शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेशातले ‘दलबदलू’ बाजी पलटवतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 05:33 IST

या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणे हे निवडणुकीचा रंग बदलल्याचे चिन्ह, की टिकून राहण्याची धडपड? - उत्तर प्रदेशच्या बाबतीत अंदाज बांधणे मुश्कीलच!

-  विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूहअमुक नेता त्याचा विद्यमान पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेला, अशा बातम्या सध्या उत्तर प्रदेशातून रोज येत आहेत. सत्तेवर असल्याने भाजपला स्वाभाविकपणे या दलबदलू आयाराम-गयारामांचा फटका जास्त बसतो आहे. उत्तर प्रदेशच्या सिंहासनावर पुन्हा कमळाचीच पूजा होईल, असे भाजप तोऱ्यात म्हणत असल्याने प्रश्न पडतो, की इतकी खात्री आहे, तर मग लोक पक्ष सोडून का जात आहेत?- आणि त्यापेक्षाही मोठा प्रश्न असा, की हे इकडून तिकडे उड्या मारणारे नेते आगामी  निवडणुकीचे रंग किती बदलू शकतील? खरे तर निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी सर्व काही ठीकठाक चालले होते. गतसप्ताहात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक दिल्लीत झाली. तिथून बातमी आली, भाजप १०० आमदारांचे तिकीट कापणार आहे. त्यानंतर मंत्रिपदी असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी  राजीनामा दिला. मागोमाग उत्तर प्रदेशात राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले. तीन मंत्र्यांसह डझनभर आमदार आतापर्यंत राजीनामा देऊन मोकळे झाले आहेत. 

ज्यांनी राजीनामे दिले त्या भाजप नेत्यांचा रा. स्व. संघाशी कधी भावनिक संबंध आलेला नाही, हे इथे महत्त्वाचे. स्वामी प्रसाद मौर्य बराच काळ बहुजन समाज पक्षात होते. ते कांशीराम आणि मायावतींच्या  जवळचे मानले जात. तिकिटाच्या लोभाने भाजपमध्ये आले आणि आता समाजवादी पक्षात गेले. दुसऱ्या ज्या लोकांनी पक्ष बदलला तेही आपापल्या क्षेत्रात वजनदार आहेत. भाजपला पडलेल्या या भगदाडाने सपाची झोळी भरली असली तरी गमतीची गोष्ट म्हणजे आता भाजपतल्या कोणत्याही आमदाराला आम्ही सपात घेणार नाही, असे अखिलेश यादव यांनी जाहीर केले आहे. आता प्रश्न असा, की अखिलेश असे का म्हणाले? 
भाजपमध्ये काही ठीक नाही आणि सपात येण्यासाठी उत्सुक नेत्यांची रांग लागली आहे, असे कदाचित त्यांना सुचवायचे असेल. दुसरीकडे ते पक्षात आलेल्यांना हे सांगू इच्छितात की तिकिटासाठी जास्त बडबड चालणार नाही. शेतकरी आंदोलनामुळे पश्चिमी उत्तर प्रदेशात भाजपचे नुकसान होऊ शकते, हे अखिलेश यांना ठाऊक आहे. चौधरी चरणसिंह यांचे नातू, अजितसिंह यांचे पुत्र जयंत चौधरी यांना भाजप सांभाळू शकला नाही. त्यांना समजावण्याचे प्रयत्न चालले असल्याचे कळते, मात्र ते सोपे नाही. याचा फायदा सपाला होऊ शकतो. याच कारणाने सपाने पूर्वांचलात लक्ष केंद्रित केले असून छोट्या पक्षांना बरोबर घेतले आहे. पूर्वांचलात मागच्या निवडणुकीत भाजपला १६० पैकी ११५ जागा मिळाल्या होत्या. पंतप्रधान मोदी, तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूर्वांचलाचा गड राखण्यासाठी वारंवार त्या भागात दौरे करत आहेत. आजवर एकूण ९५ हजार कोटींच्या योजना पूर्वांचलाला मिळाल्या आहेत.भाजपमध्ये सध्या जी पडझड होते आहे तिच्यामध्ये  छोटे पक्ष विरुद्ध मोठे अशीही एक बाजू आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात जेव्हा जेव्हा मोठे पक्ष  बलवान झाले; तेव्हा छोट्यांचे बळ आटल्याचे दिसते आणि छोट्यांनी मोठ्यांना साथ दिली तेव्हा मात्र छोट्या पक्षांचाच फायदा झाला आहे. ही संधी साधून छोट्या पक्षांच्या नेत्यांनी  मोठ्या पक्षालाच संकटात टाकले, असेही घडलेले आहे. खरे तर मोदी यांना छोट्या पक्षांची फारशी फिकीर वाटत नाही. हे काही बिघडवू शकत नाहीत हे ते जाणतात. मात्र राष्ट्रीय पक्ष कॉंग्रेसला उत्तर प्रदेशात  अवघे ५ टक्के जरी जनाधार मिळाला तरी भाजपला मोठा फरक पडू शकतो. म्हणूनच भाजप सातत्याने कॉंग्रेसला  जास्त लक्ष्य करताना दिसतो. पक्षबदल करणाऱ्यांचे यापूर्वी काय झाले याकडे जरा लक्ष देऊ. यापूर्वी २०१४ ते २०२० या काळात ज्या १२ खासदारांनी पक्ष बदलून दुसऱ्या पक्षाकडून निवडणूक लढवली त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. ज्या ३५७ आमदारांनी पक्ष बदलून दुसरीकडून निवडणूक लढवली, त्यापैकी फक्त १७० विजयी झाले. एकत्रित विचार करता ४३३ दलबदलूंपैकी ५२ टक्क्यांनी पुन्हा यश मिळवले. याआधीच्या तीन निवडणुकांमध्ये मतदारांनी उत्तर प्रदेशातली सरकारे उलथून लावली आहेत, हे विसरू नका. २००७ मध्ये बसपाचे सरकार आले तर २०१२ मध्ये सपाचे. त्यानंतर २०१७ साली भाजपकडे सत्ता आली. गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशातल्या विकास योजनांवर तब्बल ५ लाख कोटी रुपये खर्ची घातल्याचे या वेळी योगी म्हणत आहेत. या योजनांचे लाभार्थी भाजपला मते देतील असे त्यांना वाटते. पण माझा अनुभव सांगतो, की फक्त कामांच्या आधारे मतांची बरसात कधी होत नाही. कामे केली तर मते मिळतील असे राजकीय पक्षांना वाटते, म्हणून ते पैसा खर्च करतात. परंतु उत्तर प्रदेशसारख्या राज्यात अखेर धार्मिक ध्रुवीकरण आणि जातीय निकष हेच प्रभावी ठरतात. धार्मिक ध्रुवीकरण हा तर भाजपचा हातखंडा मानला जातो. रामजन्मभूमीनंतर आता कृष्णजन्मभूमी रंग दाखवू लागली आहे. योगी तर भगवी वस्त्रेच परिधान करतात. हिंदू मतांचा फायदा भाजपला मिळेलच. त्याचप्रमाणे मुस्लीम मते या वेळी सपाकडे जातील; परंतु ओवैसी मुस्लिमांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. मुस्लीम मतदारांना पटवण्याची दोन नंबरची लढाई ओवैसी आणि काँग्रेस पक्षात आहे असे म्हणता येईल. इकडे मायावती मात्र थंड पडल्या आहेत.त्या राजकीय आणि आर्थिक अडचणींचा सामना  करत आहेत. या निवडणुकीत त्यांचा प्रभाव कोठे दिसत नसला, तरी दलितांच्या नेत्या त्याच आहेत. इथे दलित आणि जाटांचे नेतृत्व एकत्र येत असले तरी मुझफ्फरनगरच्या घटनेने दोन्ही समुदाय एकमेकांपासून अधिक दूर गेले आहेत. थोडक्यात काय, तर उत्तर प्रदेशची निवडणूक  उत्सुकता शिगेला घेऊन चालली आहे, हे नक्की! बघू या, पुढे काय काय होते ते....

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा