शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

'देवेंद्रपंतां’चा चहा नेमका कुणाचा.. अण्णा की नाना?

By सचिन जवळकोटे | Published: July 14, 2019 8:26 AM

आजच्या ‘लगाव बत्ती’त ‘अण्णा अन् नाना’चा चहा मध्येच कुठून आला ?’

- सचिन जवळकोटे

सोलापूरच्या बाजारपेठेची एक लाजबाब खासियत. दुकानी आलेल्या नव्या माणसाचा मनापासून पाहुणचार करायचा असेल, तर ‘ये बारक्याऽऽ अण्णाचा चहा सांग’, अशी आॅर्डर दिली जाते; मात्र एखाद्याला टाळायचंच असेल तर ‘ये बाळ्याऽऽ नानाचा चहा मागव’ असं सांगून त्या व्यक्तीला ताटकळत ठेवलं जातं. ‘अण्णाचा चहा’ म्हणजे फिक्स पाजला जाणारा.. ‘नानाचा चहा’ म्हणजे उगाचंच वेड्यात काढणारा. आता तुम्ही म्हणाल...आजच्या ‘लगाव बत्ती’त ‘अण्णा अन् नाना’चा चहा मध्येच कुठून आला ?’...याचं उत्तर देऊ शकतील केवळ ‘दुधनी’चे ‘सिद्धूअण्णा’ अन् ‘पंढरी’चे ‘भारतनाना’च...कारण या दोघांना फिरवत अन् ताटकळत ठेवून ‘देवेंद्रपंत’ नेमकं काय घडवू पाहताहेत, हे फक्त त्यांनाच माहीत. लगाव बत्ती...

परतीचे दोर कापत चाललेत..

अजून कशातच काही नाही. तरीही ‘सिद्धूअण्णां’च्या कार्यकर्त्यांमध्ये कमळाचा सुगंध एवढा पसरलाय की विचारू नका. ‘क्याऽऽ अण्णा का काम हुवा ?’ असं कुणी विचारलं तर त्यांचे निकटचे फक्त ‘हुवाऽऽ हुवाऽऽ’ एवढंच पुटपुटताहेत. आता कन्नडमध्ये ‘हुवा’ म्हणजे मराठीत ‘फूल’ होऽऽ. दुधनी पट्ट्यात तर पानमळ्यांऐवजी कमळाचेच मळे फुलविता येतील का, याचीही चौकशी काही शेतकरी करू लागलेत. ‘शांभवी’मधल्या एखादीचं नाव ‘कमळाबाई’ ठेवता येईल का, याचाही विचार म्हणे ‘शंकरअण्णा’ गांभीर्यानं करू लागलेत.

...‘सिद्धूअण्णा म्हणजे आता कमळवाल्यांचेच आमदार’ असं वातावरण अक्कलकोटमध्ये झालं असलं तरी अद्याप त्यांच्या ‘इनकमिंग’ला ग्रीन सिग्नल ‘देवेंद्रपंतां’नी दिलेलाच नाही. आपल्या लाडक्या ‘सचिनदादा’ला न दुखविता हा निर्णय कसा घ्यायचा, या विवंचनेत ‘पंत’ आहेत. अशातच ‘सुभाषबापूं’नी परवा पुण्यात ‘सचिनदादां’ना बळं-बळंच उचकावून ‘गडकरीं’शी बोलायला लावलेलं. त्यामुळं ‘सिद्धूअण्णां’चा विषय मध्येच लटकलाय.

नेमकं याचवेळी ‘हात’वाल्यांनी ‘नागणसूर’च्या महाराजांची आरती सुरू केलीय. या महाराजांनी ‘हात’वाल्यांकडं ‘इच्छुक फॉर्म’ भरण्यापूर्वी ‘वालें’च्या ‘प्रकाशअण्णां’शी गुप्त चर्चा केली होती, हे खूप कमी लोकांना माहितंय. आता ‘प्रकाशअण्णां’च्या मागचा ‘ब्रेन’ कुणाचा हे त्यांच्या नेत्यालाच विचारायला हवं; मात्र या खेळीत ‘हात’वाल्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले. इकडं ‘सिद्धूअण्णां’चा परतीचा मार्ग ब्लॉक करून टाकला अन् तिकडं ‘गौडगाव’ महाराजांची ताकदही कमी केली.ऐवीतैवी लोकसभा प्रचारात वापरलेल्या गाड्यांच्या डिझेल खर्चावरून दोन्ही महाराजांमध्ये ‘भडका’ उडालाय, हा भाग वेगळा. लगाव बत्ती...

विमानतळावर ‘कौन है ये आदमीऽऽ’

‘पंढरी’तील ‘भारतनानां’च्या बाबतीतही ‘देवेंद्रपंतां’ची तीच तिरकस खेळी. मुंबईला केबीनमध्ये छान गप्पा मारतील. पंढरपुरात त्यांच्या घरी जाऊन मस्तपैकी जेवतील; मात्र सार्वजनिक ठिकाणी चारचौघात ओळख देताना ‘कौन है ये आदमीऽऽ’ अशीच स्ट्रॅटेजी. याचं जिवंत उदाहरण विमानतळावर अनेकांनी याचि देही याचि डोळा अनुभवलेलं. त्यामुळंच की काय, हे ‘नाना’ आपल्या पक्षाचे ‘सिद्धूअण्णा’ यांच्या हातात हात घालून गोंधळलेल्या अवस्थेत बाहेर पडलेले. ‘पंतां’च्या गाडीसमोर हात जोडून उभे राहिलेले.हीच तर हुश्शाऽऽर ‘पंतां’ची खासियत ठरलीय. युद्धात उतरण्यापूर्वीच समोरच्या दुश्मनाचा आत्मविश्वास खचायला हवा, यावर त्यांचा अधिक भर. त्याच खेळीतून ‘अण्णा’ अन् ‘नानां’सारखे कैक आमदार त्यांनी फिरवत ठेवलेले. त्यांच्या पक्षांतराची पुडी हळूच कार्यकर्त्यांमध्ये सोडली गेलेली. या आयाराम-गयारामांची विश्वासार्हता धोक्यात आणून त्यांचा त्यांच्या मतदारसंघातला ‘टीआरपी’ पद्धतशीरपणे कमी केला गेलेला; जेणेकरून ‘फायनल डिलिंग’ला बसताना त्यांच्या मागणीचा ‘रेट’ कमी झाला पाहिजे अन् यांच्या अटींचा ‘भाव’ वाढला पाहिजे. क्या बात है...मान गये पंत. लगाव बत्ती...!

दादां’कडं ‘कमळ’ गेलं तर‘मामां’कडं काय...घड्याळ ?

माढ्यातही ‘बबनदादां’च्या पक्षांतराचा मुद्दा ऐरणीवर. ‘दादा’ जर ‘कमळ’ घेऊन फिरू लागले तर माढ्यात ‘घड्याळ’ कोण वापरणार, असा प्रश्न निष्ठावान कार्यकर्त्यांना पडलाय. आपसूकच साºयांची नजर ‘संजयमामां’वर खिळलीय. पारा-पारावर ‘जर-तर’ची कुजबूज सुरू झालीय. यदाकदाचित ‘थोरले काका बारामतीकरां’नी शब्द टाकला तर ‘दादां’च्या विरोधात ‘मामा’ उभारणार का ? याचाही शोध घेतला जातोय. असं ‘महाभारत’ घडण्याची शक्यता कमीच; कारण ‘बारामतीकरांचा शब्द’ पाळण्याऐवजी ‘बारामतीकरांना दिलेला शब्द’ मोडण्याच्या मूडमध्येच सध्या ‘मामा’. लोकसभेला दिलेला शब्द लगेच विधानसभेला मोडून ‘मामा’ बहुधा ‘बारामतीकरां’चाही विक्रम मोडण्याच्या मानसिकतेत. आता या दोघांचाही शब्द लोकसभेला मतदारांनी नाही झेलला, हा भाग वेगळा. लगाव बत्ती...

मोहोळमध्ये ‘भूमीपुत्र’चं आग्यामोहोळ !

‘अण्णा’ अन् ‘नानां’ची सध्याची अवस्था पाहून ‘दक्षिण’चे ‘दिलीपमालक’ही पुरते टरकलेत. ‘हातात धनुष्य’ घेण्याचा नाद सोडून ते मोहोळच्या दिशेनं देव पाण्यात ठेवून बसलेत. ‘प्रणितीतार्इं’नी जर ऐनवेळी ‘मोहोळ’मध्ये एन्ट्री केली, तर ‘मध्य’मध्ये आपल्याला नक्कीच संधी, या विचारात ते भलतेच खुशीत. मात्र ‘मोहोळ’मध्येही ‘स्थानिक-परकीय’ वादाचं ‘आग्यामोहोळ’ सुरू झालंय. ‘मोहोळच्या जनतेचं एकच सूत्र...उमेदवार हवा भूमीपुत्र’ ही पोस्ट होऊ लागलीय भलतीच व्हायरल. आता हा निशाणा ‘बाहेरून येणाºया तार्इं’वर आहे की ‘आतमध्ये बसलेल्या रमेश भाऊं’साठी याचं उत्तर मिळेलच लवकर. लगाव बत्ती !( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस