शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

दिखाई दिये यूँ... हमें आप से भी जुदा कर चलें!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 01:12 IST

खय्याम साहेबांना संगीताखेरीज आणखी एक आवड होती, ती म्हणजे गप्पा मारायची.

- संजीव साबडे (समूह वृत्तसमन्वयक, लोकमत)आपल्याला काही ठरावीक गाणी आवडतात, याचे मुख्य कारण त्यांना दिलेल्या चाली हेच असते. एखादी चाल आवडली की ते गाणे आपल्याला आवडते आणि लक्षातही राहते. नंतर ते आपण सतत गुणगुणू लागतो. चालीशिवाय गाणे लक्षात राहणे अवघड वा अशक्यच असते. त्यामुळे गाण्यांना दिलेली चाल वा संगीत याचे स्वत:चे एक वैशिष्ट्य आहे. याची प्रकर्षाने जाणीव व्हावी, अशी गाणी जुन्या पिढीतील अनेक संगीतकारांनी दिली. आपणच काय, पण लहान मुलेही तीच जुनी गाणी अलीकडे गाताना दिसतात. अशा या जुन्या पिढीतील खय्याम साहेब सोमवारी रात्री निवर्तले. ते बराच काळ आजारी होते आणि वयाची ९२ वर्षेही त्यांनी पार केली होती. त्यामुळे त्यांचे जाणे फारसे धक्कादायक नसले, तरी दु:खदायक मात्र आहे.

गुलाम मोहमद, नौशाद अशा जुन्या पिढीतील खय्यामसाहेब अगदी आतापर्यंत संगीत क्षेत्रात सक्रिय होते. त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट २0१६ सालचा. तो प्रदर्शित झाला नसला तरी वयाच्या नव्वदीपर्यंत त्यांच्या रोमारोमात संगीत असल्याचा तो पुरावा होता. त्यांचे पूर्ण नाव मोहमद जहूर खय्याम हाश्मी असले तरी संगीतप्रेमींसाठी ते खय्यामच होते. जवळपास ६८ वर्षे ते चित्रपटांना आणि त्यांतील गीतांना संगीतबद्ध करीत राहिले. मात्र एवढ्या काळात त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची संख्या ६0 च्या आतच आहे. याचे कारण त्यांनी संगीतकार म्हणून कधी घाई केली नाही. चित्रपटांचे विषय पाहून त्यांनी आपण त्याला संगीत देऊ शकतो की नाही, हे ठरविले. बहुधा त्याचमुळे त्यांनी संगीत दिलेली बहुसंख्य गीते अतिशय लोकप्रिय झाली.

खय्याम म्हणताच आठवतात ‘कभी कभी’, ‘उमराव जान’, ‘बाजार’ या चित्रपटांतील गाणी. कभी कभी चित्रपटात प्रेमाचा बाजार नव्हता. उमराव जान हाही बाजारी चित्रपट नव्हता आणि बाजार हा तर प्रत्यक्षात हळवा चित्रपट म्हणता येईल. खय्याम साहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गाण्यांना जो संगीताचा बाज चढवला, तोही तशाच प्रकारचा होता. पहाडी राग हा त्यांचा खास आवडता राग. त्या रागात त्यांनी अनेक फिल्मी गीते संगीतबद्ध केली.

खय्याम साहेबांनी संगीत दिलेले बाजारमधील ‘हम है मता ए कुचा, ओ बाजार की तरह’ वा ‘दिखाई दिये यूँ के बेखुद किया, हमे आप से भी जुदा कर चले’ हे गाणे असो, ते त्या शब्दांमुळे लक्षात राहूच शकत नाही. ते लक्षात राहते ते केवळ संगीताच्या बाजामुळे. वो सुबह कभी तो आएगी आणि आसमां पे है खुदा और जमीं पे हम, (फिर सुबह होगी), बहारों, मेरा जीवन भी सवारो (आखरी खत), ए दिले नादान (रझिया सुलतान), दिल चीज क्या है, इन आखों की मस्ती के, ये क्या जगह है दोस्तो (उमराव जान) अशी शेकडो गाणी आजही संगीतरसिकांना भुरळ घालतात. याशिवाय खानदान, थोडीसी बेवफाई, त्रिशूल, नूरी, आहिस्ता आहिस्ता, पर्बत के उस पार अशा त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांतील गाणी आजही मनात रुंजी घालत राहतात.

त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांचे आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात निष्कारण वाद्यांचा धांगडधिंगा आढळत नाही. वाद्यांचा बारकाईने वापर करणे आणि तालवाद्यांचा अतिवापर नसणे ही खय्याम साहेबांच्या संगीताची वैशिष्ट्ये. त्यामुळे त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांचे शब्द लक्षात राहिले नाहीत, असे होत नाही. किंबहुना गाण्यातील भावना व शब्द रसिकांपर्यंत नीट पोहोचावेत, असाच त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांनी संगीत दिलेल्या ‘शगुन’ चित्रपटातील ‘तुम अपना रंज-ओ-गम, अपनी परेशानी मुझे दे दो’ हे गाणे तर खूपच गाजले. खय्याम साहेबांच्या पत्नी जगजीत कौर यांनी ते गायले होते.

खय्याम साहेबांना संगीताखेरीज आणखी एक आवड होती, ती म्हणजे गप्पा मारायची. गप्पांत ते अनेक आठवणी सांगत, एखाद्या गीताचे संगीत कसे सुचले, ते सांगत. फोनवर असो की समोरासमोर बसलेले असो, ते गप्पांमध्ये रंगून जात. त्यांना फिल्मफेअरचे अनेक पुरस्कार मिळाले, संगीत नाटक अकादमीने त्यांचा गौरव केला आणि ^‘पद्मभूषण’ किताबही त्यांना मिळाला; पण खय्याम प्रसिद्धीच्या मागे मात्र धावले नाहीत. मी ओळखला जातो संगीतकार म्हणून. त्यामुळे मी नव्हे, तर माझे संगीतच बोलते, असे ते म्हणत. त्यांनी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून आपली सारी संपत्ती ट्रस्टला दिली होती. आपण व पत्नी यांचे फार आयुष्य शिल्लक नाही, हे ते ओळखून होते. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील गरजू तंत्रज्ञ व कलाकार यांना त्या ट्रस्टद्वारे ते मदत करीत. चित्रपटांतून आलेला पैसा त्यांनी पुन्हा चित्रपटांसाठीच दिला, असे म्हणता येईल.

टॅग्स :Mohammed Zahur Khayyamमोहम्मद जहूर खय्याम