शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

उपचारांपुरते दिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 09:42 IST

वर्षातून निम्मे दिवस वेगवेगळे दिन साजरे होत असतात. त्यात उत्साहाचा, जनजागृतीचा भाग किती आणि उपचाराचा भाग किती हा संशोधनाचा विषय ठरावा.

- मिलिंद कुलकर्णीभारतीय माणूस उत्सवप्रिय आहे. उत्सव आला की, त्याच्यात उत्साह संचारतो. जल्लोषात उत्सव साजरे केले जातात. तीच स्थिती आता, ‘दिनां’ची झाली आहे. वर्षातून निम्मे दिवस वेगवेगळे दिन साजरे होत असतात. त्यात उत्साहाचा, जनजागृतीचा भाग किती आणि उपचाराचा भाग किती हा संशोधनाचा विषय ठरावा.मुळात उत्सव असो की, दिनविशेष असो, त्याचा उद्देश हा दैनंदिन जीवनातील रहाटगाड्यातून मोकळा होत माणसाला निखळ आनंद मिळावा, असा आहे. कुणाला दहीहंडीत तो आनंद मिळतो, तर कुणाला गरबा-दांडीयामध्ये मिळतो. व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने आनंद शोधण्याचे प्रकार भिन्न असतात. एवढेच काय भारतीय परंपरेतील सण-उत्सवांसोबत मग भागवत सप्ताह, रामायण कथा, कीर्तन, प्रवचन सोहळ्यांचे आयोजन वर्षभर केले जाते. कुणाचाही त्याला आक्षेप नसतो. धर्मनिहाय वेगवेगळे सोहळे आयोजित केले जातात. मग दिवाळी, ख्रिसमस, ईद, बुध्दपौर्णिमा, धर्मसंस्थापकांच्या जयंती-पुण्यतिथी असे सोहळे साजरे होत असतात.तसेच जागतिक, राष्ट्रीय दिन साजरे केले जातात. त्याला संयुक्त राष्ट्र संघ, जागतिक आरोग्य संघटना, सरकारांच्या मान्यतेने हे दिवस साजरे केले जातात. मग तो शिक्षक दिन, डॉक्टर डे, क्रीडा दिन, अभियंता दिन, पत्रकार दिन... अशा व्यवसायागणिक दिनांना त्या व्यावसायिकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. आरोग्य, साक्षरता, हृदय, मधुमेह, रक्तदान अशा आरोग्याशी निगडीत दिनांच्या दिवशी त्यासंबंधी जनजागृती केली जाते. वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.हे सगळं ‘छान छान’ असे वरकरणी वाटत असले तरी प्रत्यक्षात या विषयांचे गांभीर्य अलिकडे संपत चालले आहे. व्यावसायिक मंडळींविषयी वर्षातून एकदा कृतज्ञता व्यक्त केली की, उर्वरित दिवसांमध्ये त्यांचा उपहास, टीका, प्रसंगी हल्ला करायला आम्ही मोकळे असतो. ‘व्हॅलेंटाईन डे’ वरुन घडणारे रामायण तर सुपरिचित आहे. त्यामुळे त्याविषयी अधिक न बोललेले बरे. बाकी सण-उत्सवांचा ‘इव्हेंट’ होतोय. त्याला समाजातील काही घटक व्यावसायीक स्वरुप देत आहेत. वर्गणी, तिकीटे, प्रायोजकत्व अशा बाबींमधून समाजात श्रीमंत-गरीब अशी दरी निर्माण केली जात आहे. समाजातील काही मूठभर मंडळींच्या हातात या गोष्टी जात आहे. निखळ आनंद, खळाळता उत्साह या गोष्टी लुप्त होत आहेत. हे झाले सण, उत्सवांचे तर ‘दिनां’विषयी उपचार केले जात आहेत. साधे पत्रकार दिनाचे उदाहरण घेतले तरी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत अनेक पत्रकार संघटना तयार झाल्या आहेत. प्रत्येक संघटनेला त्याच दिवशी कार्यक्रम घ्यायचा असतो. वक्ता आणि प्रमुख अतिथींची उडणारी तारांबळ पाहिली म्हणजे, एकच लग्नघटिका आली तर पुरोहिताची उडणारी धावपळ आठवते. अलिकडे झालेल्या क्रीडा दिनी हाच प्रकार दिसून आला. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांच्या संघटना कार्यरत आहेत. पुन्हा शाळा, महाविद्यालयांमध्ये याचदिवशी कार्यक्रम घेणे शासकीय धोरणानुसार बंधनकारक असते. त्यामुळे त्यांचेही कार्यक्रम होतात. या सगळ्यातून नेमके काय साधले जातेय, याचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.‘एक गाव एक गणपती’ असा उपक्रम महाराष्ट्रात बऱ्यापैकी राबविला जातो. शासन आणि प्रशासन या उपक्रमाला प्रोत्साहनदेखील देते. जळगावसारख्या ठिकाणी सगळ्या क्रीडाप्रकाराच्या संघटनांना एकत्र आणून क्रीडा महासंघ स्थापन करण्यात आला आहे. त्यांचा एक कार्यक्रम होत असतो. अशा पध्दतीने सगळ्यांना एकत्रित आणून एकच कार्यक्रम ठेवला तर यजमान आणि पाहुणे या दोघांची धावपळ तर होणार नाहीच, पण कार्यक्रम नेटका, देखणा आणि परिणामकारक होऊ शकेल.अर्थात हे सगळे प्रत्यक्षात येण्यासाठी मनाचा मोठेपणा, मोकळेपणा हवा आहे. मी, माझे असे करत राहिल्यास कार्य सीमित होते. डबके तयार होते. नवनवीन लोक आले, कल्पना वेगवेगळ्या सूचतात. पाणी प्रवाही राहिल्यास नितळ, स्वच्छ राहते, हे लक्षात घेऊन खरे तर आम्ही बदलायला हवे. ही काळाची गरज आहे. अन्यथा उपचारापुरते दिन दरवर्षी साजरे होत जातील. साजरे करणाºयांना आनंद, समाधान मिळत असला तरी त्याचा उद्देश साध्य होणार नाही, समाजावर परिणाम होण्याची अपेक्षा फलद्रुप होणार नाही.