शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

ज्याची-त्याची पद्मावती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:23 IST

परवा एक पुणेकर भेटले. जुना परिचय होता म्हणून त्यांना सहज विचारलं- ‘तुम्ही ‘पद्मावती’च्या बाजूचे की विरोधक?’ त्यावर ते भलतेच उखडले. ‘शिंच्या त्या भन्साळीने मस्तानीला आमच्या शनिवारवाड्यावर नाचवली तरी आम्ही तोंड उघडले नाही हो.

- नंदकिशोर पाटीलपरवा एक पुणेकर भेटले. जुना परिचय होता म्हणून त्यांना सहज विचारलं- ‘तुम्ही ‘पद्मावती’च्या बाजूचे की विरोधक?’ त्यावर ते भलतेच उखडले. ‘शिंच्या त्या भन्साळीने मस्तानीला आमच्या शनिवारवाड्यावर नाचवली तरी आम्ही तोंड उघडले नाही हो. नाच तसा बरा होता म्हणा! पण ते जाऊं दे. आता म्हणे तो राणी पद्मावतीला अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वप्नात आणून नाचवतोय! छेंछेंछें!! उद्या तो झांशीच्या राणीला इंग्रजांच्या, चाँदबीबीला पेशव्यांच्या नि सीतेला रावणाच्या स्वप्नात आणून नाचवेल. त्याचें काय?’ पुणेकरांचा युक्तिवाद बिनतोड होता म्हणून मग आम्ही कोल्हापूरकरांकडे मोर्चा वळवला. तर ते म्हणाले, ‘रांडच्या भन्साळीला म्हणावं, नाचिव की कोणास भी! काय फरक पडतुया? पद्मावती असूंदे की, ती कोण एलिजाबेथ असूंदे. आम्हास्नी कुणीबी चालतंय! एक ध्यानात ठेव म्हणावं. आमचं राजं ते राजंच. त्येंच्या वाटंला बिगर गेलासा तर इथंच खांडुळी’!! कोल्हापूरकरांचा एकूण आवेश बघून आम्ही जरा मागे सरलो. तर तेच पुढं येऊन कानात पुटपटले. ‘पाव्हणं कधी इतिया पद्मावती? तसं नव्हं. जरा तयारीत राहिला बरं..कायबी झालं तरी पहिला शो कदी चुकवत नाय आपण!’शेतकरी आत्महत्यांनी आधीच परेशान असलेल्या विदर्भावर यंदा बोंडअळीच्या संकटाची भर पडली. त्यामुळे त्यांना पद्मावतीच्या या वादात नको ओढायला म्हणून आम्ही पुढे निघालो. तर तेवढ्यात मागून आवाज आला. ‘का म्हणून तुमी टाळून राहिले? कपासी करपली म्हणून तराटी जाते का भाऊं! संत्रा पिकवते म्हणून आंबटशौकीन समजून राहिले का? पद्मावती तर बीटी हाय म्हणं. जेनेटिकली मॉडिफाय! आता आमची ती वाट लावून राहिली कां बाप्पा!!’कोकणी माणूस आणि वाद, हे तर फणस-ग-याचं नातं. म्हणून मग शेवटी आम्ही इरसाल मालवणकर तात्यांना गाठलं. ‘तात्यानु बरा असा ना? पद्मावतीच्यो काय करतास?’ तात्यांनी चष्मा चढवला अन् रंगलेल्या विड्याची पिचकारी मारली.‘कोणाच्यो म्हशी नि कोणाक उठा बशी?  Nandu.patil@lokmat.com

टॅग्स :Padmavatiपद्मावतीIndiaभारतcinemaसिनेमा