शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

लोकशाहीसाठी सावधानता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 06:23 IST

अमेरिकेत जन्माला आलेल्या मुलामुलींना त्या देशाचे नागरिकत्व जन्मजात हक्काने मिळते. तेथे जन्मलेल्या अनेक मेक्सिकन मुलामुलींना मिळालेले असे नागरिकत्व ट्रम्प यांना रद्द करायचे आहे.

अमेरिकेच्या इतिहासात डोनाल्ड ट्रम्प यांच्याएवढा अहंमन्य अध्यक्ष झाला नाही. जी गोष्ट मनात आणली ती पूर्ण करण्यासाठी आपले सरकार थांबले वा अडले तरी त्याची पर्वा ते करीत नाहीत. आपल्याला हवा असलेला निर्णय राबवण्यासाठी ते अनेकदा टोकाची भूमिका घेतात. अमेरिका आणि मेक्सिको यांच्यादरम्यान एक अनुल्लंघ्य भिंत बांधून मेक्सिकोतून अमेरिकेत बेकायदेशीररीत्या येणाऱ्या लोकांना पायबंद घालण्याच्या आकांक्षेने ते एवढे वेडावले आहेत की त्या भिंतीसाठी लागणारा पैसा द्यायला तेथील विधिमंडळाने (काँग्रेस) नकार दिला तेव्हा इतर खात्यांच्या रकमा त्या कामाकडे वळविण्याची व त्यासाठी सरकारातील तब्बल २२ खाती बंद करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्या ‘बंद’ खात्यात काम करणाºयांचे पगार थकले व त्यांच्यात स्वाभाविकच असंतोष निर्माण झाला. याआधी या भिंतीच्या बांधकामाचा निम्मा खर्च आपण मेक्सिकोकडून वसूल करू असे ते म्हणत होते. त्यात त्यांना यश न आल्याने त्यांनी आता काँग्रेसकडे त्या पैशाची मागणी चालविली आहे.

काँग्रेसचे कनिष्ठ सभागृह असलेल्या ‘हाउस आॅफ रिप्रेझेंटेटिव्ह’चा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर अधिकार चालतो. ते हाउस आता डेमोक्रेटिक म्हणजे विरोधी पक्षाच्या ताब्यात गेले आहे. शिवाय ट्रम्प यांच्या पक्षातील अनेकांचाही त्या भिंतीला विरोध आहे. अमेरिकेत जन्माला आलेल्या मुलामुलींना त्या देशाचे नागरिकत्व जन्मजात हक्काने मिळते. त्यामुळे तेथे जन्मलेल्या अनेक मेक्सिकन मुलामुलींना ते प्राप्तही झाले आहे. ट्रम्प यांना त्यांचे नागरिकत्व रद्दही करायचे आहे. मात्र त्यासाठी लागणारी घटनादुरुस्ती करायला त्यांच्याजवळ काँग्रेसमध्ये पुरेसे बहुमत नाही. आपल्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी रशियाची मदत घेतली, या आरोपाची चौकशी तेथील काँग्रेस करीत आहे. मंत्री, अधिकारी, सरकारी वकील व इतरांना कामावरून काढून टाकण्याचा अधिकारही ते बेबंदपणे वापरत आहेत. लोकमत विरोधात आहे, परंतु त्यांच्या घोषणांवर खूश असलेल्या कडव्या उजव्या मताच्या लोकांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यातून त्यांनी मुस्लीम देश, युरोपातील मित्र देश आणि द. अमेरिकेतील लहानसहान देश यांच्याशी उघड वाद घातला आहे. चीन आणि रशियाशी करयुद्ध सुरू केले आहे आणि युरोपीय देशातील अमेरिकन फौजा मागे घेण्याची व ‘नाटो’ ही संघटना मोडण्याचीही भाषा ते बोलत आहेत. अनेक देश त्यांच्या अशा बेबंद उपद्व्यापांमुळे कमालीचे अस्वस्थ आहेत. त्यांच्या या उद्दाम वागणुकीला अनैतिक वर्तनाचीही जोड आहे. मात्र त्यांना त्याची पर्वा नाही. असा महाभियोग मंजूर व्हायला हाउसचे संपूर्ण बहुमत आणि सिनेटचे (वरिष्ठ सभागृह) दोन तृतीयांश बहुमत लागते. ते तसे होत नाही तोवर सरकारची खाती बंद पडली काय, त्यांच्या कामकाजात खंड पडला काय, ट्रम्प यांना त्याची काळजी नाही. किंबहुना आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी ते कोणतीही किंमत चुकवू, अशा मानसिकतेने अध्यक्षपदाचा कारभार पाहत आले आहेत.

आपले पद सुरक्षित असले की लोकशाहीचे सरकारही केवढे उद्दाम एककल्ली आणि हुकूमशाही वळणावर जाऊ शकते याचे ट्रम्पएवढे मोठे उदाहरण जगात दुसरे नाही. अध्यक्षीय निवडणुका २०२० च्या नोव्हेंबरात व्हायच्या आहेत. तोवर आपली मनमानी करायला ट्रम्प मोकळे आहेत. पक्ष विरोधात, विधिमंडळ विरोधात, अनेक प्रमुख न्यायाधीश नाखूश आणि माध्यमेही विरोधात. तरीही ट्रम्प यांची मुजोरी कायम आहे. या काळात ते किती बेदकारपणे कोणते निर्णय घेतील आणि ते जनतेच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न करतील याचा नेम नाही. आपल्या हेकेखोरपणाने ट्रम्प यांनी ते भूषवत असलेल्या पदाची शान घालवली आहे. त्यामुळे केवळ लोकशाही आहे आणि निवडणुका होतात म्हणून जनतेने शांत बसण्याचे कारण नाही. आपल्या सत्ताकाळात ट्रम्पसारखा पुढारी देशाचे कायमचे नुकसान करू शकतो. त्यामुळेच ‘अखंड सावधता’ हीच लोकशाहीची खरी मागणी आहे असे म्हटले जाते. त्यातून अमेरिकेच्या लोकशाहीलातीनशे वर्षे होत आली. त्यामुळे तर इतर लोकशाही देशांनी हे सावधपण किती जपले पाहिजे याची कल्पना साºयांना करता यावी. अनेक लोकशाही देशांचे हुकूमशाहीत अलीकडे रूपांतरही झाले आहे हे येथे महत्त्वाचे.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प