शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धिजीवी लोक मोदी सरकारच्या बाजूने का नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 09:28 IST

शुद्ध तर्कबुद्धी असत्याची साथ देऊ शकत नाही आणि मानवी संवेदनेला द्वेषभावनेशी नाते जोडता येत नाही; हेच या प्रश्नाचे खरे उत्तर आहे!

योगेंद्र यादव,अध्यक्ष, स्वराज इंडिया सदस्य, जय किसान आंदोलन

या देशातील कोणताही उमदा बुद्धिजीवी या सरकारच्या बाजूने जायला  का तयार होत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थिर आहे; पक्ष निवडणुका जिंकतो आहे; पंतप्रधान लोकप्रिय आहेत. अशा स्थिर, लोकप्रिय सरकारपुढे बुद्धिजीवी, कलाकार, विचारवंत, लेखक यांची तर रांग लागली पाहिजे. पण असे का झाले  नाही?- रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन एक दिवस भारत जोडो यात्रेत सामील झाले तेव्हा हा प्रश्न माझ्या मनात उभा राहिला. तसे पाहिले तर ही काही फार मोठी घटना नव्हे.

प्रोफेसर राजन काही तास यात्रेत सामील झाले. यापूर्वी निवृत्त  नौदलप्रमुख ॲडमिरल रामदास, न्या. बी. जी. कोळसे पाटील, सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत भूषण, प्रसिद्ध संगीतज्ञ टी. एम. कृष्णा, प्रतिष्ठित कबीर गायक प्रल्हाद तिपानिया, प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ गणेश देवी यांच्यासारखे अनेक मान्यवर भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. परंतु रघुराम राजन यात्रेत सहभागी झाल्यावर मोठा वाद निर्माण झाला. भाजपाच्या प्रवक्त्यांनी त्यावर लगोलग टिप्पणी केली.  टीव्ही वाहिन्यांनीही या वादात उडी घेतली. मलाही बोलावले तेव्हा मी म्हणालो, यात वाद होण्यासारखे काय आहे? रघुराम राजन हे कोणी वादग्रस्त व्यक्ती नव्हेत! जगातले एक प्रतिष्ठित अर्थशास्त्रज्ञ आहेत. अमेरिकेमध्ये शिकवतात. परंतु त्यांनी आजही भारतीय नागरिकत्व कायम ठेवले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनी एकही विवादास्पद कृती केली नाही. भारत जोडोमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी कुठले वादग्रस्त विधानही केलेले नाही. नोटबंदी हा तुघलकी निर्णय होता एवढेच ते म्हणाले.

एक भारतीय नागरिक या नात्याने रघुराम राजन यांना देशाच्या राजकारणाबद्दल काही मत असण्याचा पूर्ण अधिकार आहेच.  एका राजकीय पक्षाने आयोजित केलेल्या यात्रेत त्यांनी भाग घेतल्याने रिझर्व्ह बँकेच्या सेवानिवृत्त गव्हर्नरच्या मर्यादांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होत नाही. राजन यांचे हे कृत्य मर्यादा उल्लंघन असल्याचे म्हणणाऱ्या भाजपने माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांना निवृत्तीनंतर लगेचच राज्यसभा खासदार आणि मंत्री केले आहे. किती नोकरशहांना त्यांनी राजकारणात उतरवले याची तर गिनतीच नाही. तरीही भाजपने राजन यांच्या भारत जोडो यात्रेत सामील होण्यावर आक्षेप घ्यावा? कदाचित नोटबंदीपूर्वी राजन यांनी दिलेला इशारा पंतप्रधानांनी गांभीर्याने का घेतला नाही, अशी पश्चातबुद्धी भाजपला आता त्रास देत असावी!

या सरकारमध्ये अर्थशास्त्र समजून घेण्याच्या बाबतीत दुष्काळच आहे. अव्वल दर्जाचा कोणीही अर्थशास्त्रज्ञ या सरकारबरोबर राहणे पसंत करत नाही आणि जो जोडला जातो तोही टिकत नाही.  अपवाद फक्त अरविंद सुब्रमण्यन यांचा! तेही ज्या घाईगर्दीने  सरकारमधून बाहेर पडले ते काही लपून राहिलेले नाही. आज देशाच्या प्रमुख आर्थिक संस्था आणि पदांवर जे अर्थतज्ज्ञ बसलेले आहेत त्यांची नावे ऐकून अर्थशास्त्री विषादाने म्हणतात, आता  ईश्वरच भारताच्या अर्थव्यवस्थेचे भले करो!

मोजके अपवाद वगळता कोणत्याही क्षेत्रातील विशेष तज्ज्ञ किंवा प्रतिष्ठित व्यक्ती या सरकारबरोबर काम करायला तयार नाहीत. अपवाद म्हणून पंतप्रधानांचे आधीचे विज्ञान - तंत्रज्ञान सल्लागार डॉ. विजय राघवन आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कस्तुरीरंगन यांची नावे घेता येतील. व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काही मोठी माणसे सरकारबरोबर काम करायला तयार आहेत. परंतु बाकी सर्व बाबतीत हे सरकार पूर्णपणे अकार्यक्षम ठरले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग आणि भारतीय समाजशास्त्र संशोधन परिषदेचा निवृत्त सदस्य या नात्याने मी ठामपणे म्हणू शकतो की आज अत्यंत सामान्य दर्जाचे लोक या संस्थांमध्ये घुसले आहेत. ज्यांना महाविद्यालयात अधिव्याख्यात्याची नोकरीही देऊ नये अशांना केंद्रीय विद्यापीठांचे कुलगुरू केले गेले आहे. कला आणि साहित्य क्षेत्राचेही तेच! प्रसून जोशी आणि अनुपम खेर यांना वगळले तर गीत, संगीत आणि अभिनयाच्या क्षेत्रातील कोणतेही मोठे नाव या सरकार बरोबर नाही. आपले समर्थन करण्यासाठी सरकारला ज्या स्तरावरच्या कलावंतांचा आधार घ्यावा लागतो त्यांचे भांडे अलीकडेच गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काश्मीर फाइल्सच्या संदर्भात झालेल्या टिप्पणीमुळे फुटलेच आहे.

जवळपास अशीच स्थिती अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारची होती. हाच प्रश्न रशियात पुतिन आणि श्रीलंकेत राजपक्षे तसेच तुर्कस्थानमध्ये एर्दोगन यांच्या बाबतीत समोर आला. अती उजव्या वळणाच्या सरकारांबरोबर सर्जनशील लोक जात नाहीत? याचे कारण अगदी साधे सरळ आहे: शुद्ध तर्कबुद्धी असत्याची साथ देऊ शकत नाही आणि मानवी संवेदनेला द्वेषभावनेशी नाते जोडता येत नाही. तर्काशिवाय कोणी बुद्धिजीवी किंवा वैज्ञानिक होऊ शकत नाही; आणि संवेदनशीलतेशिवाय कला आणि साहित्य निर्माण होऊ शकत नाही. 

सत्ता, संपत्ती आणि धनवान लोक शब्द विकत घेऊ  शकत नाहीत हे शाश्वत सत्य आहे आणि तेच जगभरातील अधिनायकांच्या पराभवाचे कारणही!yyopinion@gmail.com

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीRaghuram Rajanरघुराम राजन