शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

बेलगाम ड्रॅगनच्या मुसक्या कोण आवळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 00:32 IST

१९८९ मध्ये लोकशाहीची मागणी करणाºया हजारो तरुणांना या देशाने तोफेच्या तोंडी दिले, रणगाड्यांखाली चिरडले.

- विजय दर्डाकोरोना विषाणूची निर्यात केल्याचा संशय असलेल्या चीनमधून अमेरिकेत पोहोचली अज्ञात बियांची रहस्यमय पाकिटे पुराणकथेतील कालिया नागाबद्दल तुम्ही ऐकले असेल. ज्या डोहात तो राहायचा त्याचे पाणी इतके विषारी झाले होते की, बाजूने जाणारे पशुपक्षीही मरून पडायचे. कालियाच्या विषाने यमुनाही विषारी झाली, त्यामुळे भगवान कृष्णाला यमुनेच्या प्रवाहात उडी घ्यावी लागली. कालियाला दहा तोंडे होती. कृष्णाने ती चिरडून टाकल्यावर कालियाला त्याची चूक कळली. आज चीन त्या कालिया नागासारखाच सारे जग गिळंकृत करू पाहत आहे. जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या इतर देशांप्रमाणेच चीनकडेही अणुबॉम्ब व इतर संहारक जैविक शस्रे आहेत. मानवी जीवन, मानवी अधिकारांची पत्रास या देशात ठेवली जात नाही.

१९८९ मध्ये लोकशाहीची मागणी करणाºया हजारो तरुणांना या देशाने तोफेच्या तोंडी दिले, रणगाड्यांखाली चिरडले. एखाद्या लढाईत लाखभर सैनिक मेले तर त्याची चीनला फिकीर नसते. अमेरिका, जपान किंवा भारतासारखा लोकशाही देश असा विचार तरी करू शकेल? उत्तर अर्थातच नाही असे आहे, कारण आपण माणसांचे जीवित, अधिकार यांची कदर करतो. चीनचे नेमके उलटे आहे. जगा आणि जगू द्या यावर त्यांचा विश्वासच नाही. हा देश देव मानत नाही. या निलाजºया देशाने भगवान बुद्धांना कधीच हद्दपार केले आहे. या देशाच्या नसानसात कट-कारस्थानेच वाहत असतात. एकीकडे चीन भारताशी वाटाघाटींचे ढोंग करतो दुसरीकडे जमीन हडपण्याचा खुनशी खेळ खेळतो. रशियात भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलणी केल्याच्या दुसºयाच दिवशी धमक्या देणाºया चीनची प्रवृत्ती चलाख, कुटिल राक्षसासारखीच आहे. प्रश्न असा आहे की या अशा देशाच्या मुसक्या कशा आवळायच्या?

एक स्पष्ट केले पाहिजे. मी स्वत: चिनी जनतेच्या विरोधात नाही. तिथले लोक माझे मित्रच आहेत. चीनच्या पीपल्स पार्टीने त्यांना नरकयातनात ढकलले असल्याने मला चिनी नागरिकांची काळजीच वाटते. दहा लाखांहून अधिक विगर मुस्लिमांना तुरुंगात टाकणाºया राक्षसी प्रवृत्तीच्या सरकारला माझा विरोध आहे. जगातल्या छोट्या असहाय्य देशाना वाट्टेल तशी कर्जे वाटून चीनने अंकित केले आहे. आता त्यांना या राक्षसाच्या तावडीतून कोण वाचवणार हाही प्रश्न आहेच. अशा स्थितीत मोठे देश चीनशी कसे लढतील? या घडीला जगातल्या किमान १०० देशांतले लोकशाहीचा बुरखा पांघरलेले हुकूमशहा चीनच्या तालावर नाचत आहेत. चीन उघडपणे दहशतवाद्यांना साथ देतो आहे. भारत सुरक्षा परिषदेत हाफिज सैदला दहशतवादी घोषित करू इच्छितो तर चीन तेथे नकाराधिकार वापरतो. अशा चीनशी लढणे कसे सोपे असेल?

कमालीची गोष्ट म्हणजे अवघ्या जगात चीनच्या विरोधात हवा असूनही चीन मात्र सतत सगळ्यांवर डोळे वटारत असतो. या देशाने अमेरिकेशी पंगा घेतला आहे. तिबेटप्रमाणेच चीन आता तैवान गिळू पाहतोय. जपानशी त्याच्या कुरबुरी चालू आहेत. दक्षिण चिनी समुद्र आणि लाल समुद्रातही त्याने उच्छाद मांडला आहे. भारतीय सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून ठेवली आहेच. भारत संयमाने वागतो आहे म्हणून ठीक, नाही तर युद्ध केव्हाच सुरू झाले असते. युरोपशीही चीनने शत्रुत्व पत्करले आहे. आॅस्ट्रेलियाशीही तोच प्रकार दिसतो. हाँगकाँगच्या प्रश्नावर ब्रिटनशी झालेला समझौता झुगारणाºया चीनपासून सुटकेसाठी कोणीही हॉँगकाँगच्या मदतीला आलेले नाही.

चीनच्या कुरापतीचे नवे उदाहरण समोर आले आहे. ‘चायना पोस्ट’ नावाच्या कुठल्या संस्थेकडून अमेरिकेतल्या विभिन्न राज्यातल्या लोकांना त्यांनी न मागवलेली पाकिटे आली. त्यावर ‘दागिने’ असे लिहिलेले होते. लोकांनी ती उघडली, तर आत विविध प्रकारच्या बिया होत्या. अमेरिकी सरकारला कळल्यावर हे बियाणे गोळा करण्यात आले. लोकांनी ते पेरू नये असे सांगितले गेले. अशी पाकिटे इतर देशातही गेली म्हणतात. गतसप्ताहात भारताने यासंदर्भात लोकांना सावध केले. यात कळीचा प्रश्न हा, की बियांची पाकिटे दुसºया देशात पोहोचलीच कशी? कारण एका देशातून दुसºया देशात बियाणे किंवा रोपे नेण्यास परवानगीच नसते. चीन यावर बोलायला तयार नाही. ‘चौकशी सुरू आहे’ एवढेच उत्तर दिले जाते आहे. अनेकांना आठवत असेल की भारतात मागे दुष्काळ पडल्यावर अमेरिकेतून लाल गहू आयात केला गेला. त्या गव्हाबरोबर गवताचे बीसुद्धा आले होते. या गवताने आपली हजारो एकर जमीन आजही नापीक ठेवली आहे.

दुसºया देशातली जमिनीची सुपीकता नष्ट करण्याचा चीनचा यामागे डाव असू शकतो. बेलगाम होत चाललेल्या चीनला जग लगाम कसा घालू शकेल हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. चीनशी बहुतांश व्यवहार थांबवणाºया अमेरिकेचे मी अभिनंदन करतो. भारतानेही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली शिवाय इतर काही पावले टाकली; पण यामुळे चीन सुधारेल? मला ते सोपे वाटत नाही. जगातल्या बलवान देशांनी मतभेद विसरून एकत्रितपणे चीनला लगाम घालण्याची आज गरज आहे. (लेखक लोकमत समूहाचे चेअरमन आहे)

टॅग्स :chinaचीनIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी