते ‘ट्रम्प-बायडेन यांनी कसं वागायला हवं,’ याचा सल्ला देण्यात गुंग होते. गल्लीत आपले चार कार्यकर्ते निवडून आणण्याऐवजी विश्वाचीच चिंता करणाऱ्या या आधुनिक ‘राजकीय कविवर्यां’ना शुभेच्छा देत मुनी ‘अकोल्या’च्या ‘बाळासाहेबां’ना भेटले. ‘सरकार कसं चालवायला हवं?’ हा सल्ला देण्यात डॉक्टरही नेहमीप्रमाणे रमले होते. मुनींना आश्चर्य वाटलं... आजपर्यंत एकदाही सत्तेवर येऊ न शकलेले नेते जगाला कसं काय सत्ताकारणाचे सल्ले देऊ शकतात?आजकाल केवळ दुरूनच सल्ला देण्यापुरते ‘सुशीलकुमार’ तोंड उघडतात, अशी माहिती मिळताच मुनी थेट सोलापुरात पोहोचले. मात्र, तिथे उलटंच दिसलं. चक्क रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात ते रमले होते. ‘अकलूज’मधील ‘सिंहां’च्या कळपातून ‘धवल’ छाव्याला अलगद उचलून घेणारे ‘सुशीलकुमार’ आता बारामतीकरांनाही चॅलेंज देण्यास मागंपुढं पाहणार नाहीत, हे मुनींच्या लगेच लक्षात आलं. लातूरच्या ‘धीरज भैय्यां’सोबत घड्याळाचे काटे उलटे  फिरविण्याचीही रणनीती आखली गेलीय, हेही मुनी समजून चुकले, तरीही तिथून निघताना ते थोडेसे मनातल्या मनात चुकचुकले, ‘पाच-सहा वर्षांपूर्वींच अशी आक्रमक भूमिका घेतली असती, तर आज कार्यकर्त्यांसोबत आंदोलन करण्याची वेळ आली नसती,’ असा विचार करत नारद मुनींनी पुणं गाठलं.तिथं काकडेंचे संजय महाराष्ट्राचा नकाशा घेऊन बसलेले. चंदूदादा कोथरूडकरांना गडहिंग्लजमधून निवडून आणायचं की गडचिरोलीतून, याचा अभ्यास सुरू होता. कधी ‘हात’वाल्यांसोबत सलगीच्या तर कधी ‘घड्याळ’वाल्यांच्या गोटात प्रवेशाच्या बातम्या पेरण्याएवढं सोप्पं वाटलं की काय ते, असं स्वतःलाच विचारत मुनी मग मुंबईकडे रवाना झाले.नव्या मुंबईतल्या रस्त्यावर भाजी विकत घेणारे रोहितदादा बारामतीकर मुनींना दिसले. ‘ब्रॅण्डिंग’वाली टीम होतीच दिमतीला. ‘काय दादाऽऽ आजकाल तुम्ही बारामतीत कमी अन् अख्ख्या महाराष्ट्रात जास्त दिसताय. तुमच्या मोठ्या दादांचा टीआरपी मोडीत काढण्याचा चंगच बांधलेला दिसतोय तुम्ही,’ मुनींनी गुगली टाकली. तसे रोहितदादा चमकले. हळूच कानात खुसखुसत त्यांनी ब्रेकिंग न्यूजही देऊन टाकली.. ‘भविष्यात सीएमच्या खुर्चीसाठी घरातच स्ट्राँग ऑप्शन तयार करायचा असेल, तर आत्तापासूनच अवघा महाराष्ट्र पालथा घालावा लागेल हा थोरल्या काकांचाच सल्ला आहे म्हटलं.’ मुनी मनातल्या मनात म्हणाले, ‘नारायणऽऽ नारायणऽऽ’... आणि मुकाट इंद्रलोकाकडे रवाना झाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र