शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धारावी म्हणजे काय? - दारिद्र्य, कष्ट, गुन्हेगारी आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 08:17 IST

अरुंद गल्ल्या, दिवसाही काळोख दाटलेल्या खोल्या, धूर, दुर्गंधी ओकणारे कारखाने, उघड्यावर रटारट शिजणारे अन्न आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर हुंदडणारे बालपण !

- संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत, ठाणे

मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीतील दारिद्र्य, कष्ट, गुन्हेगारी, सोशिकता याचे धारावी झोपडपट्टी हे प्रतीक आहे. २००८ मध्ये प्रदर्शीत झालेल्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटाला आठ ऑस्कर पुरस्कार मिळाले आणि त्यामुळे जगभरात धारावीचे नाव चर्चेत आले. विदेशातून भारतात पर्यटनाकरिता आलेले पर्यटक मुंबई गाठतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया बरोबरच धारावीला भेट देतात. जेमतेम एकाच माणसाला अंग चोरून चालता येईल अशा अरुंद गल्ल्या, दिवसाही काळोख दाटलेल्या खोल्या, प्लास्टिकपासून लेदरपर्यंतचे धूर, दुर्गंधी ओकणारे कारखाने, उघड्यावर रटारट शिजणारे अन्न, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर हुंदडणारे, खिदळणारे बालपण, भंगाराच्या डोंगरात दोन वेळची भाकरी शोधणारे बुभुक्षित डोळे असे बरेच काही आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह या पर्यटकांना होतो. 

‘बॉलीवूडलाही धारावीचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. १९९२ मध्ये सुधीर मिश्रा यांचा ओम पुरीची प्रमुख भूमिका असलेला ‘धारावी’ चित्रपट आला होता. २०१८ मध्ये रजनीकांत व नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘काला’ हा चित्रपट हिट झाला होता. ओटीटीवरही धारावी गाजली आहेच.मुंबईत धारावी सोडली तर कुठेच कुंभारवाडा नाही. मातीची भांडी येथेच बनवली जातात. वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांची लेदर प्रॉडक्ट धारावीत बनतात. कंपन्यांचे लेबल लागताच त्या बेल्ट, बॅग्ज, बूट यांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढतात. चकल्या, पापड, फरसाण, पाणीपुरी व शेवपुरीच्या पुऱ्या असे असंख्य खाद्यपदार्थ येथेच तयार होतात. धारावीतील महिला अहोरात्र कष्ट घेऊन हे अन्नपदार्थ तयार करतात. प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया येथे होते. संपूर्ण शहरातून गोळा केलेले वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक धारावीत जमा होते. तेथे त्यावर प्रक्रिया करून प्लास्टिकचे छोटे साबुदाण्यासारखे गोळे बनवले जातात. हेच वेगवेगळ्या कंपन्या खरेदी करतात व त्यातून हँगरपासून खुर्च्या, टेबलांपर्यंत असंख्य वस्तू तयार होतात. राखी पौर्णिमेला विकल्या जाणाऱ्या राख्यांची निर्मिती येथील घराघरात होते. देशभरातून गोरगरीब माणूस याच कारखान्यांत कष्ट करायला येतो. त्यामुळे धारावीत संपूर्ण देश वास्तव्य करतो. अशा गोरगरीब कामगारांची पैशाची निकड कर्ज देऊन भागवणारी एक जमात या परिसरात एकेकाळी वास्तव्य करीत होती. महापालिकेचे चतुर्थश्रेणी कामगार त्यांच्याकडून कर्ज घ्यायचे. कर्जाचे व्याज चक्रवाढ पद्धतीने आकारले जात असल्याने कर्ज घेणारा कर्जाच्या विळख्यात गुरफटून जायचा. आता धारावीतील ही सावकारी क्षीण झाली आहे. पण, एकेकाळी ती धारावीची ओळख होती.

धारावीतील  खोलीत २० ते २५ कामगार राहतात. सकाळच्या पाळीचे कामगार कामावर गेले की, रात्रपाळी करून येणारे कामगार बिछाना पसरून पाय लांब करतात. दुपारी कामावर जाणारे रात्रपाळीच्या कामगारांना खोली मोकळी करून देत इकडे तिकडे भटकून कामावर जातात. कोरोनाकाळात एकाच वेळी २० ते २५ कामगारांना त्या इवल्याशा खोलीत सक्तीने डांबून घेण्याची वेळ आली. शेकडो किलोमीटर चालत गाव गाठण्याकरिता धडपडला तो हाच धारावीतील कामगार. 

धारावीत सुमारे ३० वर्षांपूर्वी आठ हजार रुपयांत झोपडी खरेदी करता येत होती. आज धारावीतील दाट वस्तीमधील झोपडीला २५ लाखांचा भाव आहे. रस्त्यालगत मोक्याच्या ठिकाणच्या झोपडीकरिता ५० ते ७० लाख दर आहे. धारावीत चार मजली झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. झोपडीवर झोपडी चढवून देणारे सत्तरच्या आसपास कंत्राटदार धारावीत वावरत असतात. महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसबरोबर संगनमत करून उभ्या राहिलेल्या या झोपड्या कोसळून अपघात होण्याच्या काही घटना घडल्या आहेत. या अशा घटनाही इथे नव्या नाहीत. 

मुंबईत एकेकाळी डोंगरीत दाऊद, भायखळ्यात अरुण गवळी, चेंबूरमध्ये छोटा राजन अशा गँग सक्रिय असताना धारावी-माटुंग्यात वरदराजनची दहशत होती. वरदराजनचा उजवा हात एस.के. रामस्वामी हा हाजी मस्तानच्या दलित-मुस्लीम सुरक्षा महासंघाच्या वतीने महापालिका निवडणुकीत धारावीतून विजयी झाला होता. सध्या गुन्हेगारी जगतामधील डी.के. राव याच धारावीमधील. धारावीचा विकास होऊन उभे राहणारे टॉवर वांद्रे, सायन येथील उंच इमारतींना वाकुल्या दाखवतील तेव्हा त्या धारावीत ‘स्लमडॉग’ नसतील,  ‘मिलेनिअर’ नक्कीच उरतील.    sandeep.pradhan@lokmat.com

टॅग्स :Adaniअदानी