शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारत! प्रवासाचा राजेशाही थाट; आकर्षक रचना, वेगवान प्रवास  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 06:54 IST

अस्ताव्यस्त पसरलेल्या भारतीय उपखंडाला जोडणारी, खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेची प्रतीक असलेली भारतीय रेल्वे ही प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानास्पद बाब. दीड- एक शतकापूर्वी सुरू झालेल्या या रेल्वेचा प्रवास आता राजेशाही थाटापर्यंत येऊन पोहोचला आहे. वंदे भारत हा बदलत्या भारताचा चेहरा आहे...

विनय उपासनी, मुख्य उपसंपादक  

शाळेत असताना हिंदी वा मराठीच्या प्रश्नपत्रिकेत निबंधासाठी हमखास एक विषय असायचा, तो म्हणजे ‘रेल्वे स्टेशन पर एक घंटा’ किंवा ‘माझा रेल्वे प्रवास’. प्रवासवर्णनाच्या या दोन्ही विषयांवर निबंध लिहिताना रेल्वे स्टेशनवर मला काय चित्र दिसले किंवा रेल्वे प्रवासात मला काय अनुभव आले, यावर शब्दांचे मळे फुलवावे लागत असत. मग, त्यात रेल्वेचा प्रवास कुठून कुठपर्यंत होता, डब्यातील रंगसंगती, बसण्याची जागा, खिडक्या, दरवाजे, प्रवासी, वाटेत लागलेली स्टेशन्स इत्यादींचे वर्णन हटकून या निबंधात असायचे. तसा सर्वच विद्यार्थ्यांचा एकाच छापाचा हा निबंध असायचा. याला कारण रेल्वे प्रवासातील रटाळपणा. त्यात तथ्यांशही असायचे, कारण एरवी रेल्वेप्रवास तसा रटाळच. फक्त त्याची लांबी तुमच्या प्रवासाच्या कालावधीनुसार कमी- अधिक होते इतकेच.  

रेल्वे प्रवासाचे हे चित्र गेल्या दशकात झपाट्याने बदलले. आता तर विमान प्रवासाची अनुभूती देणाऱ्या गाड्या भारतीय रेल्वेच्या ताफ्यात आल्या आहेत. त्यातले अगदी अलीकडचे नाव म्हणजे वं...दे...भा...र...त... काय आहे असे या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये?

वेगवान प्रवासप्रत्येकाला वेगाचे आकर्षण असते. त्यामुळे कोणत्याही वेगवान वस्तूकडे मानवी मन चटकन लक्ष वेधून घेते. वंदे भारत इतर गाड्यांपेक्षा वेगाने धावू शकते.  वंदे भारत मालिकेतील एक्स्प्रेस गाड्या प्रसंगी १८० किमी प्रतितास एवढा वेग गाठण्याची क्षमता राखतात. 

आकर्षक रचना 

वंदे भारतचा यूएसपी (युनिक सेलिंग पॉइंट) म्हणजे तिची आकर्षक रचना. इंजिनापासूनच त्याची सुरुवात होते. इंजिनाचे तोंड जेवढे निमुळते तेवढी त्याची वारा कापण्याची क्षमता जास्त, हा वायुगतिशास्त्राचा नियम आहे. हा विचार करूनच वंदे भारतच्या इंजिनाचा आकार बदलण्यात आला आहे. डब्यांची नवीन रचना, हवेशीर मोकळे डबे, शिवाय त्या जोडीला मनोरंजनाच्या साधनांची उपलब्धता, खानपान सेवेसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग, स्वच्छतागृहांची पाश्चिमात्य रचना असा सर्व जामानिमा वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अनुभवायला मिळतो. 

चार वर्षे पूर्णवंदे भारतची चाचणी २०१८ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर २०१९ मध्ये पहिली वंदे भारत एक्स्प्रेस रुळांवर धावली. त्यास नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली. आता देशभरात १० वंदे भारत गाड्या धावत आहेत. नजीकच्या काळात ४०० वंदे भारत गाड्या चालवण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्धार आहे. 

काटेकोर वेळभारतीय रेल्वे आणि घड्याळ यांचे विळ्याभोपळ्याचे नाते असा समज आता इतिहासजमा झाला आहे. बहुतांश रेल्वेगाड्या आता त्यांच्या पूर्वनिर्धारित वेळेनुसारच गंतव्या ठिकाणावर पोहोचतात. वंदे भारतही त्यास अपवाद नाही. 

व्हीबी १ आणि व्हीबी २ : या दोन्ही सीरिजमधील वंदे भारत गाड्या ५४ सेकंदात १०० किमी प्रतितास हा वेग गाठू शकतात.

व्हीबी ३ : या मालिकेतील वंदे भारतचा स्पीड १८० ते २०० किमी प्रतितास एवढा असेल.

व्हीबी ४ : या गाडीचा वेग २०० किमी प्रतितास याहून अधिक असेल. 

मेक इन इंडिया या अभियानांतर्गत चेन्नईतील आयसीएफमध्ये वंदे भारतची निर्मिती सुरू झाली. सद्य:स्थितीत देशभरात १० वंदे भारत एक्स्प्रेस कार्यरत आहेत. दिल्ली-वाराणसी ही पहिली वंदे भारत एक्स्प्रेस १७ फेब्रुवारी २०१९ रोजी धावली. वंदे भारतची चाचणी प्रक्रिया २०१८ मध्ये सुरू झाली.  सुरुवातीला या गाडीचे नाव ‘ट्रेन १८’ होते. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस