शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

वाहून जाणारं पाणी वाचवलं, तरच मुंबई वाचेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 12:10 IST

अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाचे गटारात जाणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी पालिकेने अद्याप काहीही केलेले नाही.

- विनायक पात्रुडकर

पाणी जपून वापरा, असे आवाहन महापालिका दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी करते. रेंगाळलेला मान्सून, तलावात कमी झालेला जलसाठा, अशी अनेक कारणे महापालिका देते. नागरिक ते मान्य करतात. पाणी कपातीपेक्षा नियम पाळणे कधीकधी सोयीचे असते. हा दरवर्षी ठरलेला क्रम कधी थांबेल हे सांगता येणार नाही. अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाचे गटारात जाणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी पालिकेने अद्याप काहीही केलेले नाही. मध्यंतरी शिवाजी पार्क येथे पावसाचे पाणी साठवण्यासाठी एक प्रयोग झाला होता. पुढे त्यात सातत्य राहिले की नाही, हे अधिकाऱ्यांनाही माहिती नसेल. असो विषय पाणी वाचवण्याचा आहे.भविष्यात एकतर मुंबई पाण्यात बुडेल किंवा पाण्यावाचून तिला प्राण सोडावे लागतील, अशी परिस्थिती सध्या आहे. किमान पुढच्या पिढीची चिंता करून तरी पाण्यासाठी योग्य नियोजन करायला हवे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, याचे तरी भान पालिकेची सत्ता हाकणाऱ्यांनी ठेवायला हवे. प्रशासनाला मुंबईची काळजी नसली तरी काही सामाजिक संघटना या शहरासाठी योगदान देत आहेत. एका सामजिक संघटनेने दहिसर नदीवर बंधारा बांधला आहे. याद्वारे पावसाचे पाणी साठवले जाणार आहे. या बंधाऱ्यातून सुमारे पाच कोटी लिटर पाणी साठवले जाईल. हे पाणी सार्वजनिक शौचालयासाठी तसेच अग्निशमन दल आग विझवण्यासाठी वापरणार आहे. असे अजून काही बंधारे बांधले जाणार आहेत. हा प्रयोग यशस्वी करायला हवा व असे आणखी मार्ग शोधायला हवेत.गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात एवढे पाणी समुद्रात वाहून गेले की त्यात दोन धरणे भरली असती. हे पाणी वाचवले असत तर मुंबईकरांना किमान धुणीभांडी करण्यासाठी तरी पाणी मिळाले असते. मुंबईत पाच नद्या आहेत. त्यातील मिठी नदीला मुंबईकर आणि प्रशासनाने ठार केले आहे. उर्वरित नद्यांचे रूपांतर नाल्यांमध्ये झाले आहे. या नद्या वाचवल्या जाऊ शकतात. त्यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. तिच पालिका प्रशासनाकडे नाही. त्याचे परिणाम शहराला व येथील नागरिकांना भोगावे लागत आहेत.जगभरात अशी अनेक शहरे आहेत, जेथे मुंबईसारखी अतिवृष्टी होते. तेथील प्रशासनांनी अशाप्रकारे नियोजन केले आहे की, पाऊस कितीही पडला तरी जनजीवन विस्कळीत होत नाही. पाणी गटारात वाया जात नाही. आपले लोकप्रतिनिधी परदेश दौरे करतात. शहर नियोजनाचे सूत्र शिकून घेतात. मात्र त्याची अंमलबजावणी कासव गतीने होते. ही गती वाढली नाही तर हे शहर नक्कीच पाण्याखाली जाईल. तेव्हा पाण्याचे नियोजन आता तरी गांभीर्याने करायला हवे. 

टॅग्स :MumbaiमुंबईRainपाऊसMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेट