शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!

By विजय दर्डा | Updated: June 23, 2025 06:13 IST

अख्ख्या दुनियेला नाचविणारे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या बरोबर डाव टाकून इराणमधील अयातुल्ला खामेनी यांची सत्ता उलथवतील काय? 

- डॉ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)मी सध्या अनेक देशांच्या दौऱ्यावर आहे. प्रवासात जो कोणी भेटतो तो हटकून विचारतोच, ‘अमेरिकी राष्ट्रपती ट्रम्प यांनी पाकिस्तानचे सेनाध्यक्ष जनरल मुनीर यांना भोजनासाठी बोलावले त्याचा भारतावर काय परिणाम होईल? दोघांमध्ये काय सौदेबाजी झाली असेल?’ 

- याचे उत्तर ट्रम्प आणि मुनीर हे दोघेच देऊ शकतील असे त्यांना मी सांगतो. परंतु, या भोजनाने सर्वांना चक्रावून टाकले, हे मात्र खरे! कारण आजपर्यंत व्हाइट हाउसमध्ये कोणत्याही राष्ट्रपतीने जगातल्या कुठल्याही देशाच्या सेनाप्रमुखाला अशा प्रकारे जेवायला बोलावलेले नाही. 

इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धात पाकिस्तानने साथ द्यावी अशी इच्छा ट्रम्प बाळगून असावेत हे नक्की. मुनीर नकार तरी कसा देतील? सध्याच्या जगात ट्रम्प काकांचा आदेश हा सर्वोच्च असतो. त्यातही खुद्द पाकिस्तानने  शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्या नावाची शिफारस केली.. हा एक विनोदच! शिवाय वर ट्रम्प म्हणतात, की मी कितीही शर्थ केली, तरी मला नोबेल मिळणार नाही ते नाहीच!

मी आता ज्या प्रदेशात फिरतो आहे, तेथे वाहनांच्या व्यापारात पाकिस्तानी लोक अव्वल आहेत आणि भारतीय दुसऱ्या क्रमांकावर. दोन्ही समुदायांमध्ये येथे खूप मोठ्या प्रमाणावर बंधुभाव दिसतो. पाकिस्तानी सांगतात, ‘भारत-पाकिस्तानमधला वाद दोन देशांमध्ये नाही, तर दोन्ही देशांच्या राजकारणामध्ये आहे.  देश आणि राजकारण यात खूप मोठा फरक असतो!’

भारताला दबावाखाली राखण्यासाठी अमेरिका कित्येक वर्षांपासून पाकिस्तानच्या राजकारण्यांना चिथावते. पाकिस्तान, तिथल्या लष्करप्रमुख आणि आयएसआयच्या घशात अमेरिका बेहिशेबी पैसा ओतते, त्याच पैशातून पाकिस्तान शस्त्रास्त्रे खरेदी करतो. म्हणजे फायदा अमेरिकी शस्त्रास्त्र विक्रेत्यांचा! वर पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांची चंगळ. त्यांनी अमेरिका, युरोप, फ्रान्स आणि दुबईपासून अलीकडे कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातही आलिशान घरे घेतली आहेत. 

पाकिस्तानमध्ये लोकशाही आणण्याचा प्रयत्न कुणी केलाच, तर सगळे मिळून त्याची वासलात लावतात. बेनझीर भुट्टो आणि नवाज शरीफ यांच्यापासून इम्रान खानपर्यंतची उदाहरणे पाहा. ट्रम्प काका तोच खेळ खेळत आहेत.

पाकिस्तानमधून बाहेर पडून जगाच्या अन्य देशांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनातली ही भावना हे खरे सत्य होय. तसे नसते, तर  पाकिस्तानचे पंतप्रधान मौजूद असताना त्यांना डावलून ट्रम्प यांनी सैन्यप्रमुखांना का बोलावले? त्यांना माहीत आहे की पाकिस्तान हा विश्वास ठेवण्याजोगा देश नाही. 

अफगाणिस्तान युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सेना आणि आयएसआयने अमेरिकेला धोका दिला, वरून ओसामा बिन लादेनलाही आश्रय दिला, ते वेगळेच! असे पुन्हा होऊ नये याची खातरजमा करणे ट्रम्प यांच्यासाठी आवश्यक होते. इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात अमेरिका उडी घेणार हे निश्चित! 

ट्रम्प यांच्या सतत बदलणाऱ्या धोरणांमुळे अमेरिकेतील लोक वैतागले असून, या युद्धात आपल्या देशाने अजिबात पडू नये असे बहुसंख्य अमेरिकी नागरिकांना वाटते. परंतु, ट्रम्प यांच्या मनात येते तेच ते करतात. तूर्तास स्वतःचे ईप्सित साधताना अमेरिकेचे उद्दिष्टही पूर्ण करता यावे यासाठी इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. इराणच्या प्रतिहल्ल्यात इस्रायलचेही कमी नुकसान झालेले नाही. इराणला नमविण्यासाठी इस्रायलला अमेरिकेची मदत हवी होती.  

इराण आणि पाकिस्तान यांच्यात ९०९ किलोमीटर लांब सीमा असून, बलुचिस्तानही या प्रदेशात येतो. इराणमध्ये घुसण्याची गरज पडली तर पाकिस्तानी भूमी आणि हवाई क्षेत्राचा उपयोग करावा लागेल असा विचार ट्रम्प करत असावेत. अफगाणिस्तान युद्धाच्या वेळी असेच झाले होते. 

पाकिस्तानमध्ये गुप्तपणे अमेरिकेचा हवाई तळ आहे असे मानले जाते. ज्या नूर खान हवाई तळावर भारताने क्षेपणास्त्रे डागली, तिथून काही अंतरावरच अमेरिकन वायुसेना होती ही गोष्ट ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी समोर आलेली आहे. पाकिस्तानला बरोबर ठेवणे ही अमेरिकेची गरज आहे.

अमेरिकेने इराणच्या भूमिगत अणुतळांवर बॉम्ब टाकून ते उद्ध्वस्त केल्याची घोषणा केली आहे. आता  इराणमध्ये अयातुल्ला खामेनी सरकार उलथवून टाकून अमेरिकेचे कठपुतळी सरकार तिथे बसविण्याचा अमेरिकेचा इरादा असेल का? खामेनी यांच्याविरुद्ध इराणमध्ये खूप मोठा असंतोष आहे. शरियाच्या नावाखाली खामेनी यांनी खूपच अत्याचार केले आहेत. स्त्रियांना जगणे मुश्कील झाले आहे. रजा शाह पहलवी यांच्या काळात इराणमधल्या महिला गाडी चालवत, फुटबॉलचे सामने खेळत; हे सारे स्वातंत्र्य खामेनी यांनी हिरावून घेतले. 

खामेनी यांचे मोठे सेनापती मारले गेले आहेत. ते स्वतः भूमिगत आहेत. शिवाय इराणमध्ये मोसादने खोलवर शिरकाव केला आहे. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांची उपकरणे चोरट्या मार्गाने इराणमध्ये पोहोचवून इराणच्या भूमीवरूनच इराणवर हल्ला केला. 

खामेनी संकटात असून, त्यांना आपल्या सत्तेचा शेवट जवळ आलेला दिसतो आहे. त्यामुळे प्रश्न असा की, सत्ता कुणाला मिळणार? १९७९ मध्ये इराणचे राजे मोहम्मद रझा शाह पहलवी यांचे राज्य होते. इस्लामी क्रांतीत त्यांची सत्ता गेली. त्यांचे पुत्र रझा पहलवी सध्या अमेरिकेत वास्तव्याला आहेत. ते म्हणतात, ‘आम्ही ४६ वर्षे लढलो. आता आमची वेळ आली आहे.’

इराणमध्ये खरोखरच सत्तापालट होईल? प्रतीक्षा करावी लागेल. काळ आपली कहाणी स्वतःच सांगत असतो.अखेरीस इतकेच... इराणशी भारताचे संबंध चांगले आहेत, पण मोहम्मद रजा शाह पहलवींच्या काळात ते अधिक चांगले होते. भारताचा अलिप्ततावादावर विश्वास आहे. आम्हाला युद्ध नको, आम्ही शांततेचे भोक्ते आहोत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणIsraelइस्रायलwarयुद्धAmericaअमेरिका