शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

शब्द खरा केला

By admin | Updated: January 3, 2016 22:52 IST

श्याम बेनेगल, पीयूष पांडे, राकेश मेहरा आणि भावना सोमय्या या नावांबाबत आणि त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल कोणाच्याही मनात कोणतीही शंका येण्याचे कारण नाही

श्याम बेनेगल, पीयूष पांडे, राकेश मेहरा आणि भावना सोमय्या या नावांबाबत आणि त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल कोणाच्याही मनात कोणतीही शंका येण्याचे कारण नाही. या चौघा जणांवर केन्द्र सरकारने चित्रपट परीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्ड) केवळ पुनर्रचनेचेच नव्हे, तर मुळात संबंधित कायद्यातील (सिनेमाटोग्राफ अ‍ॅक्ट अ‍ॅण्ड रुल्स) सर्व तरतुदींचा नव्याने विचार करण्याची जबाबदारी सोपविली असल्याने बेनेगल यांच्या अध्यक्षतेखालील या समितीवर कोणतेही आक्षेप घेतले जाऊ नयेत. बेनेगल हे विख्यात सिने दिग्दर्शक असून, त्यांनी चाकोरीबाहरच्या (न्यू लाइन सिनेमा) हिन्दी चित्रपटांची परंपरा सुरू केली, तर राकेश मेहरा हे व्यावसायिक हिन्दी चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक आहेत. जाहिरात क्षेत्रातील पीयूष पांडे यांचा अधिकार जसा सर्वमान्य मानला जातो, तसाच भावना सोमय्या यांचा सिने पत्रकारितेतील वावरदेखील लक्षात घेण्यासारखा आहे. केन्द्रातील सत्ताबदलानंतर सेन्सॉर बोर्डाची सूत्रे नव्या सरकारने पहलाज निहलानी यांच्यासारख्या सुमार सिने दिग्दर्शकाच्या हाती सोपविली आणि त्यांनी अक्षरश: धुडगूस घालायला सुरुवात केली. त्यांच्या हडेलहप्पी वृत्तीला कंटाळून मंडळातील काही सदस्यांनी तत्काळ राजीनामेही दिले होते. सिनेमा हे प्राय: करमणुकीचे साधन आहे आणि त्याच्या द्वारे समाजाला एखादा चांगला संदेश देता आला तर या माध्यमाच्या ताकदीचा चांगला उपयोग होऊ शकतो हे कितीही खरे असले, तरी प्रत्येक सिनेमा नीतिपाठाचा धडा असावा अशी काही पूर्वशर्त नाही. निहलानी यांनी मात्र सिनेमा हे समाजाला तथाकथित सुसंस्कारी बनविण्याचे माध्यम असल्याचा गैरसमज करून घेऊन दंडुकेशाही सुरू केली. संसदेत जशी असंसदीय शब्दांची यादी असते तशी त्यांनी सिनेमासाठीही एक यादी तयार करून त्यांच्यावर बंदी लागू केली. परिणामी संपूर्ण चित्रपटसृष्टी केवळ निहलानी यांच्याच नव्हे, तर सरकारच्याही विरोधात गेली. त्याची उचित दखल घेऊन गेल्याच आठवड्यात संबंधित खात्याचे मंत्री अरुण जेटली यांनी सेन्सॉर बोर्डाला वादविवादरहित बनविण्याचा शब्द दिला होता व तोच त्यांनी आता बेनेगल सिनेमा गठित करून दिला आहे. अर्थात, निहलानी यांच्या कारकिर्दीचा भाग बाजूला ठेवला, तरी ज्या कायद्यान्वये सेन्सॉर बोर्ड काम करते तो कायदा आणि बोर्डावर नेमले जाणारे सदस्य यांच्यामुळे हे बोर्ड कमीअधिक प्रमाणात नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. व्यावहारिक विचारांचा अभाव हे त्यातले एक प्रमुख कारण. आता तो जर या कायद्यात आला तरच बोर्डाचा कारभार वादरहित होऊ शकतो.