शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सर्वोच्च न्यायालयाने नार्कोटिक्स ब्युरोचे पंख का कापले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 06:17 IST

Supreme Court : बॉलिवूडमधील अमलीपदार्थ सेवन प्रकरणात या संस्थेने फारच उत्साह दाखवून छोट्या मोठ्यांना जबानीला बोलावले. लहानसहान ड्रग्स विक्रेत्यांना, ग्राहकांना पकडून आणले.

- हरीष गुप्ता(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)

सुशांतसिंह राजपूत प्रकरण तपास यंत्रणांना अजूनही सतावते आहे. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून रिया चक्रवर्तीला सीबीआयने त्रास दिला नाही. कसलीही घाई केली नाही. हा एक प्रकारे शहाणपणाच होता, जो नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मात्र सुचला नाही. राकेश अस्थाना यांच्या नेतृत्वाखालील एनसीबीने जरा जास्तच चावे घेतले. बॉलिवूडमधील अमलीपदार्थ सेवन प्रकरणात या संस्थेने फारच उत्साह दाखवून छोट्या मोठ्यांना जबानीला बोलावले. लहानसहान ड्रग्स विक्रेत्यांना, ग्राहकांना पकडून आणले. पण आता सर्वोच्च न्यायालयाने एनसीबीचे महत्त्वाचे अधिकार काढून घेऊन या यंत्रणेला मोठा धक्का दिला आहे. अशा चार तपास यंत्रणा आहेत ज्यांच्या अधिकाऱ्यासमोर केलेले निवेदन कबुलीजबाब म्हणून ग्राह्य धरला जातो. नार्कोटिक्स ब्युरो त्यातील एक. सामान्यत: क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम १६४ अन्वये दंडाधिकाऱ्यांसमोर केलेले निवेदनच कबुलीजबाब मानले जाते.

नार्कोटिक्स ब्युरो, अंमलबजावणी संचालनालय, कस्टम्स, एक्साइज आणि आयकर अधिकाऱ्यांना हे अधिकार दिलेले आहेत. त्यांच्यासमोर केलेले निवेदन न्यायालयासमोरच्या कबुलीजबाबासारखे मानले जाते. सीबीआय, राज्य पोलीस आणि इतर यंत्रणांना हा अधिकार नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नार्कोटिक्स ड्रग्स सायकोट्रोपिक सब्सटन्स कायदा १९८५ खाली कबुलीजबाब घेण्याच्या अधिकाराचा दुरूपयोग केला म्हणून नार्कोटिक्स ब्युरोचा तो अधिकारच काढून घेतला. ब्युरोचे अधिकारी पोलीस अधिकारीच असतात आणि त्यांच्यासमोर केलेले निवेदन कबुली मानता येणार नाही, असा निवाडा न्यायालयाने दिला. हा ब्युरो आणि गृहमंत्रालयाला मोठा धक्का आहे. अंमलबजावणी संचालनालय आणि तत्सम यंत्रणांच्या प्रचंड अधिकारांवर यामुळे आच येऊ शकते. दोन विरुद्ध एक असा हा निकाल दिला गेल्याने सरकार फेरविचार अर्ज करील अशी शक्यता अंतस्थ गोटातून वर्तवण्यात आली आहे. मात्र सध्या तरी नार्कोटिक्स ब्युरोचे पंख छाटले गेले आहेत. 

मुर्मूंवर खप्पा मर्जी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानापासून जी.सी. मुर्मू हे त्यांचे अत्यंत आवडते अधिकारी. मुर्मू गुजरात केडरमधुनच आलेले. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात मोदींमागे सीबीआयचा ससेमिरा होता तेव्हा अनेक नाजूक प्रकरणे मुर्मू यांनी हाताळली. त्या वादळी कालखंडात दिल्लीतल्या कायदेपंडितांशी समन्वय राखण्याचे काम हे मुर्मू करीत. ते मूळचे झारखंडचे. कोणताही आविर्भाव न बाळगणाऱ्या मुर्मूंना महत्त्वाची पदे दिली गेली आणि शेवटी तर जम्मू-काश्मीरमध्ये नायब राज्यपाल म्हणून धाडले गेले. प्रथमच स्वतंत्र कार्यभार मिळणारे राज्यपाल म्हणून् मुर्मू नियुक्त झाले. त्यांच्या क्षमतांवर मोदींचा फार विश्वास. पण कुठेतरी माशी शिंकली आणि पंतप्रधानांचे कार्यालय अस्वस्थ झाले. कदाचित मोदींना अपेक्षित  असे काही काम् मुर्मू यांनी केले नसावे. मोदींची इच्छा होती त्यांनी राज्यात फिरावे; पण मुर्मू श्रीनगरात राजभवनात बसून राहिले. हे पुरेसे नव्हते म्हणून की काय त्यांनी त्यांना वरिष्ठ असलेल्या मुख्य सचिवांशी पंगा घेतला. शेवटी मोदींनी राजकीयदृष्ट्या वजनदार मानले जाणारे मनोज सिंह याना झालेला घोळ निस्तरून धाडसी निर्णय घेण्यासाठी काश्मीर घाटीत पाठवले. सिन्हा  हे पंतप्रधानांचे कान आहेत, गृहमंत्र्यांशी त्यांची जवळीक आहे शिवाय घाटीतल्या राजकीय वर्तुळात त्यांची खास ओळखही आहे.    

अमित शाह प्रकृती अस्वास्थ्याने संत्रस्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रकृती हा भाजपच्या चिंतेचा विषय होऊन बसला आहे. कोविडमधून बरे झाल्यानंतरच्या थकव्यातून ते बाहेर पडले असले तरी वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रवास टाळत आहेत. याच कारणांनी त्यांनी बिहारमध्ये निवडणूक प्रचार केला नाही. हे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या पथ्यावर पडले. त्यांनी बिहारमध्ये तब्बल २४ सभा घेतल्या. एरवी मागे राहणारे पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही दिवसाला पाच सभा घेतल्या. शाह केवडीयालाही गेले नाहीत. दिल्लीत राहून राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींबरोबर पटेल चौकात जाऊन त्यांनी वल्लभभाईंना अभिवादन केले. मात्र बंगालमध्ये जाऊन ते प्रचार करणार आहेत. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत