शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

कुठे चाललोय आपण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:55 IST

एखाद्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालतो, हे आम्हाला जसे लवकर माहीत होते तसे एखाद्या ठिकाणी गायत्री मंत्र पठन वा मोफत योग शिबिर होत असेल तर ते माहीत असूनही आम्ही सोशल मीडियावर व्हायरल का करत नाही ?

- जितेंद्र ढवळेएखाद्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालतो, हे आम्हाला जसे लवकर माहीत होते तसे एखाद्या ठिकाणी गायत्री मंत्र पठन वा मोफत योग शिबिर होत असेल तर ते माहीत असूनही आम्ही सोशल मीडियावर व्हायरल का करत नाही ?आठ दिवसांपूर्वी नागपुरात पवनकर कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या कशासाठी करण्यात आली? मारणारा संशयित आरोपी विवेक पालटकर हा सायको होता? त्याने कौटुंबिक वादातून हे हत्यांकाड घडवून आणले, असा कयास परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी बांधला आहे. नराधम पालटकर हत्याकांडानंतर फरार झाला आहे. मात्र या हत्याकांडानंतर सोशल मीडियावर आणि नागपूरकरांवर प्रेम न करणाऱ्यांनी पुन्हा एकदा नागपूरला ‘क्राईम कॅपिटल’ची बिरुदावली लावली आहे. गत सहा वर्षांत नागपुरात दुहेरी हत्याकांडाची सहा आणि तिहेरी हत्याकांडाची पाच प्रकरणं घडली. काही व्यक्तिगत कारणांमुळे तर काही आपसी वैमनस्यातून ही हत्याकांड घडली आहेत. मुळात या हत्याकांडाचा खोलवर अभ्यास केला तर क्रोध आणि अहंकार या दोन गोष्टी यात दडल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी नरसाळ्यात कोंबडी अंगणात आल्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर एका माथेफिरूने तिघांना ठार मारले होते. अतिक्रोधाचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.२६ जून २०१२ रोजी कळमन्यातील आभा कॉलनीत नाथजोगी समुदायातील सुपडा मगन नागनाथ, हसन दादाराव सोलंकी आणि पंजाब भिकाराम शिंदे या तिघांची जमावाने अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. हे बिचारे पोट भरण्यासाठी महिलांचे सोंग (वेशांतर) करून भीक मागत होते. जमावाच्या नावाखाली अविवेकी वृत्तीने या तिघांना दगडाने ठेचून ठार मारले होते. या हत्याकांडात तर मारणारे आणि मरणारे दोन्ही पक्ष गुन्हेगारी प्रवृत्तीचे नव्हते. मग यालाही क्राईम कॅपिटलची फोडणी आपण लावायची का? १७ फेब्रुवारी २०१८ रोजी नंदनवन परिसरात राशी कांबळे आणि उषा सेवकदास कांबळे या आजीनातीची गणेश शाहू आणि साथीदारांनी निर्घृण हत्या केली होती. यात मरणाºया राशीचा काय दोष होता ? मात्र येथेही क्रोधाने निरागस मुलीचा बळी घेतला. स्वत:च्या चार वर्षीय मुलासह बहीण, जावई, भाची आणि बहिणीची सासू या सर्वांना एकाच वेळी एवढ्या क्रूरपणे मारून विवेक पालटकर याने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मात्र हे हत्याकांड त्यानेच घडवून आणले, हे अद्यापही कायदेशीररीत्या कुठेच सिद्ध झालेले नाही. पालटकरला तातडीने अटक झालीच पाहीजे. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून पवनकर कुटुंबातील हत्याकांडावर पर्दाफाश करण्याची मागणी समाजातून प्रखरतेने होताना दिसत नाही. मात्र एखादे हत्याकांड घडल्यानंतर केवळ पोलिसांचा गुन्हेगारावर वचक राहिला नाही, नागपूरची कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, असे उपदेश सोशल मीडियावर पहायला आणि शहरातील कट्ट्यावर ऐकायला मिळतात. मात्र हे असे का होतेय ? नागपुरात अशा घटना घडू नये यासाठी सोशल मीडियावर कुणी तसा मॅसेज किंवा व्हिडीओ टाकल्याचे क्वचितच पाहावयास मिळते. मात्र एखाद्या पोलीस वाल्याने कुणाशी वाद घातला किंवा कुणाला मारले तर तो व्हिडीओ आम्ही क्षणाचाही विलंब न करता विविध गु्रपवर व्हायरल करतो. मात्र नागपुरात एखादी चांगली घटना घडली तर ती समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी किती लोक पुढाकार घेतात? एखाद्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालतो, हे आम्हाला जसे लवकर माहीत होते तसे एखाद्या ठिकाणी गायत्री मंत्र पठन वा मोफत योग शिबिर होत असतील तर हे माहीत असूनही आम्ही सोशल मीडियावर व्हायरल का करत नाही ? सजग नागपूरकर म्हणून ही आमची जबाबदारी नाही का ?

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया