शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

एकट्या राहुल गांधींनाच काय दोष द्यायचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 12:22 IST

बहुतांश राजकीय नेते स्वीय सचिव, मदतनिसांवर अवलंबून असतातच! काँग्रेस पक्षामध्ये तर या सहायकांची प्रदीर्घ परंपराच आहे!

हरीष गुप्ता; नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्लीपक्षाच्या अवनतीला राहुल गांधी यांचे स्वीय सचिव जबाबदार असल्याचा आरोप गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्ष सोडण्यापूर्वी केला. कोणत्याही एका सचिवाचे नाव त्यांनी घेतले नसले, तरी राहुल यांच्या अवतीभवतीचे त्यांचे मदतनीस हाच त्यांच्यापर्यंत पोहोचण्यातील अडसर असल्याचे आझाद यांनी म्हटले. परंतु, राजकीय वर्तुळात मात्र याबद्दल कुणालाही फारसे आश्चर्य वाटलेले नाही. ते स्वाभाविकही आहे. पक्षाचे आजवरचे सर्व अध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्या आयुष्यात स्वीय सचिव आणि व्यक्तिगत मदतनीस यांचे एवढे महत्त्व वादातीतच राहिलेले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या राजकीय प्रवासात एम. ओ. मथाई यांना फार मोठे महत्त्व होते. त्यांच्या नात्याचे वर्णन अनेक पुस्तकांतूनही  केले गेले आहे. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाबरोबर जवळपास ५० वर्षे व्यतित केली. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या काळात आर. के. धवन आणि माखनलाल फोतेदार यांनी कोणती भूमिका निभावली हे त्यांना चांगलेच ठाऊक असेल. या दोघांच्या मदतीशिवाय इंदिराजींना कोणीच भेटू शकत नसे. पक्षाच्या राजकीय संस्कृतीचा तो एक भाग झाला होता; आणि मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, ज्येष्ठ नेते या सगळ्यांना ते स्वीकारावे लागत असे. राजीव गांधी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून व्ही. जॉर्ज यांचे स्थान आणि महत्त्व तत्कालीनकाँग्रेसवाल्यांना नेमके माहिती होते. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर हे जॉर्ज सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव झाले. दीर्घकाळ त्यांनी सोनियांना सहाय्य केले. अर्थात काही नेते हुशार असतात. आपले सचिव आणि स्वीय सहाय्यक मंडळी डोईजड होऊ नयेत, याची व्यवस्था ते चतुराईने सांभाळतात. अधूनमधून सचिव बदलत राहतात. पण काहीही झाले तरी राजकीय नेते हे स्वीय सचिव, विशेष अधिकारी, मदतनीस यांच्यावर पुष्कळच अवलंबून असतात. भेटायला येणाऱ्या व्यक्तींना रोखून, त्यांचे काम-हेतू नेमका ओळखून या अभ्यागतांच्या गर्दीला चाळणी लावण्याचे काम ही मंडळीच करत असतात. योगायोग असा की, आर. के. धवन, माखनलाल फोतेदार हे पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये मंत्री पदापर्यंत पोहोचले. व्ही. जॉर्ज यांना राज्यसभेची जागा मात्र मिळाली नाही. - हे असे सगळे असताना केवळ राहुल गांधी यांनाच काय दोष द्यायचा?

पवारांनी पंख पसरले...महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि इतर राज्यांमध्ये शिकारी करण्याचा मोठा घाट भारतीय जनता पक्षाने घातला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मात्र दिल्ली आणि हरियाणामध्ये आपल्या पक्षाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहेत. पक्ष बळकटीसाठी त्यांनी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये युवकांची शिखर बैठक घेतली. हरियाणातही त्यांनी कार्यकर्त्यांचा एक मोठा मेळावा भरवला होता. पक्ष मजबूत करण्यासाठी इतरही राज्यांत अशा बैठका, मेळावे घेण्याचा त्यांचा मानस आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुका होतील तेव्हा आपले महत्त्व दिसावे, या प्रयत्नात पवार असल्याचे अंतस्थ सूत्रांकडून कळते. परंतु, उत्तर भारतीय राज्यांमध्ये पक्षाचे पंख पसरविण्याची वेळ आता निघून गेली आहे, असे इतर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांना वाटते आहे, हेही तितकेच खरे!नवे महाधिवक्ता लवकरचएक वेगळेच पाऊल टाकून पंतप्रधान मोदी यांनी देशाचे महाधिवक्ता के. के. वेणूगोपाळ यांना त्यांचा उत्तराधिकारी शोधायला सांगितले आहे. ९० वर्षीय वेणूगोपाळ यांना या कामासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अंतिमतः नव्या महाधिवक्त्यांचे नाव सुचविण्यासाठी एक त्रिसदस्य समिती नेमण्यात आली. या समितीने तीन नावे निश्चित केली : सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, राकेश द्विवेदी आणि सी. एस. वैद्यनाथन. यातील वैद्यनाथन यांनी राम जन्मभूमी प्रकरणात राम लल्लाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली होती. या यादीसाठी मुंबईचे दारीअस जे. खंबाटा यांचेही नाव होते. महाराष्ट्राचे महाधिवक्ता आणि देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून खंबाटा यांनी काम पाहिलेले आहे.

हरिवंश राज्यसभा उपाध्यक्ष राहणारराज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सध्या पेचात आहेत. जनता दल (संयुक्त) या त्यांच्या पक्षाने भाजपशी संबंध तोडल्यानंतर आपल्या पदावर पुढे राहायचे की नाही, हा त्यांच्या पुढचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. ते जदयूचे राज्यसभा खासदार असून, त्यांनी पद सोडावे, अशी अपेक्षा होती. गेल्या महिन्यात पाटण्यात झालेल्या सर्वपक्षीय खासदार, आमदारांच्या बैठकीला ते अनुपस्थित राहिले. परंतु, हे पद पक्षातीत असून, ऑगस्ट २०१८मध्ये संपूर्ण सभागृहाने हरिवंश यांची निवड एकमुखाने केली असल्याने त्यांनी यापुढेही पदावर राहण्यास काहीच हरकत नाही, असे नितीश कुमार यांनी त्यांना कळविल्याचे समजते. हरिवंश यांना नितीश कुमार यांच्या विरोधात जायचे नाही, असे दिसते. कारण त्यांनीच त्यांना सार्वजनिक जीवनात आणले आहे. पक्ष सांगेल तसे आपण करू, असे त्यांनी नितीश कुमार यांना कळविले आहे. - अर्थात आता धूळ बरीचशी खाली बसली आहे. हरिवंश हे राज्यसभेचे कामकाज युक्तीने आणि ठामपणे  चालवत असल्याने भाजपचीही काही हरकत असल्याचे दिसत नाही. आश्चर्य म्हणजे या विषयावर ना ‘जदयू’ने काही भाष्य केले, ना हरिवंश यांनी!

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण