शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाची मागणी राजद्रोह कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:36 IST

महाराष्ट्र दिवसाच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा परत ऐरणीवर आला आहे. परंतु यावेळी चर्चेची दिशाच वेगळीकडे जात असल्याचे दिसून येत आहे. राज्य तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी भूमिका शिवसेनेतर्फे घेण्यात आली आहे. तर विदर्भवाद्यांनीदेखील याला जोरदार प्रत्युत्तर देत झारखंड, उत्तरांखड व छत्तीसगडची निर्मिती हा राजद्रोह होता का असा सवाल केला आहे.

महाराष्ट्र दिवसाच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा परत ऐरणीवर आला आहे. परंतु यावेळी चर्चेची दिशाच वेगळीकडे जात असल्याचे दिसून येत आहे. राज्य तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी भूमिका शिवसेनेतर्फे घेण्यात आली आहे. तर विदर्भवाद्यांनीदेखील याला जोरदार प्रत्युत्तर देत झारखंड, उत्तरांखड व छत्तीसगडची निर्मिती हा राजद्रोह होता का असा सवाल केला आहे. तसे पाहिले तर विदर्भाचा मुद्दा हा ज्वलंत आहे. त्यामुळे मात्र राजकीय इच्छाशक्तीपेक्षा समाजाचे पाठबळ अशा आंदोलनांमध्ये जास्त आवश्यक असते. विदर्भवाद्यांकडून आंदोलने तर करण्यात येत आहेत, मात्र अद्यापही त्याला हवे तसे जनसमर्थन प्राप्त होऊ शकलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. यंदा विदर्भवाद्यांसोबतच महाराष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडूनदेखील आक्रमक भूमिका घेण्यात आली. अगोदर विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांच्या कार्यक्रमात झालेला गोंधळ आणि त्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी वापरलेली थेट राजद्रोहाचीच भाषा यामुळे विदर्भावरून राजकारण तापले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एखादी गोष्ट राजद्रोह आहे की नाही, हे ठरविण्याची एक यंत्रणा असते. मात्र कुणी आपल्या भूमिकेच्या विरोधात मागणी करत आहे, म्हणून त्याला थेट राजद्रोही ठरविण्याची मानसिकता गेल्या काही काळात वाढीस लागली आहे. देशात वेळोवेळी यासंदर्भातील वक्तव्ये वाचाळवीर नेत्यांनी केली आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनीदेखील नेमकी तीच री ओढली आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा पवित्रा जनसामान्यांनादेखील फारसा रुचलेला नाही. ‘सोशल मीडिया’वर येणाºया प्रतिक्रियांमधूनदेखील हे जाणवून येत आहे. मुळात लोकशाही पद्धतीत कुणालाही मागणी करण्याचा अधिकार आहे. संविधानानेच ते स्वातंत्र्य दिलेले आहे. वेगळे विदर्भ राज्य ही काही एका व्यक्तीची मागणी नाही, तर विविध समूहांची भावना आहे. त्यामुळे या भावनेचा सन्मान अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे विदर्भवादी वेगळ्या राज्याच्या निर्मितीची आवश्यकता का आहे हे सांगत आहे, त्याच धर्तीवर वेगळे राज्य का सोईचे नाही या प्रश्नाची ठोस उत्तरे महाराष्ट्रवाद्यांकडून येताना दिसून येत नाहीत. केवळ आक्रमक भाषा वापरली आणि टीकाटिप्पणी केली की जनतेच्या शंकांचे समाधान होत नसते. लोकशाहीत प्रत्येकाचा आदर करून आपली भूमिका मांडणे अपेक्षित असते. राजद्रोहाची भाषा वापरणाºयांनी ही बाब समजून घेतली पाहिजे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र