शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

इथे होती कुठे गेली? २ सेकंदांत ७०० कि.मी. वेग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 05:13 IST

गेली काही वर्षे चीनचे संशोधक यासाठी प्रयत्नशील आहेत. तब्बल दहा वर्षांनी त्यांना यात यश मिळालं. 

चीनमधील काही दिवसांपूर्वीचीच घटना. रेल्वे ट्रॅकवर एक ट्रेन आली; पण डोळ्यांचं पातं लवतं ना लवतं एवढ्यात ती अदृश्य झाली! जणू काही ही ट्रेन रुळांवर आली होती की नाही? की आपल्याला भास झाला? - उपस्थित सगळ्यांनाच हा आश्चर्याचा धक्का होता; पण हा भास नव्हता तर ते वास्तव होतं...! या ट्रेननं २ सेकंदांत ताशी तब्बल ७०० किलोमीटर वेग घेतला होता. वेगाच्या बाबतीत हा जागतिक विक्रम आहे. गेली काही वर्षे चीनचे संशोधक यासाठी प्रयत्नशील आहेत. तब्बल दहा वर्षांनी त्यांना यात यश मिळालं. 

चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी या अतिवेगवान मॅग्लेव ट्रेनची यशस्वी चाचणी केली. या चाचणीचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे आणि त्यामुळे सगळ्यांनीच आश्चर्यानं बोटे तोंडात घातली आहेत! जवळपास एक टन वजनाच्या या ट्रेनला ४०० मीटर लांबीच्या खास ट्रॅकवर चालवण्यात आलं. चाचणीदरम्यान ट्रेननं काही क्षणांतच विक्रमी वेग गाठला. त्यानंतर सुरक्षित पद्धतीनं या ट्रेनला थांबवण्यातही आलं. 

शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, ही आत्तापर्यंतची सर्वांत वेगवान सुपरकंडक्टिंग इलेक्ट्रिक मॅग्लेव ट्रेन आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये याच ट्रॅकवर ही ट्रेन ताशी ६४८ किलोमीटर वेगानं चालवण्यात यश आलं होतं; पण आता ताशी ७०० किलोमीटरचा टप्पा पार करत या ट्रेननं नवा जागतिक विक्रम केला आहे. मॅग्लेव ट्रेनची खासियत अशी की, ती रुळांना स्पर्शच करत नाही. या ट्रेनमध्ये लावलेले शक्तिशाली चुंबक ट्रेनला हवेत उचलतात आणि पुढच्या दिशेनं ढकलतात. चाके आणि रुळांमध्ये कोणताही संपर्क नसल्यामुळे घर्षण निर्माण होत नाही. त्यामुळे ट्रेन प्रचंड वेगानं धावू शकते.

शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, ज्या शक्तीनं ही ट्रेन पुढे जाते, त्याच तंत्रज्ञानाचा वापर भविष्यात रॉकेट प्रक्षेपणासाठीही केला जाऊ शकतो. जर हे तंत्रज्ञान प्रवासी ट्रेनमध्ये वापरलं गेलं, तर मोठ्या शहरांमधला प्रवास काही मिनिटांत पूर्ण होऊ शकेल. हे तंत्रज्ञान भविष्यातील हायपरलूप वाहतुकीची पायाभरणी करू शकतं. हायपरलूपमध्ये ट्रेन व्हॅक्युमसारख्या बंद नळ्यांमधून प्रचंड वेगानं धावेल. त्यामुळे प्रवास आणखी वेगवान आणि सुरक्षित होईल.या पार्श्वभूमीवर भारतातल्या सर्वांत वेगवान ट्रेनचा वेग किती आहे? सध्या भारतातील सर्वांत वेगवान ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आहे. तिचा कमाल वेग ताशी साधारण १८० किलोमीटर आहे. दैनंदिन प्रवासात हीच ट्रेन देशातील सर्वांत वेगवान ट्रेन मानली जाते. भविष्यात भारतातील सर्वांत वेगवान ट्रेन बुलेट ट्रेन असेल. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान तिचं काम सुरू आहे. ती सुरू झाल्यावर तिचा वेग ताशी सुमारे ३२० किलोमीटर असेल.

जर्मनी आणि ब्रिटननं सर्वांत आधी मॅग्लेव तंत्रज्ञानावर काम सुरू केलं होतं; पण आज तिथे मॅग्लेव ट्रेन धावत नाहीत. जर्मनीच्या तंत्रज्ञानावरच चीनची पहिली मॅग्लेव ट्रेन तयार झाली होती. आज चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या तीन देशांमध्येच फक्त मॅग्लेव ट्रेन धावत आहेत. हे तंत्रज्ञान अत्यंत महाग आणि गुंतागुंतीचं आहे. मॅग्लेवसाठी पूर्णपणे वेगळा ट्रॅक आणि पायाभूत सुविधा लागतात. नेहमीच्या रेल्वेमार्गावर त्या चालत नाहीत. त्यामुळे त्यांचं प्रमाणही कमी आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : China's Maglev Train: 700 km/h in 2 Seconds!

Web Summary : China's Maglev train achieved a world record speed of 700 km/h in just 2 seconds. The super-fast train uses magnets to levitate, eliminating friction. This technology could revolutionize travel, paving the way for hyperloop systems and faster commutes.
टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनchinaचीनTravel Tipsट्रॅव्हल टिप्स