शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

नववर्षाच्या संकल्पाचे झाले काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 13:23 IST

- मिलिंद कुलकर्णी वर्ष मावळत असताना नवीन वर्षाचे वेध लागतात. हे वेध लागत असताना मावळत्या वर्षातील घडामोडींचा मागोवा घेतला ...

- मिलिंद कुलकर्णी

वर्ष मावळत असताना नवीन वर्षाचे वेध लागतात. हे वेध लागत असताना मावळत्या वर्षातील घडामोडींचा मागोवा घेतला जातो. काय झाले आणि काय राहून गेले, याचा आढावा घेतला जातो. काही ठरवूनदेखील शक्य झाले नसेल, ते नव्या वर्षात पहिल्या दिवसापासून करायचे असे मनोमन ठरविले जाते. हे ठरवले जाते, यालाच संकल्प म्हटले जाते. नव्या वर्षाचा असा संकल्प प्रत्येक जण करीत असतो, पण ‘नव्याचे नऊ दिवस’ या नियमानुसार आठवडाभरात नव्या वर्षाचा संकल्प मागे पडतो, विसरला जातो आणि ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे गेल्या वर्षीसारखे आपण बेबंदपणे जगू लागतो. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची ही कथा आणि व्यथा आहे.

इंग्लंडमध्ये कोरोनाचे नवे रुप आढळून आल्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण राज्यात रात्रीची संचारबंदी जाहीर केली. रात्री ११ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत या संचारबंदीचा अंमल राहणार आहे. हा निर्णय तर नवा संकल्प केलेल्या नागरिकांच्या पथ्यावर पडला. समाज माध्यमावर एक मार्मिक संदेश या मंडळींकडून फिरवला गेला. तो असा होता, उद्यापासून चांगलं ठरवलं होतं पहाटे ४ वाजता चालायला जायचे...आणि नेमकी रात्रीची संचारबंदी लागू झाली...आता पाच जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार...१ जानेवारी म्हणजे नवीन वर्षाचा उपक्रम गेला, म्हणजे एकंदर २०२१ पण व्यायाम केल्याशिवाय जाणार बहुतेक...अवघड आहे...नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न असे म्हणतात, तसे आरंभशूर मंडळींचे होत असते. काही तरी बहाणा करुन संकल्प पुढे ढकलायचा प्रयत्न केला जातो, त्याचे हे मासलेवाईक उदाहरण आहे.

कोरोनाच्या जागतिक महासाथीमुळे आपल्याला आरोग्याचे महत्त्व कळले. प्रतिकारशक्ती मजबूत असणे किती आवश्यक आहे, हे ध्यानात आले. असे असताना दैनंदिन व्यायामाचा संकल्प सगळ्यांनी करणे आवश्यक होते, पण दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. दूरचित्रवाणी, समाजमाध्यमे यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण केले जाते, आणि स्वाभाविकपणे सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा केला जातो. ‘लवकर निजे, लवकर उठे’ ही शिकवण आपल्याला कालबाह्य, जुनाट वाटते. पण त्याचे महत्त्व अबाधित आहे, हे विसरुन चालणार नाही.संकल्प करुन ते सिध्दीस नेणारेदेखील अनेक जण आहे. भले, त्यांचे प्रमाण कमी असेल. पण त्यांची चिकाटी, सातत्य वाखाणण्याजोगे आहे. रनर्स ग्रुप, सायकलिस्ट ग्रुप, योग वर्ग, बॅडमिंटन, जीम या वेगवेगळ्या माध्यमातून नियमितपणे व्यायाम करणाऱ्या धडपड्या लोकांचे कौतुक करायला हवे. कोणताही ऋतू असला तरी त्यांच्या दैनंदिनीत खंड पडत नाही. आळसाला ते अजिबात जवळ फिरकू देत नाही. त्यांच्या या निश्चयामुळे केवळ आरोग्यासाठी लाभ होतो, असे नाही, त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक शिस्त लागते. घरी, कार्यालय वा व्यवसायातदेखील ते त्याच निश्चयाने, दृढतेने काम करताना दिसतात.त्याचा परिणाम व्यवसायवृध्दीत होते.

काहींना दैनंदिनी लिहायची सवय असते. त्यामाध्यमातून आपले रोजचे जगणे ते शब्दबध्द करतात. स्वत:च्या वागण्याचे, स्वभावाचे रोज आत्मपरीक्षण, विश्लेषण करतात. अकारण वाद, चुका, संताप टाळण्यासाठी प्रयत्नपूर्वक पावले उचलतात. स्वनियंत्रणासाठी प्रयत्नरत राहतात. भवतालाकडे त्रयस्थपणे पाहतात. घटना, व्यक्ती व प्रसंगाविषयी तारतम्य भावाने विचार करु लागतात. हेदेखील व्यक्तिमत्व विकासाच्यादृष्टीने चांगले पाऊल आहे. काही जण रोज किमान एक पान वाचल्याशिवाय झोपायचे नाही, असा निश्चय करतात. तो बराचसा यशस्वी करतात. समाजमाध्यमांवरील वाचन वाढले तरी पुस्तके, मासिके, वर्तमानपत्र वाचनाचा अवधी कमी होत चालला आहे. समाजमाध्यमांवरील मजकुराच्या विश्वासार्हतेविषयी संशयाचे वातावरण असताना सिध्द झालेली पुस्तके न वाचले ही आत्मवंचना ठरणार आहे. ज्ञान, माहिती या बाबत आपण परिपूर्ण नसू तर स्वत:ची मते बनविण्याविषयी आपण साशंक राहतो. झुंडीतील एक घटक बनून होकाराला हो देण्यात धन्यता मानतो. विवेकाने प्रत्येक गोष्टीकडे बघणे, चिकित्सा करणे, प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा स्थायीभाव आहे. त्याचा विसर पडता कामा नये. म्हणून नवीन वर्षासाठी संकल्प ठरविणे, त्याचे पालन करणे आणि संकल्पातून सिध्दी मिळविण्याचा आनंद घेणे हा वेगळाच अनुभव आहे. 

टॅग्स :New Yearनववर्षJalgaonजळगाव