शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

निवडणुका आणि शेअर बाजाराचे नाते काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 11:29 IST

१९९९ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार निवडून आल्यावर मुंबई शेअर बाजार निर्देशांक पुढील तीन महिन्यात सात टक्क्यांनी उंचावला होता.

विनायक कुळकर्णीगुंतवणूक समुपदेशक

लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्या शुक्रवारी पार पडला. एकीकडे जगातल्या मोठ्या लोकशाही देशात होत असलेली ही निवडणूक कायम लक्ष वेधून घेत असते. त्यातून भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी लक्षात घेता विद्यमान सरकारची आर्थिक धोरणे आणि देशांतर्गत सामाजिक तसेच राजकीय वाटचाल बघत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतात गुंतवणुकीस प्राधान्य देत आले आहेत. भारतातील शेअर बाजार राजकीय भावना आणि आर्थिक सुस्थिरता या दोन घटकांना मध्यवर्ती ठेवून हिंदोळे देत असतो असे म्हटले तर गैर ठरणार नाही. एकाच राजकीय पक्षाचे सरकार असेल तर असणारी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक धोरणे अधिक सुसंगत आणि परिणामकारक ठरू शकतात. त्यामुळे शेअर बाजाराची सकारात्मक वाटचाल निर्देशांकात दिसून येत असते.

१९८९ पासून युती आणि आघाड्यांचे सरकार आल्याने आर्थिक सुधारणा करण्यास विविध पक्षांचा अडसर ठरला होता. १९९१ मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर आलेले पी.व्ही. नरसिंहरावांचे सरकार शेअर बाजारात उत्साह आणणारे असले तरीही त्यानंतर १९९६ आणि १९९८ या काळात भारतातील राजकीय अस्थिरता आणि आशिया खंडातील देशांत निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे शेअर बाजारात मंदी आली होती. १९९९ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार निवडून आल्यावर मुंबई शेअर बाजार निर्देशांक पुढील तीन महिन्यात सात टक्क्यांनी उंचावला होता.

त्याच दरम्यान देशाचा सकल उत्पन्न वृद्धी दर ६ -७ टक्क्यांदरम्यान पोहोचला होता. बहुसंख्य क्षेत्रात सुधारणा राबवत, परदेशी गुंतवणुकीस वाव देत अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अमेरिकेतील ९/११ हल्ला आणि देशातील अन्य घटकांमुळे शेअर बाजार निर्देशांक पन्नास टक्क्यांनी घसरला होता. २००४ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आले. त्याची परिणीती पहिल्याच दोन-तीन सत्रात निर्देशांकात पंधरा टक्के घसरण झाली. त्यानंतर २००७ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नात झालेली आठ टक्क्यांची वृद्धी आणि विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीचा विक्रमी ३४ बिलियन डॉलर्सचा ओघ शेअर बाजारात तेजी आणून गेला.

एका दिवसात १७ टक्के झेप २००८ मध्ये जागतिक मंदीचा परिणाम होऊन शेअर बाजार मंदीत गेला असला तरीही २००९ च्या लोकसभा निवडणूक पूर्व काळात पुन्हा रुळावर आला होता. निवडणूक निकालानंतर पुन्हा संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार मनमोहनसिंग यांच्याच नेतृत्वाखाली आले अन् एका दिवसात निर्देशांकाने १७ टक्के झेप घेतली. त्यानंतरच्या तीन वर्षांत १५.५ टक्के वाढ दर्शवली होती.

कोविडचा धक्का पचवून विक्रमी उंची २०१९ मध्ये पुन्हा मोदी सरकार अधिक स्थिरता दर्शवत निवडून आले. मेक इन इंडियाच्या नाऱ्याने आणि धोरणात्मक कर संरचनेतील बदलाने सकारात्मक असलेला शेअर निर्देशांक कोविडचा धक्का पचवून विक्रमी उंचीवर पोहोचला आहे. 

२०२४ नंतर काय?भारतीय उद्योगांत होत असणारी परदेशी गुंतवणूक आणि शेअर बाजारात केली जाणारी गुंतवणूक यांचे वाढणारे प्रमाण लक्षात घेता विद्यमान सरकारची आर्थिक धोरणे योग्य दिशेने पडलेली आहेत, असा अंदाज घेता येतो. २०२४ च्या जून महिन्यात निकालानंतर कोणाचे सरकार येईल, त्यावरून निर्देशांकाची उसळी कुठपर्यंत जाईल याचा अंदाज गुंतवणूकदार बांधत आहेत.

टॅग्स :Stock Marketशेअर बाजारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४