शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव कोणत्या दिशेने चाललेय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 22:22 IST

- मिलिंद कुलकर्णी जळगावातील गेल्या काही दिवसांमधील घटना बघीतल्यानंतर सर्वसामान्य नागरिकाला चिंता वाटते आहे. सर्वच क्षेत्रातील मंडळी भयग्रस्त आहेत. ...

- मिलिंद कुलकर्णीजळगावातील गेल्या काही दिवसांमधील घटना बघीतल्यानंतर सर्वसामान्य नागरिकाला चिंता वाटते आहे. सर्वच क्षेत्रातील मंडळी भयग्रस्त आहेत. कारण मातब्बर मंडळींविषयीच्या या घटना आश्चर्यकारक आणि अनाकलनीय अशाच आहेत. उघडपणे कोणीही बोलत नाही, पण कुजबूज मात्र वेगाने सुरु आहे. दबलेल्या आवाजाचा परिणाम किती होतो माहित नाही, मात्र जळगाव बदलतंय यावर बहुतेकांचे एकमत होत आहे.गोरजाबाई जिमखान्यात सर्वसामान्य माणूस फारसा जात नाही. त्यामुळे तिथे काय चालते, याची त्याला माहिती नाही. माजी महापौर ललित कोल्हे यांनी बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांना त्याच जिमखान्याच्या परिसरात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला. पोलिस कर्मचाऱ्यांनी मारहाणीच्या घटनेनंतर तेथे भेट देऊन पाहणी केली. पहिल्यांदा जिमखान्यातील छायाचित्रे वर्तमानपत्रात प्रसिध्द झाली. सोशल क्लब म्हणून नोंदणी झालेला हा जिमखाना १९१६ मध्ये तत्कालीन ब्रिटीश जिल्हाधिकारी सिमकॉक्स याने स्थापन केला होता. समाजातील प्रतिष्ठित मंडळी त्याचे सभासद आहेत. ललित कोल्हे यांचे वडील माजी नगरसेवक विजय कोल्हे हे त्या जिमखान्याचे अध्यक्ष आहेत. त्याठिकाणी ही घटना घडली. सीसीटीव्ही फूटेजमध्ये हाणामारी कैद झाल्याने त्याचा डीव्हीआर गायब झाला होता. दुसºया दिवशी त्याच परिसरातील झुडपांमध्ये तो आढळला. साहित्या आणि कोल्हे यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. पैशांच्या देवाणघेवाणीचा विषय असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. साहित्या हे अधिक उपचारासाठी मुंबईला रवाना झाले असून भाजपचे मनपातील सभागृह नेते असलेले कोल्हे फरार आहेत. साहित्या आणि कोल्हे हे पूर्वी एकमेकांचे मित्र होते. अचानक वितुष्ट येण्याचे कारण काय याविषयी कुजबूज आहेच.दुसरी घटना तर माणुसकीला काळीमा फासणारी आहे. मकरसंक्रांतीच्या सणाला एकमेकांना तीळगुळ देऊन ‘तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणून कटुता विसरण्याचा अनोखा संदेश दिला जातो. भारतीय संस्कृतीमधील गोडवा या सणाने अधोरेखित होतो. मात्र एका महिलेच्या जीवनात हा दिवस भयप्रद ठरला. घर भाड्याने हवे आहे, म्हणत घरी आलेल्या दोन पुरुष आणि एका महिलेने या घरमालक महिलेला विवस्त्र करीत बांधून ठेवले. मोबाईलमध्ये छायाचित्रे काढून वाच्यता केल्यास व्हायरल करण्याची धमकी दिली. रोकड, सोन्याचे दागिने आणि प्रॉपर्टीशी संबंधित स्टॅम्प पेपर लांबविले. सणाच्या दिवशी भर दुपारी भरवस्तीत हा प्रकार घडतो हेच मुळी धक्कादायक आहे. अपार्टमेंट संस्कृती अजून जळगावात रुळलेली नसताना हे घडणे म्हणजे भयसूचक घंटा आहे. महानगरांमधील गुन्हेगारी जळगावकरांच्या उंबरठ्यापाशी तर आली नाही ना, असा प्रश्न पडतो. पोलिसांना या प्रकरणातही अद्याप छडा लागलेला नाही. मात्र आरोपींच्या संवादातील मालमत्ता हडपण्याचा उल्लेख आणि स्टॅम्प पेपरची चोरी हे विषय कळीचे ठरु शकतात.पत्रकाराला समाजाचे जागल्या म्हणून मानले जाते. नुकतेच ६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा करताना पत्रकारांना पुन्हा एकदा या असिधारा व्रताची आठवण करुन देण्यात आली. व्रत की व्यवसाय अशी मतभिन्नता असली तरी हे क्षेत्र आमुलाग्र बदलत आहे, हे मान्य करायला हवे. जळगावातील पत्रकार प्रमोद बºहाटे यांच्याविरुध्द खंडणी मागितल्याचा दाखल झालेला गुन्हा, अटक आणि पाच लाख रुपयांची मागणी करतानाचा व्हारयल झालेला व्हीडीओ धक्कादायक आहे. वाळू व्यावसायिक अजय बढे यांनी तक्रार केली आणि दुसºया दिवशी पत्रकार परिषद घेऊन आणखी आरोप केले. पाचोºयाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे आणि तहसीलदार कैलास तावडे यांची नावे तक्रारीत आहेत. पोलीस अधिकारी त्यांनाही चौकशीसाठी बोलाविणार आहे. वाळू व्यवसायाचे अर्थकारण आणि त्याच्याशी आता पत्रकाराचे जोडलेले गेलेले नाव हा विषय गंभीर असाच आहे.केळी, कापूस आणि कवितेचे गाव, सांस्कृतिक गाव, केशवसूत-बालकवी-बहिणाबाई-महानोरांसारख्या कवींचे गाव, बालगंधर्वाचा पुनीत स्पर्श झालेले गाव, दाल उद्योग, पाईप उद्योग, सुवर्णबाजाराने दिलेली वेगळी ओळख, वांग्याचे भरीत, मेहरुणची बोरे ही वैशिष्टये, या सगळ्यांचा अभिमान बाळगत असणाºया आम्हा जळगावकरांना पुन्हा एकदा बदनामीच्या, गुन्हेगारीच्या कालखंडाकडे जावे लागणार आहे का, असा अस्वस्थ प्रश्न भेडसावत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव