शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
5
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
6
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
7
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
8
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
9
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
10
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
11
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
12
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
13
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
14
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
15
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
16
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
17
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
18
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
19
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
20
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
Daily Top 2Weekly Top 5

वाचनीय लेख - इतक्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 09:47 IST

ऑक्टोबर २०२२मध्ये नोकऱ्यांची संख्या ७८ लाखांनी कमी झाली. परंतु, बेरोजगारांची संख्या केवळ ५६ लाखांनी वाढली.

राही भिडे

सध्या देशभर नोकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे, असे रोजगाराच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०२२मध्ये जागतिक व्यापारवाढीचा दर ३.५ टक्के असेल, तर २०२३मध्ये तो केवळ एक टक्क्यांपर्यंत कमी होईल. एक प्रकारे, हा अंदाज जागतिक मंदीचा सांगावा आहे. म्हणजे भारताची निर्यात आणखी कमी होईल आणि ही घट म्हणजे रोजगार बाजारावर आलेले काळे ढग असतील. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या आकडेवारीवरून असे दिसते, की बेरोजगारीचा दर सप्टेंबर २०२२मध्ये ७.८ टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑक्टोबर २०२२मध्ये ग्रामीण बेरोजगारीचा दर आठ टक्के नोंदवला गेला. बेरोजगारी भारतीय अर्थव्यवस्थेला जळूसारखी चिकटली आहे, यात शंका नाही. जून २०२०पासून, बेरोजगारीचा सरासरी दर ७.७ टक्के राहिला आहे. चिंतेची बाब म्हणजे ऑक्टोबर २०२२मध्ये केवळ बेरोजगारीचा दर वाढला नाही तर रोजगार बाजारपेठेतील कामगारांचा सहभागही कमी झाला आहे. कामगार सहभाग दर (लेबर पार्टिसीपेशन रेट, एलपीआर) सप्टेंबर २०२२मध्ये ३९.३ टक्के होता, जो ऑक्टोबर २०२२मध्ये  ३९ टक्के झाला. जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२२पर्यंत (एप्रिल महिना वगळता) ‘एलपीआर’ सतत ४० टक्क्यांच्या खाली आहे. ‘एलपीआर’मधील घसरण हे कार्यरत लोकसंख्येमध्ये वाढत्या नैराश्याचे द्योतक  आहे.  

ऑक्टोबर २०२२मध्ये नोकऱ्यांची संख्या ७८ लाखांनी कमी झाली. परंतु, बेरोजगारांची संख्या केवळ ५६ लाखांनी वाढली. म्हणजे जवळपास २२ लाख लोक रोजगार बाजारातून निराश होऊन आपल्या घरी परतले.  ग्रामीण भागातील नोकऱ्या कमी होऊ लागतात, त्याही बिगर कृषी क्षेत्रातील नोकऱ्या कमी होतात, तेव्हा नोकरीच्या बाजारपेठेतील परिस्थिती अधिक चिंताजनक बनते. ऑक्टोबर २०२२मध्ये ग्रामीण नोकऱ्यांमध्ये झालेली घसरण ही केवळ बिगर कृषी क्षेत्रात झाली आहे. तथापि, ऑक्टोबर २०२२वगळता कृषी क्षेत्रातही गेल्या एक वर्षापासून नोकऱ्यांमध्ये सातत्याने घट होत आहे. नोकऱ्यांच्या बाबतीत, नोव्हेंबर २०२१मध्ये कृषी क्षेत्रात १६.४ कोटी लोकांना रोजगार मिळाला होता. परंतु, त्यानंतर हा आकडा झपाट्याने खाली आला. सप्टेंबर २०२२मध्ये केवळ १३ कोटी ४० लाख लोक कृषी क्षेत्रात कार्यरत असल्याचे दिसून आले. ऑक्टोबर २०२२मध्ये या आकडेवारीत थोडी सुधारणा झाली आणि ती वाढून १३.९६ कोटी झाली. परंतु, गेल्या ४ वर्षांमध्ये ऑक्टोबर महिन्यात कृषी क्षेत्रातील नोकऱ्यांचा हा किमान आकडा आहे. सेवा क्षेत्रदेखील ऑक्टोबर २०२२मध्ये कोमेजलेले दिसले. सेवा क्षेत्रातील ७९ लाख नोकऱ्या गेल्या. यापैकी ४.६ दशलक्ष ग्रामीण भागात आणि ४.३ दशलक्ष किरकोळ क्षेत्रात होते. म्हणजेच सेवा क्षेत्राचा जवळपास निम्मा वाटा असलेल्या रिटेल क्षेत्राची अवस्थाही ग्रामीण भागात दयनीय होत आहे. याचा सरळ अर्थ असा आहे, की ग्रामीण भारतातील क्रयशक्ती कमी होत आहे आणि मागणी कमी होत आहे. औद्योगिक क्षेत्राचे चित्रही उदास आहे. येथे ऑक्टोबर २०२२मध्ये ५३ लाख नोकऱ्या गेल्या. सर्वाधिक नोकऱ्या निर्माण करणाऱ्या  बांधकाम क्षेत्रात दहा लाखांहून अधिक नोकऱ्या गेल्या. ऑक्टोबर २०२२मध्ये शहरी भागातील रोजगाराची स्थिती थोडी चांगली दिसली. परंतु, नोव्हेंबर २०२२च्या बेरोजगारीच्या दरवाढीमुळे ही सुधारणा अनावश्यक होत असल्याचे दिसते. नोव्हेंबर २०२२मध्ये शहरी बेरोजगारीचा दर आठ टक्क्यांच्या वर आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दरही साडेसात टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबर २०२२मध्ये शहरांमध्ये एकूण १२.६ कोटी नोकऱ्या होत्या. ऑक्टोबर २०२२मध्ये हा आकडा वाढून १२.७४ कोटी झाला. मात्र, आकारमानाचा विचार करता शहरी भागासाठी ही वाढ नगण्य आहे.  

ऑक्टोबर २०२२मध्ये, निर्यात १६.६५ टक्क्यांनी घसरून वीस महिन्यांच्या नीचांकी २९.७८ अब्ज डॉलरवर आली, तर आयात सहा टक्क्यांनी वाढून ५६.६९ अब्ज डॉलर झाली आहे. २०२२च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, निर्यात केवळ १२.५५ टक्क्यांनी वाढली आणि  २६३.३५ अब्ज डॉलर झाली, तर आयात ३३.१२ टक्क्यांनी वाढून  ४३६.८१ अब्ज डॉवर झाली. निर्यात - आयातीची ही प्रवृत्ती देशांतर्गत रोजगार बाजाराच्या भविष्यासाठी दुधारी तलवारीसारखी आहे. एकीकडे निर्यातीत घट झाल्याने नोकऱ्यांचे नुकसान होणार आहे, तर दुसरीकडे आयात बिल वाढल्याने भांडवली गुंतवणुकीवर परिणाम होईल. त्याचा परिणाम रोजगार उपलब्धतेवर होणार आहे.

(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टॅग्स :jobनोकरीIndiaभारत