शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
5
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
6
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
7
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
8
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
9
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
10
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
11
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
12
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
13
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
14
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
15
Stock Markets News: फार्मावर १००% टॅरिफ, सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी २४,८०० च्या खाली, फार्मा शेअर्स आपटले
16
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
18
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...
19
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
20
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव

नेते आणि पोलिसांचे वर्तन विपरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:34 IST

दुर्दैवाने सध्याचे नेते आणि पोलीस अधिकाºयांना आपापल्या मूळ भूमिकेचाच विसर पडल्याचे जातीय दंगली आणि त्यानंतर होणा-या कारवाईकडे पाहताना दिसून येते. इतिहासातील घटना पाहिल्या तर त्या काळात महापुरुषांनी धर्मभेद आणि जातीभेद केला नव्हता असेच दिसून येते.

-  सुधाकर सुराडकरदुर्दैवाने सध्याचे नेते आणि पोलीस अधिकाºयांना आपापल्या मूळ भूमिकेचाच विसर पडल्याचे जातीय दंगली आणि त्यानंतर होणा-या कारवाईकडे पाहताना दिसून येते. इतिहासातील घटना पाहिल्या तर त्या काळात महापुरुषांनी धर्मभेद आणि जातीभेद केला नव्हता असेच दिसून येते. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खरी शिकवण त्यांच्या अनुयायी म्हणविणाºयांना समजलीच नाही, असे स्पष्ट करणाºया घटना घडताहेत. शिवाजी महाराजांचे कार्य उत्तुंग होते. स्वराज्य उभारणीत त्यांच्यासोबत सर्वच जातीधर्मांचे लोक होते. तर त्यांना त्रास देणाºयांमध्ये काही मराठे सरदारही होते. स्वराज्यावर चाल करून येणाºया अफजल खानासोबत काही हिंदूंचाही समावेश होता. म्हणजे तेव्हा जाती आणि धर्मभेद नव्हता, असेच दिसून येते. शिवाजी महाराज अत्याचारी मोघलांविरोधात होते. त्याबरोबर जातीय दंगलीत सहभागी होणाºयांना आंबेडकरवादी म्हणताच येणार नाही.सध्या गरज आहे ती समस्त तरुणवर्गाला योग्य दिशा देण्याची. त्यात मोठी जबाबदारी आहे ती त्या त्या समाजाचे नेते आणि पोलीस अधिकाºयांचीही. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर काही तरुण मला भेटायला आले. म्हणाले, दंगलीनंतर पोलीस आमच्यावर अत्याचार करताहेत. मी त्यांना समजावून सांगितले, तुम्ही पोलिसांना संधी दिलीत. आता बहुतांशी पोलीस दीनदुबळ्यांविरुद्ध असतात, हे वास्तव आहे. डॉ. बाबासाहेबांचे नाव घेत हिंसाचार करणे चुकीचे आहे. कारण घटनेचे पालन करा, सरकारी मालमत्तेचे नुकसान करू नका असेच त्यांची विचारधारा सांगते. मग तुमचे वर्तन त्याविरोधात नाही का? निषेध जरूर व्यक्त करा, पण तो सनदशीर मार्गाने. माझे हे म्हणणे त्यांना पटले.कधी पोलीस प्रकरण अंगावर शेकेपर्यंत कारवाईच करीत नाहीत. अंगावर शेकले की मग अतिरेकी कारवाई करायची, असे प्रकार घडतात. घरात शिरून मारहाण करणे, अटक केलेल्यांवर चुकीची कलमे लावणे, असे उपद्व्याप पोलीस करतात; आणि मग त्यातून वातावरण आणखीनच बिघडत जाते. याला कारणीभूत नेतेमंडळीही आहेत. योग्य वेळी योग्य भूमिका घ्यायची नाही. सोयीचीच भूमिका घ्यायची, असे राज्यकर्त्यांकडून घडते. देशहित जपायचे तर कायद्याचेच राज्य पाहिजे. ‘जो कायदा तोडतो, त्याच्यावर कडक कारवाई’ हे सूत्र ठेवले तर समाजात योग्य संदेश पसरतो. पोलिसांच्या बाबतीत तर आता इतकी वाईट परिस्थिती आहे की, राज्यकर्त्यांना काय वाटू शकते हे गृहीत धरूनच त्याला पूरक अशी कारवाई उतावीळपणे केली जाते. वास्तविक कधीकधी राज्यकर्त्यांना ते अभिप्रेतही नसते. पण पोलिसांनी तशी कारवाई केल्याने राज्यकर्त्यांबाबतही गैरसमज पसरत जातात.जातीय दंगलीतील आरोपींवर कारवाई करतानाही त्यांना त्यांच्या कृत्यांचे दूरगामी दुष्परिणाम समजावून दिले, कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली तर आरोपी पुढील काळात तशा कृत्यांपासून परावृत्त होतात आणि पोलिसांबाबत त्यांच्या मनात आकस राहत नाही, हे मी स्वत: पोलिसी सेवेत अनुभवले आहे.आपल्या स्वार्थासाठी समाजात द्वेष पसरविणाºयांना मुळापासून उखडून काढण्यासाठी राज्यकर्त्यांनी तशी ठोस भूमिका घेणे आणि त्यासाठी पोलिसांना कारवाई करण्यासाठी स्वातंत्र्य देणे महत्त्वाचे आहे. समाजाला दिशा देण्याची जबाबदारी असलेले नेते, त्यांच्या आदेशावरून कार्यवाही करणारे उच्चपदस्थ पोलीस आणि अंमलबजावणी करणारे निम्नस्तरातील पोलीस अशा उतरंडीने आपापल्या भूमिका चोखपणे बजावल्या तर निश्चितच समाजात सौहार्द आणि सलोख्याचे वातावरण निर्माण होईल.(लेखक हे निवृत्त पोलीस महानिरीक्षक आहेत.)

टॅग्स :Policeपोलिस