शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

पर्यटन विकासाचा ध्यास घेतलेली कार्यकर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 05:10 IST

पतीच्या निधनानंतर कोल्हापुरातच स्थायिक होण्याचा निर्णय. त्यानंतर मग कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न. ६२ वर्षांमध्ये ५२ देश फिरणारी ही पर्यटन अभ्यासिका, लेखिका, कार्यकर्ती अरुणा जगदीश देशपांडे.

- समीर देशपांडे (वरिष्ठ वार्ताहर, कोल्हापूर)पार्ल्यातील ही मध्यमवर्गीय मुलगी. शिक्षणानंतर २0 वर्षे पर्यटन कंपनीमध्ये नोकरी. लग्नानंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या भारतातील एका मोठ्या राजकीय नेत्यासमवेत काम. पतीच्या आजारपणामुळे महाराष्ट्राच्या एका टोकाला कोल्हापूरला वास्तव्य. पतीच्या निधनानंतर कोल्हापुरातच स्थायिक होण्याचा निर्णय. त्यानंतर मग कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न. ६२ वर्षांमध्ये ५२ देश फिरणारी ही पर्यटन अभ्यासिका, लेखिका, कार्यकर्ती अरुणा जगदीश देशपांडे.पर्यटन कंपनीमध्ये नोकरी करताना त्यांनी त्यातील सगळे बारकावे समजून घेतले. मराठी, हिंदी, इंग्रजी उत्तम बोलत असताना जर्मन भाषाही शिकून घेतली; त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांसमवेत अरुणा असणारच. कोल्हापुरातही परदेशी पर्यटक आले, की हॉटेल मालक संघाच्या उज्ज्वल नागेशकर, सिद्धार्थ लाटकर यांचा फोन अरुणा देशपांडे यांना जायचा. जग फिरताना भारतामधील अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत; परंतु पर्यटक तिथं जात नाहीत; त्यामुळेच त्यांनी ‘बुद्धिस्ट इंडिया रिडिस्कव्हर्ड’ पुस्तक लिहिलं. त्याला जगभरातून मागणी सुरू झाली. कोल्हापूरच्या पर्यटनावर त्यांनी ‘या माझ्या कोल्हापुरी’ हे पुस्तक लिहिलं. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, दलाई लामा यांसारख्या मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील हाजगोळी (ता. आजरा) येथील जगदीश देशपांडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. जगदीश हे जॉर्ज फर्नांडिस यांचे सहकारी; त्यामुळे साहजिकच अरुणा यांचा फर्नांडिस यांच्याशी संपर्क आला. या दोघांनी जॉर्ज यांच्यासाठी खूप काम केलं. जगदीश पाटण्यात राहून, तर अरुणा या मुंबईत असूनही कार्यरत होत्या. जगदीश यांच्या आजारपणामुळे अरुणा या कोल्हापुरात आल्या. जगदीश यांच्या निधनानंतर कोल्हापुरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.कोल्हापुरात राहिल्यानंतर मग त्यांचा विचार सुरू झाला. नेहमीच वेगळा विचार करण्याचा आणि स्वत:ला पटेल ते बोलण्याचा स्वभाव असल्याने त्या कोल्हापूरला परदेशी पर्यटक का पसंती देत नाहीत, यावर रोखठोक बोलायच्या. कोल्हापूर, विजापूर आणि गोवा हा पर्यटनासाठीचा सुवर्ण त्रिकोण आहे. तो शासनाने विकसित करण्याची गरज त्या नेहमी बोलायच्या. कोल्हापूरची मराठमोळी संस्कृती, विजापूरची मुस्लीमप्रभावी जीवनशैली आणि गोव्याची आधुनिक आणि ख्रिश्चन संस्कृतीचा प्रभाव असणारी जगण्याची पद्धत. अशा तीन वैविध्यपूर्ण संस्कृती आपल्याला पर्यटकांना केवळ चार, पाच दिवसांत दाखवता येतील, असे त्यांचे म्हणणे होेते. बुद्धप्रिय असणाऱ्या भारतातील स्थळांची माहिती देणारे पुस्तक प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी प्रभू रामचंद्रांनी ज्या मार्गाने वनवास पूर्ण केला, तो प्रवास करून पुस्तक लिहिण्याचा त्यांचा मनोदय होता. ‘भारतातील प्राचीन ॠषी’ या विषयावरही त्यांचे काम चालले होते.कोल्हापुरात धड मार्ग आणि स्थळे दाखविणारे फलक नाहीत याबाबत त्या तीव्र नाराजी व्यक्त करायच्या. जॉर्ज फर्नांडिस यांच्या वाढदिनी दिल्लीत त्यांना भेटून यायच्या तर इतिहास संकलन परिषदेमध्ये शोधनिबंध वाचण्याची तयारी करायच्या. चरितार्थासाठी फार धावपळ करावी, अशी परिस्थिती नसताना गावाकडच्या लोकांपासून ते जॉर्ज फर्नांडिस यांच्या वर्तुळातील मित्रपरिवाराशी सहजपणे संपर्क साधणाºया अरुणा देशपांडे यांनी मार्च २0१९ मध्ये चीनला जाण्याचे नियोजन केले होते; परंतु चौथ्या टप्प्यातील कॅन्सर असल्याचे कळल्यानंतर महिनाभरात त्या अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी अस्वस्थ असणारे एक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.

टॅग्स :tourismपर्यटनkolhapurकोल्हापूर