शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कृषी विधेयकामुळे बाजार समित्या अस्तित्वात राहतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 02:04 IST

मुलाखत - कॉ. डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, किसान सभा महाराष्ट्र

 

शेतकरी का संतापले आहेत?

बाजार समितीच्या आवारात नोंदणीकृत व्यापारीच शेतमालाची खरेदी - विक्री करू शकतात. आडते, हमालांचीही नोंद असते. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवू नयेत यासाठी व्यापाºयांना आपल्या मालमत्तेची नोंद बाजार समितीत करावी लागते. काही करारपत्रेही असतात. जामीनदार असतात. त्यामुळे व्यापारी शक्यतो शेतकºयांच्या मालाचे पैसे बुडवू शकत नाहीत. अन्यथा त्यांच्यावर कारवाई होते. शेतमाल खरेदी केल्यानंतर त्याची पावती व्यापारी शेतकºयाला देतात.

नवीन ‘कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२०’ यात व्यापाºयांना बाजार समितीच्या बाहेर केवळ पॅनकार्ड असल्याच्या अटीवर मुक्त बाजारात कोठेही शेतमाल खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यावर बाजार समित्यांचे काहीही बंधन नसेल. बाहेर व्यापारी केवळ पॅनकार्ड दाखवून शेतमालाची खरेदी-विक्री करू शकतात. अशा परिस्थितीत व्यापाºयांनी पैसे बुडविले तर ते वसूल कसे करायचे हा प्रश्नच आहे. कायद्यात याबाबत पुरेशी तरतूद नाही. लवादाकडे किंवा प्रांताधिकारी व नंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागायचा आहे. न्यायालयात जाण्याचीही बंदी आहे. ही एक प्रकारची न्यायबंदीच आहे.बाजार समितीच्या आवारात हमीभावाच्या खाली शेतमाल खरेदी करण्यास बंदी आहे. नवीन विधेयकात बाजार समितीच्या बाहेर हमीभाव देण्याचे काहीही बंधन व्यापाºयांवर नाही. त्यामुळे बाजार समितीच्या बाहेर व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी करतील. ज्यात शेतकºयांचे नुकसान होईल.बाजार समित्यांच्या आवारात शेतमालाची खरेदी विक्री झाली तर बाजार समितीला कर मिळतो. नवीन विधेयकात बाजार समितीत येऊनच शेतमाल खरेदी करावा, असे बंधन व्यापाºयांवर नसल्याने ते बाजार समितीत शेतमाल खरेदी करणे टाळतील. त्यामुळे बाजार समित्यांना उत्पन्न मिळणेच बंद होईल. परिणामी त्या हळूहळू मोडकळीस येतील.बाजार समित्यांच्या आवारात व बाहेर व्यापाºयांसाठी सारखेच नियम व सर्वत्र हमीभावाची सक्ती असली तरच स्पर्धा निर्माण होऊन शेतकºयांचा फायदा होईल. अशी स्पर्धा असलीच पाहिजे. मात्र केंद्राने मंजूर केलेल्या नवीन कृषी विधेयकात अशी समानता नसून बाजार समित्यांच्या बाहेर व्यापाºयांना मोठी मोकळीक देण्यात आली आहे.बाजार समित्यांतही काही अनिष्ट प्रथा व शेतकºयांची लूट आहे. ती रोखण्यासाठी कठोर प्रयत्न हवे आहेत. मात्र, तसे न करता बाजार समित्या कमजोर करण्याचा प्रयत्न या विधेयकाने केला आहे. यातून बाजार समित्यांच्या बाहेर व्यापारी व कॉर्पोरेट्स यांची मक्तेदारी तयार होईल. यातून लूट वाढेल. शेतकरी आगीतून फुफाट्यात पडेल.दूध व्यवसायात पूर्वी सहकारी दूध संघ होते. आता ७६ टक्के दूध संघ खासगी आहेत. त्यांचे गावोगाव जाळे झाले. त्यामुळे सरकारी व सहकारी दूध संघ मोडीत निघाले. खासगी दूध संघ एकत्रितपणे भाव पाडतात. तेच आता शेतमालाचे होईल. जागोजागी शेतमाल खरेदीचे खासगी मार्केट उभे राहतील. तेथे व्यापारी भाव ठरवतील. त्यांची साखळी तयार होईल व बाजार समित्या हळूहळू मोडीत निघतील.पंजाबसारख्या राज्यात सरकार थेट बाजार समितीतून (मंडी) गहू खरेदी करते. त्यामुळे शेतकºयांना हमीभाव मिळतो. बाजार समितीला कर मिळतो व सरकारलाही चांगला गहू मिळतो. नवीन विधेयकांमुळे शेतकरी, सरकार दोघेही व्यापाºयांवर अवलंबून राहतील. व्यापारी सरकारला गरज असेल तेव्हा शेतमाल देतील का? हा प्रश्न आहे.बाजार समित्यांच्या आवारातदेखील व्यापारी प्रतवारीनुसार दर ठरवून अथवा अनेक प्रकारची तूट दाखवून शेतकºयांची अडवणूक करतात, माल नाकारतात. बाजार समित्यांच्या बाहेर तर अशी लूट अधिक होईल.

(शब्दांकन : सुधीर लंके ) 

टॅग्स :FarmerशेतकरीPunjabपंजाब