शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

वनडेचा ‘डॉन’ बनण्याकडे विराटची वाटचाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 11:36 IST

विराटचा प्रवास एकदिवसीयमधला ‘सार्वकालिक श्रेष्ठ फलंदाज’ होण्याकडं चालू असल्याची खात्री पटते ती यामुळंच. वनडेचा ‘डॉन’ बनण्याकडे विराटची वाटचाल 

- सुकृत करंदीकर

विराट कोहलीने२००८ मध्ये जेव्हा एकदिवसीय क्रिकेटमध्येपदार्पण केलं तेव्हा तो सचिन तेंडुलकरचे विक्रमाचे डोंगर चढून जाईल, असं वाटलं नव्हतं. पण कारकिर्दीच्या बाराव्या वर्षातच विराटनं एकदिवसीय क्रिकेटमधल्या बारा हजार धावांचा टप्पा ओलांडला. अति आणि जलद क्रिकेटच्या जमान्यात ही बाब ‘प्रचंड’ आहे. क्रिकेटला मुळातच ‘आळशांचा खेळ’ म्हटलं जातं. ‘खेळांचा राजा’ म्हटल्या जाणाऱ्या फुटबॉलसारखी सततची ९० मिनिटांची उर फुटोस्तोवरची धाव क्रिकेटमध्ये नसते. सांघिकखेळ असल्यानं क्रिकेटमध्ये विश्रांती घेण्यासाठीचा अवधी प्रत्येकाला सारखा मिळत राहतो त्यामुळं पूर्वी तर चक्क पन्नास-साठ वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ  इंग्लिश क्रिकेट काऊंटी खेळत. आंतरराष्ट्रीयक्रिकेटमध्येही वयाच्या चाळीशीपर्यंत मजल मारणारे कित्येक आहेत. नव्या युगातलंक्रिकेटखूप वेगवान आणि शारीरिकक्षमतांची कसोटी पाहणारं आहे. एकदिवसीय,ट्वेन्टी, कसोटी या तिन्ही प्रकारातल्या सामन्यांची संख्याकधी नव्हे इतकी वाढलीय. गेल्या दशकभराइतकी व्यग्रता यापुर्वी क्रिकेटपटूंच्या वाट्यालाकधीच आली नाही. त्यामुळंच वर्षाचं ‘कँलेंडर’ आखताना कोणत्या देशातल्या कोणत्या स्पर्धा खेळायच्या आणि कोणत्या नाकारायच्या याचं नियोजन क्रिकेटपटू करतात. 

क्रिकेट या वेगवान स्वरुपानं विराट कोहलीसारख्या ‘चँम्पियन’ खेळाडूंवर प्रचंड दबाव, ताण टाकला आहे.विराट, केन विल्यमसन, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, अँरॉन फिंच, एबीडी डिव्हिलियर्स यासारख्या खेळाडूंची ‘ब्रँड व्हँल्यू’ मोठी असल्यानं त्यांनी सतत मैदानात उतरणं, ‘स्क्रीन’वर दिसत राहणं यावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल अवलंबून आहे. खेळाडूंनाही त्याचं आकर्षण आहेच. जाहिरातींची दुनिया उगवत्या सुर्याची असते.जोपर्यंत बँट बोलते तोवरच किंमत असते. साहजिकच ‘करिअर’च्या शिखरावर असताना ‘ब्रेक’ घेणं परवडत नाही.परिणामी विराटसारखे ‘चँम्पियन्स’ खूप व्यस्त झाले आहेत. शारीरिक, मानसिकदृष्ट्या कणखर राहात मैदानातसतत उच्चकोटीची कामगिरी करणं सोपं नसतं. या पार्श्वभूमीवर बारा वर्षात बारा हजार धावांचा टप्पा आणि तोही आजवरच्या इतिहासात सर्वात कमी डाव (२४२) खेळून ओलांडणं हा पराक्रम आहे.

हा टप्पा गाठताना एकदिवस क्रिकेटमधल्या सार्वकालिक महान खेळाडूंच्या पंक्तीत विराटनं मानाचं स्थान मिळवलं आहे. आता चर्चा चालू आहे ती ३२ वर्षांचा विराट आणखी किती दूरवर मजल मारणार याची. एकदिवसीय क्रिकेटमधल्या सचिनची सर्वाधिक १८ हजार ४२६ धावांची कामगिरी विराट केव्हा ओलांडणार याची.एकदिवसीय क्रिकेटमधल्या सर्वाधिक ४९ शतकांचा सचिनचा विक्रम मागे टाकण्यास विराटला फक्त ७ शतकं हवी आहेत. येत्या दोन वर्षात ही कामगिरी तो नोंदवू शकतो. विराटची बँट आत्ताप्रमाणेच बरसत राहिली तर फार तर आणखी सव्वाशे सामन्यात विराट सचिनच्या सर्वाधिक धावांचा विक्रमही सहज मागे टाकेल. आणखी सव्वाशे सामने खेळण्यासाठीची उमेद आणि धमक विराट दाखवणार का इतकाच मुद्दा आहे.

एवढी विक्रमी कामगिरी केल्यानंतर सचिन आणि विराट यांच्यात तुलना होणं स्वाभाविक आहे. ही तुलनागुणवत्तेची नाही तर सचिनचा काळ आणि विराटचे दिवस यात बदलत गेलेल्या क्रिकेट नियमांची आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आता पन्नास षटकांत दोन नवे चेंडू वापरले जातात. त्यामुळं ‘रिव्हर्स स्विंग’चं वेगवान गोलंदाजांकडचं अस्त्र बोथट झालंय. पहिल्या दहा षटकात दोनच क्षेत्ररक्षक तीस यार्डाबाहेर असतात. पुढच्या तीस षटकांत चार आणि शेवटच्या दहा षटकात पाच क्षेत्ररक्षक ‘सर्कल’बाहेर असतात. फलंदाजांना मदत करणाऱ्या या नियमांमुळं चौकार-षटकारांची संख्या आत्ताच्या क्रिकेटमध्ये वाढली आहे. सचिन खेळत होता तेव्हा पहिल्या पंधरा षटकांत ‘सर्कल’बाहेर दोन आणि पुढच्या ३५ षटकांत पाच क्षेत्ररक्षक बाहेर असत. आणखी एक मोठा फरक आहे. सचिननं आयुष्यभर ज्यांना तोंड दिलं ते मुथय्या मुरलीधरन, वासिम अक्रम, ग्लेन मँकग्रा, वकार युनूस, लसिथ मलिंगा, शेन वॉर्न, वॉल्श-अँम्ब्रॉस, अँलनडोनाल्ड, चमिंडा वास, सकलेन मुश्ताक यांची नावं एकदिवसीय क्रिकेटमधले सार्वकालिक महान गोलंदाज म्हणून घेतली जातात. या गोलंदाजांना तोंड देत सचिननं गोळा केलेल्या धावा किमती आहेत. या दर्जाचे गोलंदाज विराटच्या वाट्याला फार अभावानं आले. अर्थात यामुळं विराटची थोरवी जराही उणावत नाही. क्रिकेटचा ‘गॉड’ डॉन ब्रँडमन यांनीच याचं उत्तर देऊन ठेवलं आहे. ते म्हणाले होते - “एका काळातला चॅम्पियन हा इतर कुठल्याही युगातला चॅम्पियनच असतो, हे मी ठामपणं सांगतो. कारण त्या-त्या काळाला अनुरुप शैली सहजपणे स्वीकारण्याची क्षमता त्याच्याकडं असतेच.” विराटचा प्रवास एकदिवसीयमधला ‘सार्वकालिक श्रेष्ठ फलंदाज’ होण्याकडं चालू असल्याची खात्री पटते ती यामुळंच.

----------------------

टॅग्स :PuneपुणेVirat Kohliविराट कोहलीSachin Tendulkarसचिन तेंडुलकर