शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ चित्रांमध्ये इतकं ‘अविस्मरणीय’ असं नेमकं काय असतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 05:01 IST

समकालीन संदर्भात महत्त्वाच्या, कलाप्रवाहांची दिशा बदलून टाकणाऱ्या ‘क्लासिक’ चित्रांतल्या अद्भुत रहस्याचा शोध घेणारी साप्ताहिक लेखमाला

शर्मिला फडके, ख्यातनाम कला समीक्षक, लेखिका

दिवसाकाठी नेमकी किती चित्रं तुमच्या डोळ्यांखालून जातात? - आठवून बघा.. ठीक आहे, दिवस नको, आठवडा, महिन्याभरात, आजवरच्या आयुष्यात किती चित्रं तुम्ही पाहिलेली असतात?

भलेही तुम्ही चित्रकार किंवा चित्रकलेशी संबंधित कोणी नसाल, तरी चित्रं कुठे ना कुठे दिसतातच. काही चित्रं आपण पाहतो, काही चित्रं आपल्याला पाहतात. मोबाईलच्या स्क्रीनवर, भिंतीवरच्या कॅलेंडरवर, रेस्टॉरंट, एअरपोर्टच्या लोंबीत, मासिकाच्या मुखपृष्ठावर, ऑफिसच्या इंटेरियरमध्ये, तुमच्यापैकी काही दुर्मिळ म्युझियम किंवा चित्र प्रदर्शनाला जाणारेही असूच शकतात.

तर मग आता, डोळे मिटा आणि आठवा. त्यापैकी कोणतं चित्र तुमच्या नजरेसमोर येतं?

शक्यता अशी आहे, की तुमच्या डोळ्यांपुढे तेच चित्र येईल जे अनेकदा तुमच्या नजरेसमोर येऊन गेलेले आहे. नेमकं कुठे, किती वेळा पाहिलं आपण; हे तुमच्या नेणीवेतही नसेल. पण मेंदूवर त्याची प्रतिमा मात्र अत्यंत ठळक उमटलेली  असेल, हे नक्की.  चित्रकाराचं नाव माहीत असेल-नसेल, कला- इतिहासात त्या चित्राचं काही महत्त्व असेल-नसेल, पण ते चित्र तुम्हाला माहीत असतं. अशी काही ठराविक चित्रं जगभरातल्या लोकांना चिरपरिचित असतात.

म्युझियममध्ये ज्या चित्रांसमोर सेल्फी घेण्याकरता अलोट गर्दी होते, स्क्रीनवर ही चित्रं समोर आली तर पुढे स्क्रोल न करता थांबतो, अशी ही चित्रं. व्हॅन गॉगची पिवळीजर्द सूर्यफुलं, निळीभोर स्टारी नाईट, रवीवर्माची लक्ष्मी-सरस्वती, दमयंती, लिओनार्दची मोनालीसा, एडवर्द मुंकचं भीषण ‘स्क्रीम’, मोनेची पाण्यात डुलणारी आल्हाददायक कमळं, हुसेनचे बळकट घोडे, व्हरमिरची कानात मोत्याचे डूल घातलेली मुलगी.. अशी खूप चित्रं, मनावर कायमचा ठसा उमटवलेली...

नेमकं काय असतं या चित्रांमध्ये की ती इतकी लोकप्रिय असतात?... चित्रकलेशी संबंध नसणाऱ्यांनाही ओळखीची वाटतात? चित्रकलेच्या जाणकारांनी त्यावर अगणित लेख, पुस्तकं लिहून ठेवलेली असतात, ती चित्रं महागडी, दुर्मिळ असतात. आंतरराष्ट्रीय लिलावात त्या चित्रांना करोडोंची बोली लागत असते, चित्रकारांच्या पुढच्या अनेक पिढ्यांनी त्याच्या नकला गिरवलेल्या असतात, रसिकांच्या घरातल्या भिंतींवर या चित्रांच्या प्रिंट्स टांगलेल्या असतात. अशी चित्रं, ज्यांच्याबद्दलचं कुतूहल मनात सदैव ताजं असतं.. असं काय युनिक, काय खास असतं या चित्रांमध्ये? ती इतकी लोकप्रिय होण्यामागे काही ना काही कारण निश्चित असणार आहे, नाही का?

ते कारण कदाचित चित्रात दडलेली गोष्ट असेल, रंगाची निवड असेल, मन आनंदी, शांत किंवा अस्वस्थ करणारं, विचारात पाडणारं असं काहीतरी त्यात असू शकेल. चित्र मौल्यवान असू शकेल, वादग्रस्त असू शकेल, चित्रकाराची गोष्ट तुम्हाला भन्नाट किंवा करुण वाटलेली असू शकेल.

ही चित्रं फक्त लोकप्रिय, गाजलेली नसतात, ती ‘क्लासिक’ असतात. समकालीन संदर्भातूनही महत्त्वाची ठरलेली चित्रं, विशिष्ट कला चळवळीचा ‘चेहेरा’ ठरलेली चित्रं, कलेची दिशा बदलून टाकणारी चित्रं.. हा कॉलम अशा चित्रांच्या आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न आहे. कला-इतिहासाचे माइलस्टोन ठरलेल्या, सर्वपरिचित चित्रांकडे नव्यानं पाहायला लावणारा, रंग-रचनांच्या आड दडलेली अस्वस्थता, सौंदर्य, प्रश्न, कलाकाराचं आयुष्य, अर्थपूर्ण अस्तित्व.. अजूनही काही आहे जे शोधायला हवं आहे, ते धुंडाळण्याचा हा प्रयत्न आहे. दर आठवड्याला एक चित्र, एक कथा, आणि एक नवा दृष्टिकोन..sharmilaphadke@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Unveiling the Enduring Allure: What Makes Certain Paintings Unforgettable?

Web Summary : Why do some paintings become iconic? Sharmila Phadke explores the captivating power of famous artworks, delving into their stories, artistic merit, and lasting impact on viewers across generations. She examines the unique elements that make these images unforgettable classics.
टॅग्स :artकलाArt of Livingआर्ट आॅफ लिव्हिंग