शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 06:39 IST

सर्वच शहरे आणि ग्रामीण भागात लावल्या जाणाऱ्या अवाढव्य आकाराच्या जाहिरात फलकांवर यापुढे खरंच नियंत्रण ठेवले जाईल? कारवाई होईल?

संजीव साबडे, ज्येष्ठ पत्रकार

गेल्यावर्षी १४ मे रोजी मुंबईच्या घाटकोपर परिसरातील एक अवाढव्य जाहिरात फलक खाली कोसळून १७ जण ठार आणि ७० लोक जखमी झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने न्या. दिलीप भोसले  यांची समिती नेमली होती. या समितीने मुंबईसह राज्यभरातील जाहिरात फलकांचा (होर्डिंग्ज) आकार ४० बाय ४० फूट आकारापेक्षा मोठा असता कामा नये, अशी शिफारस केली असून, तो अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. 

समिती नेमली हे चांगलेच झाले, पण मुंबई वा कोणत्याही शहरात काय आकाराचे जाहिरात फलक असावेत, हे त्या-त्या ठिकाणच्या महापालिका, रेल्वे प्रशासन यांनी आधीच ठरवायला हवे. त्या बाबतीत महापालिका व रेल्वे यांचे काहीच धोरण नसल्याने आणि आपापसात सुसूत्रता नसल्याने २५० टन वजनाचा जाहिरात फलक लावला गेला. पाऊस व जोरदार हवा यामुळे तो कोसळला. मग अशा फलकांचा आकार किती असावा, याविषयी चर्चा सुरू झाली. मुंबईत कोसळलेल्या फलकाचा काही भाग रेल्वेच्या आणि काही भाग मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात होता आणि तो लावण्याबाबत दोन्ही यंत्रणांत संवादच नव्हता. या फलकाबद्दल काहींनी तक्रार केली होती, पण त्याकडे दुर्लक्ष केले वा झाले. तो कोसळून लोक मेल्यावरही एकमेकांकडे बोट दाखवणे सुरू झाले. न्या. भोसले समितीच्या अहवालाची नीट अंमलबजावणी होईल आणि सातत्याने शहरभर लागणाऱ्या जाहिरात फलकांवर लक्ष ठेवले जाईल, अशी खात्री सरकारी यंत्रणांनी द्यायला हवी. 

केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरे आणि आता अगदी ग्रामीण भागातही या अवाढव्य आकाराच्या (बेकायदा) फलकांचे पेव फुटले आहे.  हे जाहिरात फलक यापुढे इमारतीच्या गच्चीवर आणि भिंतीवर लावले जाऊ नयेत, असे न्या. भोसले समितीने नमूद केले आहे. ते लावले जाणार नाहीत. पण वांद्रे पूर्व व पश्चिम फ्लायओव्हर, सी लिंक, अंधेरी, ताडदेव व ग्रॅण्ट रोड, अंधेरी व जुहू या परिसरात जे जाहिरात फलक लागले आहेत, ते पाहूनही भीती वाटते. शिवाय दर १०-१५ फुटांच्या अंतराने जाहिरात फलक कशासाठी? अनेक फलकांवर वेगवेगळ्या प्रकारे जो उजेड केलेला असतो, तो वाहन चालकांच्या डोळ्याला त्रास देतो. जाहिरातीतून पैसे मिळवण्याच्या आणि मिळवून देण्याच्या नादात अधिकारी व जाहिरात कंपन्या इतरांच्या जीवाशी खेळतात. रात्री अशा डिजिटल फलकांवर पूर्णपणे बंदी हवी होती. पण आता रात्री ११ वाजल्यानंतर डिजिटल फलक सुरू राहिल्यास कारवाईची शक्यता आहे. 

प्रशासनातील मंडळींना लोकांच्या जगण्याची जणू फिकीरच नसते. ते स्वतःहून लोकहिताचा निर्णय घेत नाहीत. लोकहिताचा विचार मनात डोकावू नये, यासाठीही अधिकाऱ्यांच्या खिशात काही पडत असतेच. अन्यथा २५० टन वजनाच्या जाहिरात फलकाला कोण आणि का परवानगी देईल? जाहिरात फलक ४० बाय ४०  फुटापेक्षा अधिक उंच व रुंद असू नयेत, अशी न्या. दिलीप भोसले समितीची शिफारस आहे. त्यात अर्थातच काही नवे नाही. घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर फलकांची उंची व रुंदी ४० बाय ४० फुटांहून मोठी असता कामा नये, असे आदेश काढले होते. पण त्याआधी मुंबईत १२० फूट उंच व १२० फूट रुंद म्हणजे एखाद्या इमारतीच्या आकाराचे जाहिरात फलक दिसत असत. त्यांना कोणी परवानगी दिली होती? नियम ठरलेले नाहीत, म्हणून कितीही आकाराचे फलक लावू द्यायचे? मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि तेथील टोलनाक्याच्या वर जे फलक लागतात, त्याचे काय? ते कोसळले तर किती मोठा अनर्थ होईल? राज्यात सर्वत्र अनधिकृत जाहिरात फलकांचा सुळसुळाट आहे. तक्रार येईपर्यंत त्यावर कारवाई केलीच जात नाही. आता तर वाढदिवसाबरोबर विवाह व बारसे अशा निमित्तानेही फलक लागतात. त्यांच्यावर कारवाई होणारच नाही का? की ते सांगण्यासाठी वेगळी समिती हवी?    sanjeevsabade1@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Wake up before illegal hoardings collapse across Maharashtra cities!

Web Summary : Following the Ghatkopar tragedy, a committee recommended size restrictions for hoardings. Concerns remain about unauthorized hoardings state-wide, posing risks to public safety. Urgent action and strict enforcement are needed.
टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका