शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खारपाणपट्ट्याचा शाप दूर होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 04:58 IST

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाला गती दिली तर खारपाणपट्ट्याचा शाप दूर होईल.

- राजेश शेगोकारखारपाण पट्टा.... विदर्भातील तीन जिल्हे अन् १६ तालुक्यांचे दु:ख... या प्रश्नावर सरकारने मलमपट्टी तर केलीच नाही, मात्र सदैव ही जखम भळभळती ठेवण्याचेच काम केले. फडणवीस सरकारनेही या पट्ट्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अशी योजना आणली. या योजनेत खारपाणपट्ट्यासोबतच दुष्काळ प्रभावित १५ जिल्ह्यांचा समावेश केला; मात्र ही योजनाही आता पांढरा हत्ती होते काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.अमरावती, अकोला व बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये खारपाणपट्टा आहे. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याची मुबलकता असताना त्यामध्ये क्षाराचे प्रमाण अधिक आहे. परिणामी हे क्षारयुक्त पाणी शेतीसाठी वापरता येत नाही. या पाण्याचा मानवी आरोग्यावरदेखील परिणाम होतोय. या जमिनी बेसॉल्ट खडकापासून तयार झाल्याचा निष्कर्षही कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी नोंदविला आहे. पूर्व ते पश्चिम १५० किलोमीटर लांब आणि उत्तर ते दक्षिण ६० किलोमीटर रुंद असा हा खारपाणपट्टा विस्तारला आहे. अमरावती जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ३५५ गावे, अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ३७२ गावे, बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ८९४ गावे खारपाणपट्ट्यात आहेत. यामुळे ओलिताची शेती करणे शेतकऱ्यांना कठीण जाते. सध्याच्या फडणवीस सरकारने राज्यातील खारपाणपट्ट्याच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची घोषणा केली. जागतिक बँकेच्या मदतीने चार हजार कोटींची तरतूद यासाठी करण्यात आली. राज्यातील १५ दुष्काळ प्रभावित आणि खारपाणपट्टा असलेल्या जिल्ह्यात ही योजना जागतिक बँकेच्या मदतीने राबविली जाणार आहे. यात जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नांदेड आणि लातूरचा समावेश आहे. राज्यातील १५ जिल्ह्यातील ५ हजार गावे या योजनेत समाविष्ट आहेत. या गावांतील नागरिकांना अधिक चांगले जीवनमान देण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. कागदावरची ही सुंदर योजना मात्र शेतकºयांच्या बांधापर्यंत अद्यापही गेलीच नाही. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने अकोला जिल्ह्यात पाच बॅरेजेसला मंजुरी दिली; मात्र ना हे बॅरेजेस पूर्ण झालेत, ना त्यात पाणी जमा झाले. अशीच स्थिती इतर जिल्ह्यातील योजनांची आहे. खरं तर खारपाणपट्ट्यातील शेतकºयाचे भाग्य बदलवून टाकणारी ही योजना आहे; मात्र योजनेला संथगतीचा शाप लागल्याने आता यामधील प्रकल्पांच्या किमती वाढल्या आहेत. एकीकडे महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असताना दुसरीकडे विदर्भातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठ्या थाटामाटात रखडलेल्या प्रकल्पांना पूर्ण करण्याची मुदत जाहीरपणे ठरवून दिली होती. ती मुदत कधीचीच संपली; मात्र प्रकल्पाची कामे ठप्पच आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सरकार पुन्हा एकदा नागपुरात आले आहे. विदर्भात अधिवेशन असले म्हणजे विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा होते, त्यामुळे या अधिवेशनात खारपाणपट्ट्यासोबतच रखडलेल्या प्रकल्पांचा प्रश्न ऐरणीवर आला पाहिजे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती