शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

नगरच्या उसाचा गोडवा का हरपला?

By सुधीर लंके | Updated: December 7, 2017 05:15 IST

खासगी साखर कारखानदार शेतकºयांची अडवणूक करतात म्हणून नगर जिल्ह्यातील पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी सहकारी साखर कारखानदारीचे स्वप्न पाहिले व ते अमलात आणले.

खासगी साखर कारखानदार शेतकºयांची अडवणूक करतात म्हणून नगर जिल्ह्यातील पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी सहकारी साखर कारखानदारीचे स्वप्न पाहिले व ते अमलात आणले. ‘मला शेतकºयांना कारखान्याचे मालक करायचे आहे’ हे पद्मश्रींचे स्वप्न होते. पद्मश्रींच्याच पुतळ्यापासून म्हणजे लोणीतून नगर जिल्ह्यातील शेतकºयांनी ऊस आंदोलनाची हाक दिली आहे व शेतकºयांचा आरोप आहे की सहकारी कारखानदारही सध्या शेतकºयांची लूट करीत आहेत. म्हणजे मालकाचाच मालकावर विश्वास राहिलेला नाही.आणखी एक विसंगती सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून याच वर्षी शेतकºयांच्या आंदोलनाने पेट घेतला होता. शेतकºयांच्या मालाला रास्त भाव मिळावा, ही त्या आंदोलनाची मागणी होती. या आंदोलनात दोन्ही काँग्रेसचे अनेक नेते शेतकºयांच्या बाजूने रस्त्यावर उतरले. मोदी सरकारवर त्यांनी गरळ ओकली. अनेक नेत्यांनी सहकारी दूध संघ, बाजार समित्या बंद ठेवून शेतकºयांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आज जेव्हा उसाच्या भावाचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मात्र हे सगळे नेते एकसाथ चिडीचूप झाले. अगदी भाजपचे सुद्धा. उसाला भाव देऊ असेही ते जाहीर करायला तयार नाहीत, अन् शेतकºयांच्या मागणीप्रमाणे भाव देणे परवडणारे नाही, हेही सांगत नाहीत. शेवगावमध्ये शेतकºयांवर गोळीबार होऊनदेखील दोन्ही काँग्रेसचे नेते मौन बाळगून आहेत. शेतकºयांकडे पाहण्याची सत्ताधारी व विरोधक या दोघांचीही दृष्टी कशी सोयीची आहे हे यातून समोर आले.कोल्हापूर, सांगलीत उसाचा साखर उतारा अधिक येतो व ३३०० रुपयांपर्यंत भाव मिळतो, तर नगरचे कारखाने दरात मागे का? हा कळीचा मुद्दा नगरच्या आंदोलनात उपस्थित झाला आहे. खासदार राजू शेट्टी यांनी नगरचे कारखानदार साखर चोरतात म्हणून उतारा कमी दिसतो, असा गंभीर आरोप केला आहे. कॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शेतकरी समन्वय समितीनेही कारखानदारांवर अविश्वास व्यक्त केला आहे.अभ्यासकांच्या मते साखर उताºयास जमिनीचा पोत, पायाभूत सुविधा, कारखान्यांचे व्यवस्थापन असे विविध घटक जबाबदार असतात. सरकारची साखरेच्या विक्रीबाबतची धोरणेही कारखान्यांच्या आड येतात. मात्र, तरीदेखील नगरचा उतारा एवढा कमी का? हा मुद्दा संपत नाही. नगर जिल्ह्यातील काही कारखाने मद्याची निर्मिती करतात. नगरच्या दारूने विदर्भ पोखरून टाकल्याचा आरोप अनेकदा होतो. कोपरगावचा एक कारखाना तर वर्षाला निव्वळ मद्यनिर्मितीपोटी शासनाला ८३२ कोटीचा महसूल देतो. मात्र, दारूचा एवढा महापूर आणूनही शेतकºयांना हे कारखाने इतरांप्रमाणेच भाव देतात. त्यामुळे शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे.नगर जिल्ह्यातील सगळे सहकारी कारखाने वर्षानुवर्षे ठराविक कुटुंबांच्या छत्राखाली आहेत. कारखाना सहकारी असला तरी इतरांना नेतृत्वाला तेथे फारसा वाव नसतो. अध्यक्षही नामधारी असतात. म्हटले तर सगळा एकछत्री अंमल आहे. त्यामुळे कारखान्याच्या अंतर्गत व्यवस्थापनातून साखर उतारा घसरत असेल, तर याची जबाबदारी कुणावर निश्चित करायची? ऊस गोड लागतो, पण त्याची ही कडू बाजू कोण स्वीकारणार?sudhir.lanke@lokmat.com