शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोणता झेंडा घेऊ हाती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 04:16 IST

भाजपाचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्याशी कानगोष्टी तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मैत्रीची टाळी देत असूनही दिल्लीश्वर त्यांच्याकडे लक्ष देत

भाजपाचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्याशी कानगोष्टी तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मैत्रीची टाळी देत असूनही दिल्लीश्वर त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याने ते द्विधा मन:स्थितीत आहेत. लोकसभा निवडणुकीला अद्याप वर्षाहून अधिक कालावधी असल्याने नेमकी काय भूमिका घ्यावी, हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. नाना पटोले यांची घरवापसी आणि आशिष देशमुख यांनी खांद्यावर घेतलेला विदर्भाचा झेंडा या पार्श्वभूमीवर खडसे यांच्या हालचालींकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहणे स्वाभाविक आहे.जळगाव जिल्ह्यात भाजपाच्या वाढीत खडसे यांचे मोठे योगदान आहे, हे निश्चित. परंतु खडसे यांची कार्यपद्धती रा.स्व.संघ आणि भाजपामधील जनसंघी मंडळींना रुचत नाही. युती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात खडसेंचा मंत्रिमंडळातील सहा महिने विलंबाने झालेला प्रवेश हा ‘मनभेदा’चा परिपाक होता. भाजपाच्या दुसºया कार्यकाळात खडसे यांना मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात माळ पडली, तरीही पक्षश्रेष्ठींनी महसूल, कृषी यांसह तब्बल १२ खात्यांचा कार्यभार खडसे यांच्याकडे सोपविला होता. आषाढी एकादशीला पंढरपुरात खडसे यांनी अन्यायाची भाषा पहिल्यांदा केली आणि पुढे कटुता वाढत गेली. काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकाळात खडसे हे विरोधी पक्षनेते होते. सरकार आणि मंत्र्यांविरुद्ध त्यांनी विधानसभा आणि सभागृहाबाहेर जोरदार रणशिंग फुंकले होते. त्याच खडसेंविरुद्ध लागोपाठ आरोपांची मालिका सुरू झाल्याचे सव्वा वर्षात दिसून आले. त्याची परिणती मंत्रिपदाच्या राजीनाम्यात झाली. सत्ता जाताच लाभार्थीदेखील दूर जाऊ लागतात, याचा अनुभव खडसेंना २० महिन्यांच्या कार्यकाळात आला. विधान परिषद, जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीत खडसेंची नाराजी कायम असूनही जळगाव जिल्ह्यात भाजपा पहिल्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी खडसेंकडे दुर्लक्ष सुरू केले. परिणामी बंडाचा झेंडा हाती घेऊन खडसे रोज सरकार आणि पक्षाला झोडपत आहेत. रेशीमबागेतील वर्गाला दांडी, राष्टÑवादीच्या संघर्ष यात्रेचे निवासस्थानी स्वागत, राष्टÑवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या तसेच काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षांच्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थिती, त्या व्यासपीठावरून पक्ष बाहेर ढकलत असल्याची भाषा, लेवा समाजाच्या अधिवेशनात अपात्र लोक देशात सत्ता राबवित असल्याची केलेली टीका हे सगळे खडसे जाणीवपूर्वक करीत असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. अलीकडे काँग्रेसचे प्रभारी मोहनप्रकाश यांच्यासोबत कॉफीपान आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट झाली. स्वाभाविकपणे तर्कवितर्काला उधाण आले. मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खडसे यांची भेट घडवून आणण्याच्या बातम्या आल्या. परंतु खडसेंविरोधात मुखपत्रातील अग्रलेख आणि खडसे भाजपा सोडणार नाहीत, असे संजय राऊत यांनी ठाम केलेले विधान पाहता सेनेशी सूत जमणे कठीण दिसते. सूनबाईची खासदारकी, पत्नीचे महानंद व जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद, कन्येचे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद ही कुटुंबातील सत्तापदे पाहता खडसे भाजपा सोडणार नाही, असा त्यांच्या निकटवर्तीयांचा सूर आहे. याचा अर्थ स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी खडसे यांची ही आदळआपट आहे, असेच म्हणावे लागेल.- मिलिंद कुलकर्णी

टॅग्स :BJPभाजपाEknath Khadaseएकनाथ खडसे