शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बेसावध राहिल्यास सायबर हल्ले विनाश करतील!

By विजय दर्डा | Published: April 09, 2018 1:27 AM

हल्लीचे युग तंत्रज्ञानाचे आहे. आता जवळजवळ सर्वच दस्तावेज कॉम्प्युटरमध्ये साठविले जातात व गरज असेल तेव्हा इंटरनेटवरून एकीकडून दुसरीकडे पाठविले जातात.

हल्लीचे युग तंत्रज्ञानाचे आहे. आता जवळजवळ सर्वच दस्तावेज कॉम्प्युटरमध्ये साठविले जातात व गरज असेल तेव्हा इंटरनेटवरून एकीकडून दुसरीकडे पाठविले जातात. एखाद्या व्यक्तीपासून लहान मोठ्या कंपन्या, मोठमोठी आस्थापने आणि देशोदेशीच्या सरकारांचे कामकाज याच पद्धतीने होत असते. अचानक दूरवरच्या देशात बसलेली एखादी व्यक्ती ‘सायबर हल्ला’ करते आणि तुमच्या कॉम्युटरमध्ये साठविलेली माहिती चोरून नेते. अनेक वेळा तुमचा कॉम्प्युटर ‘लॉक’ केला जातो व तो पुन्हा सुरू करण्यासाठी पैशाची मागणी केली जाते. हल्ली हे प्रकार राजरोस घडत असतात. अनेक कंपन्या अशा खंडणीखोरांपुढे नांगीही टाकतात. पण या सायबर हल्लेखोरांना पैसे दिले म्हणून तुमची चोरलेली माहिती सुरक्षित राहील किंवा तुमचा कॉम्प्युटर पुन्हा पूर्ववत काम करेल याची शाश्वती मात्र देता येत नाही!हे ‘हॅकिंग’ व्यक्तिगत कॉम्पुटरपुरते मर्यादित असते तोपर्यंत त्याची फारशी ओरड होत नाही. परंतु हाच प्रकार सरकारच्या एखाद्या मंत्रालयाच्या वेबसाईटच्या बाबतीत घडतो तेव्हा अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण होते. काही दिवसांपूर्वी भारताच्या संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट ‘हॅक’ झाल्याचे टिष्ट्वट संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले तेव्हा देश काळजीत पडला. सायबर सेक्युरिटी प्रमुख गुलशन राय यांनी हा ‘सायबर हल्ला’ नव्हता अशी संध्याकाळी खात्री दिली तेव्हा काळजी दूर झाली. विदेशातील सायबर हल्लेखोर असे प्रयत्न वारंवार करत असतात त्यामुळे काळजी वाटणे स्वाभाविक आहे. गेल्यावर्षी मेमध्ये चिनी आणि पाकिस्तानी ‘हॅकर्स’नी भारतीय लष्करी अधिकाऱ्यांचे कॉम्प्युटर ‘हॅक’ करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. तुम्हाला श्रीलंकेत तैनात केले जाऊ शकते, असा एक मेल लष्करी अधिकाºयांना मिळाला होता. त्या मेलमध्ये डेटा चोरणारे ‘व्हायरस’ होते. काही अधिकाºयांनी हा मेल उघडलाही होता. त्यानंतर लष्कराच्या सायबर शाखेने अधिकाºयांना असा मेल उघडण्यापासून सावध केले. काही अधिकाºयांना ‘सेक्स व्हिडिओ’च्या लिंक पाठविण्यात आल्या होत्या. हे मेल जेथून पाठविले गेले होते त्याचा ‘इंटरनेट प्रोटोकॉल अ‍ॅड्र्स’ जर्मनीमधील होता.मे २०१७ मध्ये आंध्र प्रदेश पोलिसांच्या कॉम्प्युटर यंत्रणेवरही असाच सायबर हल्ला झाला होता. गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने सावधगिरीचा इशारा दिला होता व भारतीय रिझर्व्ह बँकेनेही सर्व बँकांना सॉफ्टवेअर अपडेट करण्याचा सल्ला दिला होता. असे सायबर हल्ले किती भयंकर असू शकतात याचा धक्कादायक अनुभव गेल्या वर्षी जगाने घेतला होता. अचानक अनेक देशांमधील असंख्य कॉम्प्युटर ठप्प झाले. ‘कॅप्सरस्की’ या सायबर सुरक्षा फर्मनुसार त्यावेळी ७४ देशांमधील किमान ४५ हजार कॉम्प्युटर निरुपयोगी झाल्याची माहिती दिली. ‘अ‍ॅवास्ट’ या अँटी व्हायरस कंपनीनुसार त्यावेळी ९९ देशांमधील ५७ हजार कॉम्प्युटर हल्ल्याला बळी पडले होते. अनेक देशांमध्ये सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या व बँकिंग व्यवस्थेवर याचा वाईट परिणाम झाला. भारतही यातून सुटला नाही. मुंबई बंदराच्या टर्मिनलच्या कामावरही या सायबर हल्ल्याचा दुष्परिणाम झाला. रशिया, युक्रेन, स्पेन आणि फ्रान्समधील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही याचा फटका बसला. हल्ली हॅकर एवढे हुशार झाले आहेत की विकसित देशांच्या सायबर सुरक्षेसही ते भेदू शकतात. अमेरिका व रशिया यांच्यासारखे देशही यापासून बचाव करू शकत नाहीत. अमेरिकेत तर लोकांची बँक खाती हॅक करून पैसे काढून घेण्याच्या घटना बºयाच होत असतात. उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी अमेरिकेची संरक्षण यंत्रणा हॅक करण्याचा कित्येक वेळा प्रयत्न केलेला आहे.भारतातील सायबर सुरक्षा व्यवस्था अद्याप म्हणावी तेवढी चोख नाही. त्यामुळे भारत हा सायबर हल्लेखोरांचे लक्ष्य होणे उघड आहे. भारताचे सायबर सेक्युरिटी प्रमुख गुलशन राय यांनी जुलै २०१७ मध्ये वित्त विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीस सांगितले होते की, भारतात माहिती चोरणारे ‘मॅलवेअर’ आणि सायबर हल्ल्यांचे प्रकार दर आठवड्याला मोठ्या संख्येने होतात. सन २००० पासून आत्तापर्यंत या सायबर हल्ल्यांनी अधिक गंभीर रूप धारण केले असल्याचेही त्यांनी सांगितले. सन २०२०पर्यंत अशा व्हायरसची व सायबर हल्ल्यांची संख्या बरीच वाढेल आणि त्यातून संभवणारा धोकाही मोठा असेल.आता तर ‘आधार’च्या रूपाने देशातील प्रत्येक नागरिकाची माहिती सरकारकडे आहे. ही माहिती कुणी चोरली तर देशाला मोठे नुकसान सोसावे लागेल. शिवाय मोबाईल सेवांचा होत असलेला विस्तार व मोबाईल अ‍ॅप्सची वाढती संख्या यामुळे हे धोके वाढत जाणार आहेत. माहितगारांच्या अंदाजानुसार भारतात दररोज दोन अब्ज व्यवहार इलक्ट्रॉनिक माध्यमांतून केले जातात. सायबर सुरक्षा चोख नसेल तर सायबर हल्लेखोर किती नुकसान करू शकतील याचा अंदाज यावरून करता येतो. वित्त विभागाच्या संसदीय स्थायी समितीस गेल्या वर्षी ‘डिजिटल इकॉनॉमी’वरही एक अहवाल सादर केला गेला होता. वित्तीय सेवांशी संबंधित लोकांना सायबर हल्ल्यांमुळे सर्वाधिक धोका पोहोचू शकतो, असे त्या अहवालात म्हटले होते. याचबरोबर देशाची संरक्षण व्यवस्था, आर्थिक, वैज्ञानिक व अंतराळ संशोधनाशी संबंधित संस्थांना यादृष्टीने अत्ंयत सुरक्षित करावे लागेल. अन्यथा आपले शत्रू अपरिमित नुकसान करू शकतील.हे टाळण्यासाठी काय करावे? याविषयी सायबर सेक्युरिटीशी संबंधित अनेक जाणकारांशी मी चर्चा केली. कॉम्प्युटरची सेक्युरिटी व्यवस्था नेहमी अद्ययावत ठेवावी व उत्तमात उत्तम असे दर्जेदार अ‍ॅन्टी व्हायरस सॉफ्टवेअर वापरावे, असे त्यांचे आग्रहाचे सांगणे होते. अनोळखी आणि संशयास्पद मेल उघडू नका. पॉर्न साईटपासून कटाक्षाने दूर राहा. व्यक्तिगत पातळीवर सुरक्षेची काळजी घेतली तर सायबर हल्ल्यापासून बºयाच प्रमाणात वाचता येऊ शकेल. खास करून अधिकारी आणि सरकारी खात्यांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. सुरक्षित राहायचे असेल तर सायबर हल्लेखोरांच्या नेहमी दोन पावले पुढे राहून बचावाचे नवनवे मार्ग आपल्याला शोधावेच लागतील.हे लिखाण संपविण्यापूर्वी...अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेत फक्त आठ टक्के व लोकसभेत केवळ चार टक्के कामकाज झाले ही बातमी बेचैन करणारी आहे. संसद हे सर्वसामान्य नागरिकांच्या आशा-आकांक्षांचे मंदिर आहे. तेथे कामाच्या प्रत्येक मिनिटाचा सदुपयोग व्हायला हवा. बहुतांश वेळ गोंधळाने वाया जातो हे दुर्दैव आहे. वेळेचा सदुपयोग व्हावा यासाठी सत्तापक्षाने लवचिकपणा दाखवायला हवा. परंतु विरोधी पक्षांना विश्वासात घेण्यात सत्तापक्ष अपयशी ठरले की असे होते. संसदेतील गोंधळाने सामान्य नागरिकांच्या आशा धुळीला मिळतात याची जाणीव दोघांनीही ठेवायला हवी.(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डा