शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

जीएसटी अंमलबजावणीनंतरचे रिटर्न भरताना काळजी गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 4:55 AM

अर्जुन ( काल्पनिक पात्र) : कृष्ण, आर्थिक वर्ष संपल्यानंतर, सर्वत्र वार्षिक रिटर्नच्या संदर्भात चर्चा सुरू आहे़ ते काय आहे? ...

अर्जुन ( काल्पनिक पात्र) : कृष्ण, आर्थिक वर्ष संपल्यानंतर, सर्वत्र वार्षिक रिटर्नच्या संदर्भात चर्चा सुरू आहे़ ते काय आहे?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जीएसटीआर-९ हे वर्षातून एकदा दाखल करणे आवश्यक आहे़ यात करदात्याला खरेदी व विक्रीचा तपशील द्यावा लागेल.़ वार्षिक रिटर्न हे मासिक किंवा रिटर्नमध्ये दिलेली माहिती एकत्रित करून देणे़अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर-९ दाखल करणे कोणाला आवश्यक आहे? व ते दाखल करणे आवश्यक आहे का?कृष्ण : अर्जुना होय, नोंदणीकृत व्यक्तीने जीएसटीआर-९ दाखल करणे आवश्यक आहे.अर्जुन : कृष्णा, त्यात काही अपवाद आहेत का?कृष्ण : अर्जुन, प्रत्येक नोंदणीकृत व्यक्तीला जीएसटीआर-९ दाखल करणे आवश्यक आहे. तथापि, खालील व्यक्ती याला अपवाद आहेत़* इनपुट सेवा वितरक,* प्रासंगिक करपात्र व्यक्ती आणि* अनिवासी करपात्र व्यक्ती.* कलम ५१ (टीडीएस) किंवा कलम ५२ (टीसीएस) अंतर्गत कर भरणारे,कलम ५२ (टीसीएस) अंतर्गत कर भरणाऱ्या व्यक्तीने जीएसटीआर-९ बी दाखल करणे आवश्यक आहे, परंतु सेक्शन ५२ ची तरतूद केवळ १ आॅक्टोबर, २०१८ पासून लागू आहे, तर २०१७-१८ वर्षासाठी त्यांना जीएसटीआर-९बी दाखल करण्याची आवश्यकता नाही.हीदेखील लक्षात घेतली पाहिजे की, कम्पोजिशनमधील करदात्यांना जीएसटीआर-९अ दाखल करणे आवश्यक आहेअर्जुन : कृष्ण, जीएसटीआर-९ फॉर्ममध्ये कोणत्या तपशिलांची आवश्यकता आहे?कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर-९ हे ६ भाग आणि १९ टेबलमध्ये विभागले गेले आहे :भाग १ : हा आर्थिक वर्ष, जीएसटी नंबर कायदेशीर आणि व्यवसायिक नावे यासारखी मूलभूत माहिती विचारतो व ही माहिती स्वयंपूर्ण होईल.भाग २ : हा एक भाग आहे, जिथे करदात्याने वित्तीय वर्षादरम्यान जाहीर केलेल्या आवक आणि जावक पुरवठ्याची माहिती द्यावी लागेल़ वित्तीय वर्षामध्ये दाखल केलेल्या सर्व जीएसटी रिटर्न्स एकत्रित करून त्याची माहिती द्यावी लागेल़भाग ३ : या भागात करदात्याला रिटर्न्समध्ये जाहीर केल्याप्रमाणे इनपुट टॅक्स क्रेडिटची माहिती द्यावी लागेल़ इनपुट टॅक्सच्या तपशिलात न मिळणाºया टॅक्स क्रेडिटचे रिव्हर्स करावे लागेल़भाग ४ : या भागात करदात्यांनी मागील आर्थिक वर्षात भरलेल्या करांचे तपशील द्यावे लागेल़भाग ५ : या भागात मागील वर्षातील दुरुस्तीची माहिती द्यावी लागेल़भाग ६ : या भागात, करदात्याला इतर माहिती द्यावी लागेल, म्हणजेच कम्पोजिशन करदात्याकडून केलेल्या खरेदीची माहिती़ एचएसएननुसार खरेदी व विक्री, डिमांड व रिफंड, लेट फिस इत्यादींची माहिती द्यावी लागेल़अर्जुन : कृष्णा, ज्या करदात्यांनी ३१ मार्च, २0१८ च्या पूर्वी नोंदणी रद्द केली असेल, तर त्यांना जीएसटीआर-९ दाखल करावे लागेल का?कृष्ण : अर्जुना, होय, ज्या करदात्यांनी ३१ मार्च, २0१८ च्या पूर्वी नोंदणी रद्द केली असेल, तर त्यांना जीएसटीआर-९ दाखल करावे लागेल.अर्जुन: कृष्णा, जीएसटीआर-९ ज्या करदात्याची उलाढाल काहीच नाही, त्यांना वार्षिक रिटर्न दाखल करणे गरजेचे आहे का?कृष्ण: होय, ज्या करदात्याची वार्षिक उलाढाल काहीच नाही, त्यांनाही वार्षिक रिटर्न दाखल करणे गरजेचे केले आहे.अर्जुन: कृष्णा, जीएसटीआर-९ दाखल करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?कृष्ण: अर्जुना, जीएसटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३0 जून, २0१९ आहे.अर्जुन: कृष्णा, जर करदात्यांनी जीएसटीआर-९ दाखल केले नाही, तर काय होईल?कृष्ण: अर्जुन, करदात्यांनी देय तारखेच्या आत जीएसटीआर-९ न दाखल केल्यास लेट फी देण्याची तरतूद आहे. ती खालीलपैकी जी जास्त रक्कम होईल ती:अ) राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या करदात्याच्या उलाढालीच्या २.५ टक्के.ब) प्रत्येक दिवसाला सीजीएसटी आणि एसजीएसटीसाठी प्रत्येकी १00 रुपये.अर्जुन: कृष्णा, यातून काय बोध घ्यावा?कृष्ण: अर्जुना, जीएसटीच्या अंमलबजावणीपासून हे प्रथम वार्षिक रिटर्न असेल. हे प्रथम वार्षिक रिटर्न असल्यामुळे करदात्याला काळजी घ्यावी लागेल. या वार्षिक रिटर्नमध्ये संपूर्ण वर्षामधील गेलेल्या रिटर्न्समधील माहिती एकत्रित करून द्यावी लागेल व यामध्ये इनपुट टॅक्सच्या क्रेडिटची रक्कम बदलता येणार नाही, परंतु अतिरिक्त रक्कम भरावयास निघत असेल, तर ती भरावी लागेल.करनिती भाग २८६उमेश शर्मा । सीए