शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नैतिकता हरवलेल्या समाजाकडून आणखी काय अपेक्षित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 12:41 AM

‘आम्हाला नैराश्याने ग्रासले होते’, असा कबुलीजबाब आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिला. द. आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्याच्या टीमने बॉलशी छेडछाड का केली, असे विचारले असता त्याने वरीलप्रमाणे उत्तर दिले. त्या उत्तरातून कलंक लागलेल्या आॅस्ट्रेलियन कर्णधाराची मानसिकता तसेच आजच्या समाजाचीही मानसिकता दिसून येते. सामना जिंकणे आणि कसेही करून सामना जिंकणे यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न क्रिकेट मैदानावर तसेच मैदानाच्या बाहेरही झाल्याचे दिसून येते.

- राजदीप सरदेसाईज्येष्ठ पत्रकार आणि लेखक‘आम्हाला नैराश्याने ग्रासले होते’, असा कबुलीजबाब आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिला. द. आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्याच्या टीमने बॉलशी छेडछाड का केली, असे विचारले असता त्याने वरीलप्रमाणे उत्तर दिले. त्या उत्तरातून कलंक लागलेल्या आॅस्ट्रेलियन कर्णधाराची मानसिकता तसेच आजच्या समाजाचीही मानसिकता दिसून येते. सामना जिंकणे आणि कसेही करून सामना जिंकणे यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न क्रिकेट मैदानावर तसेच मैदानाच्या बाहेरही झाल्याचे दिसून येते.आधुनिक क्रीडा जगतात आजच्या स्पर्धात्मक युगाचे प्रतिबिंब पाहावयास मिळते. तेथे साधनांपेक्षा साध्य महत्त्वाचे ठरते. आधुनिक आॅलिम्पिकची पायाभरणी करणाऱ्या पिअरे द कोबर्टीनचे म्हणणे होते,‘आॅलिम्पिक खेळात जिंकणे महत्त्वाचे नाही तर सहभाग घेणे महत्त्वाचे आहे. तसेच विजयी होणे हे जीवनाचे लक्ष्य नसते तर संघर्ष करणे महत्त्वाचे असते. जिंकण्यापेक्षा चांगली लढत देणे जास्त महत्त्वाचे असते.’ पण आॅलिम्पिकचे हे उद्दिष्ट जुन्या काळापुरते मर्यादित होते, कारण त्यावेळी खेळ हा फावल्या वेळेपुरता मर्यादित होता. क्रिकेट हा संभावितांचा खेळ आहे, असा त्या खेळाविषयीचा गैरसमज होता. कारण त्याकाळी ब्रिटन साम्राज्य हे नियमानुसार खेळ खेळण्यासाठी ओळखले जायचे.एकविसाव्या शतकातील खेळ हे मात्र स्पर्धात्मक राष्टÑीयतेचा भाग बनले आहेत आणि ते दोन राष्टÑांमधील युद्धाप्रमाणे खेळले जात असतात. त्यात विजयी होणं राष्टÑाचा सन्मान ठरतो. कम्युनिस्ट पद्धतीचे श्रेष्ठत्व दर्शविण्यासाठी शीतयुद्धाच्या काळात रशियन राष्टÑांनी डोपिंगचा कार्यक्रम राबविला होता. जागतिक मान्यता मिळावी म्हणून चीनने आॅलिम्पिकमध्ये यशस्वी होण्यासाठी आपली भिंत तोडण्याचेही काम केले.त्याच भावनेतून आॅस्ट्रेलियन चमूही क्रिकेट जगतातील महासत्ता आहे, हे दाखविण्यासाठी स्मिथच्या टीमने फसवणुकीचे कृत्य करून दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ रोखण्याचा प्रयत्न केला.आॅस्ट्रेलिया हा मर्यादित इतिहास असलेला देश असून, भौगोलिक दृष्टीने तो एकटा पडला आहे. त्यामुळे खेळ हीच त्याची एकमेव राष्ट्रीय ओळख असून, त्यात आपले वर्चस्व टिकविण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्या देशाला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नाही. पाश्चात्त्य राष्टÑातून आलेल्या स्थलांतरितातून त्याची निर्मिती झालेली आहे. जुन्या आदिवासींसोबत संघर्ष करीत तेथे स्थायिक झालेल्या गुन्हेगारांनी या राष्टÑाची उभारणी केली आहे. विसाव्या शतकातील सर्व श्रेष्ठ आॅस्ट्रेलियन कोण, याविषयी जेव्हा सार्वमत घेण्यात आले तेव्हा आॅस्ट्रेलियन क्रिकेटर डॉन ब्रॅडमनच्या नावाला सर्वांची पसंती मिळाली. अन्य कोणत्याही राष्टÑात एखाद्या खेळाडूला असा सन्मान मिळाला नसता. पण हे राष्टÑ खेळासाठी ओळखले जाते. त्यामुळे खेळात विजय संपादन करणे याचीच त्यांना भूक असते!दुसरे असे की, व्यावसायिक खेळ हा व्यक्तिगत श्रेष्ठत्वासाठी असतोच तसेच बलिष्ठांनी टिकून राहण्यासाठी केलेला संघर्ष, असेही त्या खेळाचे स्वरूप असते. त्यातून प्रसिद्धी आणि पैसा दोहोंचाही लाभ होत असतो. या भावनेतून टेनिसची चॅम्पियन मारिया शारापोव्हा ही देखील मार्गभ्रष्ट झाली होती. क्रिकेट खेळात मॅच फिक्सिंगची प्रकरणे घडली तर बेन जॉन्सन हा उत्तेजक द्रव्य घेऊ लागला. खेळाची काळी बाजू सेलिब्रिटीमुळे मिळणाºया चकाकीखाली दबून राहत होती. आयपीएलच्या तमाशात खेळाडूंना रोबोटप्रमाणे कामगिरी दाखवावी लागते. पण या खेळाडूंभोवतीचे वलय दूर सारले की त्यांचे पायही मातीचेच असल्याचे दिसून येते. उच्चप्रतीच्या अ‍ॅथ्लिटस्ना असुरक्षिततेला तोंड द्यावे लागते.वास्तविक स्मिथ आणि या घटनेचा शिल्पकार डेव्हिड वॉर्नर यांना पैशाची आवश्यकता नव्हती. कारण ते श्रीमंत क्रिकेटपटू म्हणूनच ओळखले जातात. त्यांना प्रसिद्धीची आणि मान्यतेचीदेखील आवश्यकता नाही. धावा काढण्याच्या बाबतीत स्मिथची तुलना डॉन ब्रॅडमनशी करण्यात येत असते. पण त्यांच्याशी तुल्यबळ असलेल्या दक्षिण आफ्रिकेसोबत खेळताना दमछाक झाल्याने त्यांचा इगो दुखावला गेला होता. आत्यंतिक महत्त्वाकांक्षेने आॅस्ट्रेलियन नेतृत्वाला गिळंकृत केले आणि आपण केलेल्या कृत्यातून निसटून जाऊ हा फाजील आत्मविश्वास त्यांना नडला. पण आजच्या काळात डझनभर कॅमेरे तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात, याचा त्यांना विसर पडला. यश मिळविण्यासाठी धडपड करीत असताना आपण अजिंक्य आहोत, ही भावना वरचढ ठरली. त्यामुळे आपल्या खेळकौशल्यावर विसंबून राहण्याऐवजी नियमांचे उल्लंघन करून यशस्वी होण्याचा सोपा मार्ग त्यांनी पत्करला.त्यांच्या या कृत्याविरोधात आॅस्ट्रेलियन जनतेत संतापाची भावना उसळली. आपल्या हिरोंनी आपल्याला फसवले, असे लोकांना वाटू लागले. भारतात मॅच फिक्सिंग झाले तेव्हा भारतीयांमध्येही हीच भावना प्रबळ ठरली होती. आपल्या आदर्श पुरुषांनी नियमांचे उल्लंघन करणे कुणालाच आवडत नाही. खेळात स्वच्छता हवी अशी भावना घेऊनच लाखो लोक खेळ मैदानावर येत असतात. लोकांची स्वप्ने तेथे प्रत्यक्षात येणार असतात. जग हे सुखदायी आहे, हीच भावना खेळाच्या मैदानावर व्यक्त होत असते. पण तेच जग जर उलटेपालटे झाले तर लोकात संतापाची लाट उसळते आणि त्यातून खेळाडूंविषयीचा तिटकारा प्रकट होतो.तरीदेखील या कृत्याविषयी प्रकट झालेल्या काही प्रतिक्रिया अतिरेकी स्वरूपाच्या होत्या. निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करण्यास सिद्ध असलेले राजकारणी, आपल्या बॅलन्सशीटमध्ये फेरफार करणारे व्यापारी, परीक्षेत कॉपी करणारे विद्यार्थी, आपल्या व्यवसायात नैतिकतेचे पालन न करणारे वकील आणि डॉक्टर, बनावट बातम्या खपविणारे पत्रकार यांना या खेळाडूंवर दोषारोपण करण्याचा अधिकार कसा पोहचतो? की आपण खेळाडूंकडून नैतिकतेची आणि शुद्धतेचीच अपेक्षा करीत असतो? स्मिथ आणि त्याच्या टीममधील खेळाडूंनी क्रिकेट शौकिनांचा अपेक्षाभंग केला असला तरी समाजातील नैतिकता कशी हरवली आहे, याचा आरसाच त्यांनी समाजासमोर धरला आहे!जाता जाता : १९७० मध्ये भारताचा कर्णधार असलेल्या बिशनसिंग बेदीने चेंडूला व्हॅसलिन लावून चेंडू खराब करण्याचा आरोप इंग्लंडचा गोलंदाज जॉन लिव्हर यांचेवर केला तेव्हा इंग्लिश कौन्टीने बिशनसिंग बेदीची हकालपट्टी करताना ‘इंग्लिश खेळाडू कधीच बनवाबनवी करीत नाहीत’ असा खुलासा केला होता. पण ते सुद्धा बनवाबनवी करतात हे २०१८ साली दिसून आले आहे!

टॅग्स :Steven Smithस्टीव्हन स्मिथAustraliaआॅस्ट्रेलियाBall Tamperingचेंडूशी छेडछाड