शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

सरकार कुणाचे? अधिकाऱ्यांचे की नेत्यांचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:17 AM

राज्यात गुटखाबंदी असली तरी त्याची राजरोस विक्री होत आहे. यावर नियंत्रण ठेवणारे एफडीएचे अधिकारी आणि गुटखा विक्रेत्यांचे लागेबांधे कोणत्या थराला गेले आहेत याचे भयंकर उदाहरण विधिमंडळात पहायला मिळाले.

- अतुल कुलकर्णीराज्यात गुटखाबंदी असली तरी त्याची राजरोस विक्री होत आहे. यावर नियंत्रण ठेवणारे एफडीएचे अधिकारी आणि गुटखा विक्रेत्यांचे लागेबांधे कोणत्या थराला गेले आहेत याचे भयंकर उदाहरण विधिमंडळात पहायला मिळाले. तुम्ही गुटख्याच्या विरोधात लक्षवेधी का लावली, सीआयडी चौकशीचा आग्रह का धरला आर.डी. आकरुपे नावाचा अधिकारी भाजपाच्या आमदाराला घेऊन थेट विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या दालनात जाब विचारण्यास गेला. गुटख्याच्या व्यवहारातील पैसा अती झाला की व्यवस्थेची भीती वाटेनाशी होते. त्यात राजकारणी जर अधिकाºयांच्या हातात हात घालून काम करू लागले तर ही हिंमत आणखीनच वाढते. त्या अधिकाºयास निलंबित केले गेले पण त्याने प्रश्न सुटणार नाही. भाजपाचे जे आमदार त्या अधिकाºयासोबत मुंडे यांच्या दालनात जाऊन चढ्या आवाजात जाब विचारत होते त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे. सगळ्यांना समान न्याय देण्याची भूमिका या अशा गंभीर विषयात घ्यायलाच पाहिजे. नाहीतर ही फक्त मलमपट्टी ठरेल.राज्यात अधिकाºयांच्या मनमानीला राजकारण्यांची साथ राज्याला बिहारच्या दिशेने नेणारी आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या कहाण्या विधिमंडळात गाजल्या. त्यांना आयुक्त करावे म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लेखी पत्र दिले होते. दुसरीकडे वर्षानुवर्षे मुंबईत ठाण मांडलेल्या एफडीएच्या १२ अधिकाºयांच्या बदल्या केल्यानंतर ते अधिकारी मॅटमध्ये गेले. तेथे मंत्र्यांचे आदेशही अंधारात ठेवून केस लढवण्यापर्यंत त्यांची मजल गेली. मॅटनेच या सगळ्या गोष्टी उघडकीस आणल्या. तरीही मंत्र्यांना पणाला लावणाºया एकाही अधिकाºयावर कोणतीही कारवाई करण्याची हिंमत मंत्री गिरीश बापट यांनी दाखवली नाही. मुक्या जनावरांना लाळ्या खुरकत आजार होऊ नये म्हणून देण्यात येणारी लस वर्षभर दिली गेली नाही. विभागाचे उपसचिव, आयुक्त बेमुर्वतखोर वागले, प्रधान सचिवांनी सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आणल्या, मात्र मंत्री महादेव जानकर यांनी त्या अधिकाºयांनाच अभय दिले आणि विरोधक न्यायिक चौकशीची मागणी करत असताना मुख्यमंत्र्यांनी जानकर अडचणीत येऊ नयेत म्हणून स्वत:च्या पारदर्शी कारभाराला मुरड घालत त्यांना अभय दिले.राज्यपालांचे भाषण मराठीत वाचून दाखवण्याची अखंड परपंरा यावेळी विधिमंडळ अधिकाºयांच्या हलगर्जीपणामुळे मोडीत निघाली. मुख्यमंत्र्यांना त्यासाठी सभागृहात माफी मागावी लागली. त्यांनी या प्रकरणी दोषी असणाºयांना आजच्या आज घरी पाठवा असे सभागृहात सांगितले. राज्यपालांनी याची चौकशी करून कठोर शासन करा असे पत्र पाठवले. मात्र अधिवेशन संपत आले तरी कोणतीही कारवाई झालेली नाही.माहिती अधिकारात ग्रामविकास सचिवांकडे एक अर्ज केला. त्यांनी तो सीएससी ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस लि. कंपनीकडे पाठवला. तेथे काम करणाºया कृष्णन अय्यर या अधिकाºयाने तो अर्ज तीन महिने फिरवत ठेवलाय. तिकडे शैलेश गांधी यांनी माहिती अधिकाराची स्थिती चिंताजनक असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केलीय. हे असे चित्र असताना कसल्या पारदर्शकतेच्या गोष्टी करायच्या? असले बेफिकीर अधिकारी मुख्यमंत्र्यांची बदनामीच करतात हेही लक्षात येत नसेल का? प्रशासनात मंत्री कमकुवत असले की अधिकारी बेफाम सुटतात. याची अनेक उदाहरणे आज पहायला मिळत आहेत. सरकार कुणाचे? अधिकाºयांचे की नेत्यांचे हा प्रश्न राज्यकर्त्यांनीच स्वत:ला विचारावा.